Second Hand Car: 25 हजारांत मिळतेय जबरदस्त कंडीशन असणारी सेकंड हॅण्ड Maruti Alto; वाचा सविस्तर..

0

Second Hand Car: आपल्याकडे देखील फोर व्हीलर (four wheeler) असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र बजेटमुळे (budget) प्रत्येकाला नवीन फोर व्हिलर (new four wheeler) खरेदी करणं शक्य नसतं. अनेकांचे बजेट नसल्यामुळे आपल्या स्वप्नांना विरजण घालावं लागतं. मात्र काही जण नवीन चार चाकी गाडी घेण्याऐवजी सेकंड हॅन्ड फोर व्हीलर खरेदी करणं पसंत करतात. आणि चार चाकी गाडी खरेदी करण्याचे आणले स्वप्न पूर्ण करतात. जर तुम्ही देखील सेकंड हॅन्ड कारच्या (second hand car) शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

मारुती सुझुकी कंपनीच्या (maruti suzuki) फोर व्हीलरला भारतीय बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी असल्याचे पाहायला मिळतं. खूप कमी कालावधीमध्ये भारतीय लोकांच्या हृदयात या कंपनीने आपलं स्थान निर्माण केलं आहे. मजबूत आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत या कंपन्या आपल्या गाडीची निर्मिती करत असल्याने अनेकजण या कंपनीच्या गाड्या खरेदी करताना दिसून येतात. जर तुम्ही देखील मारुती सुझुकी कंपनीचे चाहते असाल, तर मारुती सुझुकी अल्टो ही सेकंड हॅण्ड गाडी (Maruti Suzuki second hand car) केवळ २५ हजारांत खरेदी करण्याची संधी आहे.

अनेकजण सेकंड हॅन्ड गाडी खरेदी करण्याच्या शोधात असतात. मात्र अनेकांना कमी किमतीमध्ये सेकंड हॅन्ड गाड्या कुठे मिळतात? याची माहिती मिळत नाही. तुमच्यापैकी अनेकांना सेकंड हॅन्ड गाडीची खरेदी विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट विषयी (website) माहिती असेल. मात्र या वेबसाईटवर कोणत्या गाड्या किती किंमतीत विकल्या जात आहेत, याची योग्य वेळी माहिती मिळत नसल्याने तुम्हाला कंडिशन असणाऱ्या गाड्या ऑफर्समध्ये खरेदी करता येत नाहीत. आज आम्ही तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) या गाड्यांची सुरुवातीची शोरूम प्राईस जाणून घ्यायचे झाल्यास, तब्बल तीन लाख 40 हजार पासून पाच लाखांपर्यंतची रक्कम तुम्हाला मोजावी लागते. मात्र आता तुम्हाला पाच लाख खर्च करण्याची काहीही आवश्यकता नाही. Maruti Suzuki True Value https://www.marutisuzukitruevalue.com या वेबसाईटवर तुम्हाला जबरदस्त कंडिशनमध्ये असणारी मारुती सुझुकी अल्टो ही कार केवळ 25 हजार रुपयात खरेदी करता येत आहे.

या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मारुती सुझुकी अल्टो या कारचे मॉडेल 2010 मधील आहे. ही गाडी पेट्रोलवर चालणारी असून, केवळ 65 हजार किलोमीटर पळालेली कार असल्याने कंडिशन देखील उत्तम आहे. विशेष म्हणजे, या कारच्या खरेदीवर कंपनी तुम्हाला एका वर्षाची वॉरंटी त्याचबरोबर अतिरिक्त तीन सेवा देखील मोफत देत आहे.

OLX ही वेबसाइट https://www.olx.in/ देखील सेकंड हॅन्ड गाडीची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात करत असते. या वेबसाईटवरून देखील ग्राहक खूप मोठ्या प्रमाणात टू-व्हीलर त्याचबरोबर फोर व्हीलर गाड्यांचे देखील खरेदी करताना दिसून येतात. मारुती सुझुकी अल्टो ही कार या वेबसाईटवर देखील विक्रीसाठी मांडण्यात आली आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या मारुती सुझुकी अल्टो कारची किंमत 65 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या अल्टो कारचे मॉडेल 2009 मधील आहे. विशेष म्हणजे, या कार खरेदीवर तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकी अल्टो कारची तिसरी ऑफर https://www.quikr.com/ या वेबसाईटवर निश्चित करण्यात आली आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या अल्टो कारची किंमत 85 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या अल्टो कारचे मॉडेल हे २०११ मधील आहे. www.quikr.com या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेली कार केवळ ८० हजार किमी पळालेली आहे.

हे देखील वाचा Four Day Working Week: आता कंपनीत आठवड्यात फक्त 4 दिवस करावे लागेल काम, 3 दिवस सुट्टी; एवढंच नव्हे..

DRDO Recruitment: दहावी आणि ग्रॅज्युएट उमेदवारांना या पदासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज..

Physical Relation: शरीराच्या या भागाजवळ स्मार्टफोन ठेवत असाल, तर त्वरित थांबवा; लैंगिक ताकद होतेय कैकपटीने कमी..

BCCI T20 Plan: रोहितमुळे विराटचा गेला बळी! विराट कोहलीलाही वगळले T20 संघातून; अखेर T-20 कर्णधारपदी हार्दिकच्या नावावर शिक्कामोर्तब..

Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर..

LPG Price: घरगुती गॅस आणि व्यवसायिक गॅसच्या दर कमी झाले? काय झाला निर्णय..

Bigg Boss 16: पत्नीच्या जीवावर मोठा झालेल्या गोल्डन मॅनला सिझन संपत आल्यानंतर बिग बॉसमध्ये कशी मिळाली एंट्री? वाचा सविस्तर..

Chanakya Niti: लग्नानंतर काही दिवसांतच पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या साविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.