DRDO Recruitment: दहावी आणि ग्रॅज्युएट उमेदवारांना या पदासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज..
DRDO Recruitment: सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये (central government) सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असतं. तुम्ही देखील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या विभागांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध असून, इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना 7 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहे. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण (10th pass Job) आणि ग्रॅज्युएट असाल, तर या विभागामध्ये सरकारी नोकरी (government job) करण्याची तुमच्याकडे ही खूप मोठी संधी आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) या विभागामध्ये तब्बल 1061 रिक्त पदे भरण्यात येणार असून, या संदर्भातली अधीसूचना देखील जारी करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या विभागा अंतर्गत कनिष्ठ भाषांतर, अधिकारी प्रशासकीय, सहाय्यक लघुलेखन, स्टोर असिस्टंट, वाहनचालक, सुरक्षा सहाय्यक, फायरमन, फायर इंजिन चालक या पदांसाठी ही भरती होणार असून, यासाठी उमेदवारांची पात्रता, ऑनलाइन अर्ज कसा करायचा? याविषयी जाणून घेऊया सविस्तर.
शैक्षणिक पात्रता
“लघुलेखन” या पदासाठी जर तुम्ही अर्ज करू इच्छित असाल, तर तुमचे शिक्षण हे ग्रॅज्युएट त्याचबरोबर Steno आणि टायपिंग पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. जर तुम्ही या अटी पूर्ण करत असाल तरच, तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येणार आहे. (Stenographer Grade) “कनिष्ठ भाषांतर अधिकारी” या पदासाठी जर तुम्ही अर्ज करू इच्छित असाल, तर तुमचे शिक्षण हे PG मधून इंग्लिश आणि हिंदी मधून पूर्ण होणे आवश्यक आहे.
“प्रशासकीय सहाय्यक” या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायची झाल्यास, बारावी उत्तीर्ण त्याचबरोबर टायपिंग देखील उमेदवाराचे झालेले असणे आवश्यक आहे. “स्टोअर असिस्टंट” या पदासाठी जर तुम्ही अर्ज करू इच्छित असाल, तर तुमचे शिक्षण हे बारावी त्याचबरोबर टायपिंग देखील पूर्ण असणे आवश्यक आहे.
“सुरक्षा सहाय्यक” या पदासाठी अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठीची पात्रता ही बारावी उत्तीर्ण त्याच बरोबर टायपिंग देखील पूर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच काही पात्रतेच्या अटी देखील पूर्ण करणे गरजेचे आहे. “वाहन चालक” या पदासाठी अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण हे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक असून, ड्रायव्हिंग केल्याचा तीन वर्षाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे.
आवश्यक कागदपतत्रे
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या विभागामध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी काही कागदपत्रांची देखील पूर्तता करणे आवश्यक आहे. आपण ते देखील जाणून घेऊ. दहावी, बारावी त्याच बरोबर ग्रॅज्युएट शिक्षण घेतलेले शैक्षणिक प्रमाणपत्र उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. सोबतच शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट साईजचे दोन फोटो, ओळखपत्र, इत्यादी कागदपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. जाहिरात डाऊलोड करण्यासाठी यावर क्लिक करा
असा करा ऑनलाईन अर्ज
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था या विभागामध्ये नोकरी करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या विभागामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.drdo.gov.in/careers असं सर्च करणे आवश्यक आहे. क्रोमवर तुम्ही हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर, या भरती प्रक्रियासंदर्भात तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा Physical Relation: शरीराच्या या भागाजवळ स्मार्टफोन ठेवत असाल, तर त्वरित थांबवा; लैंगिक ताकद होतेय कैकपटीने कमी..
LPG Price: घरगुती गॅस आणि व्यवसायिक गॅसच्या दर कमी झाले? काय झाला निर्णय..
Tata Blackbird : लवकरच बाजारात येणार टाटा बाजारात; लोकांना का आहे या कारची एवढी उत्स्कुता?
Maruti Suzuki CNG Cars: 26 किमीचं मायलेज देणाऱ्या या दोन जबरदस्त स्वस्तात मस्त 7 सिटर्स कार
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम