LPG Price: घरगुती गॅस आणि व्यवसायिक गॅसच्या दर कमी झाले? काय झाला निर्णय..

0

LPG Price: घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य लोक त्रस्त झाले आहेत. अगोदरच प्रत्येक ठिकाणी महागाई वाढलेली आहे आणि अजून वाढतच आहे. त्यात गॅस सिलेंडर दर (LPG Price) वाढलेले आहेत. एका अहवालानुसार ग्रामीण भागातील तसेच निमशहरी भागातील महिलांनी पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे.

 

बऱ्याच लोकांच्या घरात गॅस सिलेंडर आणि शेगडी धूळ खात पडले असल्याचे पाहायला मिळते. गॅस सिलिंडर दरवाढीने सर्वसामान्य लोकांना व्याकूळ केले आहे. स्वयंपाक करण्यासाठी लागणाऱ्या गॅसलाच 1हजार रुपयापेक्षा अधिक पैसे द्यायचे तर मग स्वयंपाकासाठी लागणारा किराणा माल, घरातील इतर खर्च, मुलांचे शिक्षण या सगळ्यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड अस्वस्थ झालेला पाहायला मिळतो.

 

प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला गॅसचे दर (LPG Price) जाहीर केले जातात. परंतु डिसेंबर 2022 मध्ये घरगुती आणि व्यवसायिक गॅसचे दर जैसे थे ठेवण्यात येणार आहेत. गॅसच्या दराबाबत सरकारी तेल कंपन्या निर्णय घेत असतात. परंतु या महिन्यात गॅसचे दर (LPG Price) आहेत तसेच ठेवण्यात आले आहेत. इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) च्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) देखील गॅसचे दर बदलेले नाहीत.

 

त्यामुळे या महिन्यात गॅसचे दर कमी होतील, अशी आशा होती. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत घरगुती गॅसचे दर 5 वेळा वाढवण्यात आले आहेत. तर व्यावसायिक गॅसचे दर 11 वेळा कमी करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात व्यवसायिक गॅसचे दर कमी झाले होते. परंतु यावेळी व्यवसायिक गॅसच्या दरात देखील काही बदल केला गेला नाही.

 

गेल्या महिन्यात मुंबईमध्ये व्यवसायिक गॅसचे दर 115 रुपयांनी कमी करण्यात आले होते. कोलकत्ता मध्ये व्यवसायिक गॅसचे दर 1846 रुपये आहेत. तर दिल्लीत 1744 रुपये, मुंबई मध्ये 1696 रुपये तर चेन्नई मध्ये सर्वाधिक 1893 रुपये व्यवसायिक गॅसचे दर आहेत. गेल्या महिन्यात साधारणपणे 115 रुपये व्यवसायिक गॅसचे दर कमी केल्याने सध्याचे दर कमी झाले आहेत. हे दर 19 किलो सिलेंडरचे आहेत.

 

तर देशातील घरगुती गॅस बद्दल जाणून घ्यायचे झाले तर, मुंबईमध्ये घरगुती गॅसचे दर 1052 रुपये आहे. तर दिल्लीमध्ये घरगुती गॅसची किंमत 1053 रुपये आहे. कोलकत्ता येथे 1079 रुपये, तर चेन्नई मध्ये घरगुती गॅसचे दर 1068.50 रुपये एवढे आहेत. हे दर 14.2 किलो गॅस सिलेंडरचे आहेत. सर्वसामान्य लोक गॅसच्या दरवाढीने त्रस्त झाले असल्याने, नव्या वर्षाचे गिफ्ट म्हणून गॅसचे दर कमी होतील का? हे पाहणे ऑस्तुक्याचे राहील.

हेही वाचा: घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, आता ग्राहकांची..

MBA Student eating video: माणूसकीला काळिमा फासणारी घटना! आमंत्रण नसताना लग्नात जेवल्यामुळे विद्यार्थ्यांना केले, पाहा व्हिडिओ.. 

 गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जून

लवकरच बाजारात येणार टाटा  ब्लॅकबर्ड बाजारात; लोकांना का आहे या कारची एवढी उत्स्कुता?

Marriage: नवरदेवाने भरमंडपातच सगळ्या लोकांसमोर नवरीला केले Kiss, नवरी गेली थेट पोलीस स्टेशनला.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.