BCCI T20 Plan: रोहितमुळे विराटचा गेला बळी! विराट कोहलीलाही वगळले T20 संघातून; अखेर T-20 कर्णधारपदी हार्दिकच्या नावावर शिक्कामोर्तब..

0

BCCI T20 Plan: लगातार दोन टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारतीय संघाला (Indian cricket team) साजेशी कामगिरी करता आली नसल्याने, बीसीसीआयने (BCCI) आता मोठं पाऊल उचललं आहे. 2024 मध्ये होणाऱ्या आगामी t20 विश्वचषकासाठी BCCI ने आत्तापासूनच पासूनच तयारी सुरू केली असून, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli) यासह अनेक सिनियर खेळाडूंना (T20 team) संघातून वगळणार असल्याचं निश्चित केलं आहे. टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधार पदासाठी हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya T20 Captain) नाव निश्चित करण्यात येणार आहे. जानेवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध (IndiavsSri Lanka T-20 series) Lanka होणाऱ्या तीन T-20 सामन्याच्या मालिकेत देखील हार्दिक पांड्याकडे नेतृत्व देण्यात आले असून, रोहित, विराटला संघातून वगळले आहे. (Hardik Pandya announce T20 Captain)

बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाची निवड समिती बरखास्त केल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाच्या बदलांमध्ये देखील महत्त्वाची पावले उचलली आहेत. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोहित शर्मा विषयी T20 कर्णधारपदा संदर्भात चर्चा केली असल्याची देखील माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून माध्यमांना दिली गेली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी रोहित शर्माला T20 संघाचे कर्णधार पद हार्दिक पांड्याकडे देणार असल्याचे निश्चित केले आहे.

रोहित शर्मा यासाठी अनुकूल नसण्याची देखील माहिती आहे. मात्र BCCI ने हा आमचा निर्णय असून, सिनियर खेळाडूंना टी-ट्वेंटी क्रिकेट मधून निवृत्ती घ्यायची की नाही, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. (Rohit Sharma Virat Kohli retirement) मात्र आम्ही टी-ट्वेंटी क्रिकेटसाठी एक प्लॅन तयार करत असून, यासाठी अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात येणार असल्याची माहिती रोहित शर्माला दिली असल्याचं स्पष्ट केलं आहे. डिसेंबरमध्ये नवीन निवड समिती स्थापन झाल्यानंतर, भारतीय क्रिकेटच्या कर्णधारा विषयी आणि टी-ट्वेंटी क्रिकेटच्या नवीन धोरणाविषयी निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

रोहितमुळे विराटचा बळी

भारताचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्म मधून जात आहे. त्यातच त्याचा फिटनेस देखील त्याला साथ देत नसल्याचं पाहायला मिळतं. अशा परिस्थितीमुळे बीसीसीआयने रोहितला टी-ट्वेंटी क्रिकेट मधून बाजूला करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त रोहित शर्माबरोबर विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, या खेळाडूंना देखील वगळलं जाणार आहे. साहजिकच यामुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीला देखील रोहित शर्मामुळे आपला बळी द्यावा लागणार आहे.

विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये देखील तो उत्कृष्ट फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. सोबतच त्याचा फिटनेस देखील अव्वल दर्जाचा असल्याने बीसीसीआयचे काही पदाधिकारी विराट कोहलीला टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये देखील संधी देण्याच्या बाजूने आहेत. मात्र सिनियर खेळाडूंना टी-ट्वेंटी प्रकारांमधून वगळून नवीन खेळाडूंना संधी देण्याचा तयारीत असल्याने, अर्थात एकट्या विराट कोहलीला टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये खेळवून अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. यामुळे बीसीसीआय विराट कोहली संदर्भात विचार करत आहे. मात्र रोहित शर्माची टी-20 मधून हकालपट्टी होणार हे निश्चित करण्यात आलं आहे.

हे देखील वाचा Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर..

Tata Blackbird : लवकरच बाजारात येणार टाटा  ब्लॅकबर्ड बाजारात; लोकांना का आहे या कारची एवढी उत्स्कुता..

Marriage: नवरदेवाने भरमंडपातच सगळ्या लोकांसमोर नवरीला केले Kiss, नवरी गेली थेट पोलीस स्टेशनला.. 

Chanakya Niti: लग्नानंतर काही दिवसांतच पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या साविस्तर..

Bigg Boss 16: पत्नीच्या जीवावर मोठा झालेल्या गोल्डन मॅनला सिझन संपत आल्यानंतर बिग बॉसमध्ये कशी मिळाली एंट्री? वाचा सविस्तर..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.