KL Rahul Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी नव्हे, या तरूणी सोबत होणार राहुलच लग्न; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण..

0

KL Rahul Athiya Shetty Wedding: नुकत्याच पार पडलेल्या T-20 विश्वचषकामध्ये (T20 World Cup) भारतीय संघाची (Indian team) सुमार कामगिरी राहिली. त्यातल्या त्यात केएल राहुल (KL Rahul) पुन्हा एकदा महत्त्वाच्या सामन्यात अपयशी ठरल्याने, चाहत्यांच्या निशाण्यावर आला. टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारतीय संघाच्या पराभवाचे खापर केएल राहुलवर सगळ्यात जास्त फोडण्यात आलं. गुणवत्ता असून देखील, महत्त्वाच्या सामन्यात नकारात्मक मानसिकतेमुळे राहुलला महत्त्वाच्या सामन्यात परफॉर्मन्स करता येत नसल्याची अनेकांनी टीका केली.

महत्त्वाच्या सामन्यांमध्ये केल राहुल सातत्याने अपयशी ठरत असल्याने आता त्याच्या जागेवर पर्यायी खेळाडू शोधण्याचा सल्ला देखील अनेक क्रिकेट दिग्गजांनी दिला. भारतीय संघाचा उपकर्णधार असणाऱ्या केएल राहुलकडे आगामी कर्णधार म्हणून पाहिलं जात होतं. मात्र केल राहुलच्या जागी हार्दिक पांड्याची T-20 क्रिकेट कर्णधार पदी निवड आता जवळपास निश्चित मानली जात आहे. (Hardik Pandya T20 captain) बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, टी-ट्वेंटी क्रिकेटचे कर्णधार हार्दिक पांड्याकडे देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

भारत आगामी भारतीय संघाच्या कर्णधारपदी केएल राहुलची निवड करण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता हार्दिक पांड्याचं नाव समोर आल्याने राहुल कडून ही मोठी संधी जाणार आहे. अशातच आता त्याने आपल्या लग्नासाठी बीसीसीआयकडे अर्ज केला असल्याची माहिती BCCI च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. लग्नासाठी सुट्टी मागून घेतल्यानंतर, केएल राहुलची श्रीलंकेच्या तीन T20 सामन्याच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही. (India vs srilanka T20 series)

केएल राहुल आणि सुनील शेट्टी Sunil Shetty) यांची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (athiya Shetty) हे दोघे गेल्या काही वर्षापासून रिलेशनशिपमध्ये (relationship) आहेत. सुरुवातीला या दोघांनी आम्ही रिलेशनशिपमध्ये नसल्याचं सांगितलं होतं. मात्र नंतर अनेक कार्यक्रमांमध्ये दोघांना एकत्र पाहण्यात आलं. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या रिलेशनशिप (KL Rahul athiya Shetty relationship) विषयी सुनील शेट्टी यांना विचारण्यात आलं होतं. माध्यमाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुनील शेट्टी म्हणाले, लग्न कुठे आणि कधी होणार, हे तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल. दोघांचे कुटुंबीय किंवा आमची मुलं तुम्हाला या संदर्भात माहिती देतील असेही ते म्हणाले होते.

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये टी-ट्वेंटी मालिका जानेवारीच्या पहिला आठवड्यामध्ये होणार आहे. साहजिकच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या मालिकेसाठी केएल राहुलने सुट्टी मागितली असून, केएल राहुल यादरम्यानच शेट्टी यांच्या मुलीसोबत लग्न करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. मात्र केल राहुलच लग्न अथिया शेट्टी सोबत नाही, तर अथिया आणि राहुल या दोघांच्या एका कॉमन फ्रेंडसोबत लग्न होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, जानेवारीमध्ये हे सुंदर कपल विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत असतानाच, आकांक्षा कपूर. (Akanksha Kapoor) या मैत्रिणी सोबत केएल राहुल लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र दोघांनीही या बातम्यांचे खंडन केलं होतं. आकांक्षा कपूर ही आलिया भट्टची (Alia Bhatt) जवळची मैत्रीण आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी या दोघांची जवळीक वाढण्याला कारण देखील आकांक्षा कपूरच असल्याचं बोललं जातं आहे. आकांक्षा कपूरच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे प्रेमात रूपांतर झालं, आणि दोघेही एकमेकांना डेट करू लागले. मात्र आता केएल राहुल अथिया सिटी सोबत लग्न करणार नसून, तो अकांक्षा कपूरबरोबर लग्न (marriage) करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर (social media) रंगली असल्याने केएल राहुलचे चाहते संभ्रमात आहेत. मात्र या बातमीमध्ये काहीही तथ्य नसून, मीडिया रिपोर्ट नुसार केएल राहुल सुनील शेट्टी यांच्या मुलीबरोबरच लग्न करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या अभिनेत्री सोबतही राहुलचे नाव जोडले गेले

अथिया शेट्टीपूर्वी केएल राहुलच नाव आकांक्षा कपूर आणि निधी अग्रवाल या अभिनेत्रींसोबत देखील जोडले गेले होते. केएल राहुल आणि निधी अग्रवाल हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या प्रसारित देखील झाल्या होत्या. मात्र दोघांकडून आपण एकमेकांना डेट करत नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं. केएल राहुलच लग्न ‘कुक्के श्री सुब्रमण्य’ या मंदिरात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हे देखील वाचा BCCI T20 Plan: रोहितमुळे विराटचा गेला बळी! विराट कोहलीलाही वगळले T20 संघातून; अखेर T-20 कर्णधारपदी हार्दिकच्या नावावर शिक्कामोर्तब..

WhatsApp CASHe: आता व्हाट्सअपवर मिळणार पाच हजार रुपयांचे कर्ज केवळ एका मिनिटात; जाणून घ्या प्रक्रिया..

Second Hand Car: 25 हजारांत मिळतेय जबरदस्त कंडीशन असणारी सेकंड हॅण्ड Maruti Alto; वाचा सविस्तर..

Four Day Working Week: आता कंपनीत आठवड्यात फक्त 4 दिवस करावे लागेल काम, 3 दिवस सुट्टी; एवढंच नव्हे..

DRDO Recruitment: दहावी आणि ग्रॅज्युएट उमेदवारांना या पदासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज..

Physical Relation: शरीराच्या या भागाजवळ स्मार्टफोन ठेवत असाल, तर त्वरित थांबवा; लैंगिक ताकद होतेय कैकपटीने कमी..

LPG Price: घरगुती गॅस आणि व्यवसायिक गॅसच्या दर कमी झाले? काय झाला निर्णय..

Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर..

Relationship tips: महिला आणि पुरुष दोघांचीही सेक्स करण्याची वेळ आहे वेगवेगळी; जाणून घ्या महिलांची सेक्स करण्याची इच्छा कधी होते..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.