Marriage: नवरदेवाने भरमंडपातच सगळ्या लोकांसमोर नवरीला केले Kiss, नवरी गेली थेट पोलीस स्टेशनला..
Marriage: आजकाल लग्न करत असताना बरेच बदल पाहायला मिळतात. आपल्याकडील लग्नपद्धती देखील पाश्चिमात्य संस्कृतीकडे झुकत चाललीय की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. अलिकडे लग्नाअगोदर प्री वेडिंग शूटिंगचे फॅड आलेले आहे. त्यामध्ये अगोदर नॉर्मल फोटोग्राफी असायची. परंतु आजकाल त्यात लीप्स लॉक किसींग करून फोटोग्राफी केली जाते.
आपण लग्नात (Marriage) हार नवरी नवऱ्याला हार घालत असताना, नवरदेवाला उचलताना पाहिले असेलच. तसेच नवरीला देखील नवरदेव हार घालत असताना नवरीला उचलताना पाहिले असेल. तसेच नवरदेवाचा बूट खेचताना देखील आपण पाहिले असेल. परंतु एका नवरदेवाने नवरीशी केलेले कृत्य त्याला एवढे महागात पडले, की त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील.
लग्न म्हणजे दोन जीवांचे मीलन असते. लग्न (Marriage) केल्यानंतर एका नव्या आयुष्याला सुरुवात होत असते. कारण लग्ना अगोदर मुलगा किंवा मुलगी हे एकटे असतात. मुलीचे देखील माहेरी लाडात दिवस असतात. परंतु लग्न (Marriage) झाल्यानंतर एक नवीन ठिकाणी, नवीन जोडीदार, तिथल्या वातावरण रुळून जाणे, हे सगळं थोड अवघड असते. त्यात जोडीदार व्यवस्थित भेटला तर आयुष्य सुंदर होते. परंतु जोडीदार समजूतदार नसेल तर मग संपूर्ण आयुष्याची वाट लागते.
उत्तर प्रदेश राज्यातील संभल या जिल्ह्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात एक विवाह पार पडला. परंतु वराच्या मुळ गावी 28 नोव्हेंबरला पारंपरिक पद्धतीने तोच विवाह (Marriage) सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात वधू आणि वर यांनी एकमेकांना हार घालण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर वधू आणि वर बसले होते. यावेळी वराने अचानक सर्वांसमोरच वधूला चुंबन (kiss) घेतले.
सर्वांसमोर चुंबन घेतल्याने वधू कमालीची चिडली. ती तेथून उठून डायरेक्ट तिच्या खोलीत गेली. त्यानंतर तिला तिच्या आणि वराच्या कुटुंबातील लोकांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती कोणाचेही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तसेच आपल्याला हे लग्न मान्य नसून मला वरासोबत राहायचे नसल्याचे वधूने सांगितले. तसेच जो व्यक्ती 300 लोकांसमोर असे कृत्य करू शकतो, तो व्यक्ती कधीच सुधारू शकत नसल्याचे देखील तिने सांगितले.
त्यामुळे कोणाचेही काहीही ऐकण्याच्या मनस्थित नसलेल्या वधूने आपल्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन पोलीस स्टेशन गाठले. तेथील स्थानिक पोलीस स्टेशन बेहजोई पोलीस स्टेशन मध्ये मुलीने वराच्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यामुळे सगळीकडे एकच चर्चा होत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचा लग्नासाठी केलेला एवढा खर्च वाया गेलाच. वराला त्याने केलेलं कृत्य आयुष्यभर लक्षात राहील.
Bajaj ची ही जबरदस्त बाईक मोबाईल पेक्षा स्वस्त, 100 किमी मायलेज; एवढंच नव्हे तर..
Maruti Suzuki CNG Cars: 26 किमीचं मायलेज देणाऱ्या या दोन जबरदस्त स्वस्तात मस्त 7 सिटर्स कार
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम