WhatsApp CASHe: आता व्हाट्सअपवर मिळणार पाच हजार रुपयांचे कर्ज केवळ एका मिनिटात; जाणून घ्या प्रक्रिया..

0

WhatsApp CASHe: कितीही मोठा इन्कम (income) असला तरी अचानक पैशाची (money) गरज कधी लागेल, हे कोणालाही सांगता येत नाही. एखाद्या वेळेस जर इमर्जन्सीसाठी तुम्हाला पैसे हवे असतील, तर आता तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय तुमच्या व्हाट्सअपच्या (whatsapp) माध्यमातून किंवा एका मिनिटाच्या आतमध्ये पाच हजारांचे लोन सहजरीत्या घेऊ शकता. अनेकांना या सुविधेविषयी माहिती आहे, मात्र काही जणांना अजूनही याविषयी माहिती नाही. जर तुम्हाला देखील या योजनेविषयी माहिती नसेल, तर आम्ही या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत.

पैशाची गरज भासल्यास आता तुम्ही थेट व्हाट्सअपच्या माध्यमातून पाच हजार रुपयांचे कर्ज घेऊ शकता. विशेष म्हणजे, तुम्हाला हे कर्ज कोणत्याही कागदपत्रांशिवाय केवळ एका मिनिटाच्या आतमध्ये उपलब्ध होऊ शकते. काय आहे या संदर्भातली प्रोसेस? जाणून घेऊया सविस्तर. CASHe ही एक कर्ज देणारी कंपनी आहे. जी भारतीय व्हाट्सअप वापरणाऱ्यांना कर्ज देण्याचे काम करते. कंपनीने काही महिन्यापूर्वी Jio Haptik यांच्यासोबत करार केला आहे. या दोघांच्या भागीदारीतून भारतीय व्हाट्सअप कर्त्याना कर्ज देण्याचे काम केले जाते.

कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी तुम्हाला अनेक किचकट प्रक्रियेचा सामना करावा लागतो. यामध्ये तुम्हाला अनेक दस्तावेज, कागदपत्रे विविध प्रकारचे फॉर्म देखील भरावे लागतात. याविषयी तुम्हाला अधिक सांगण्याची गरज नाही. मात्र व्हाट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला जे पाच हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे कोणत्याही प्रकारचा फॉर्म किंवा एप्लीकेशन डाउनलोड करावं लागणार नाही.

CASHe आणि Jio Haptik यांची आपलीच एक कर्जा संदर्भातली प्रक्रिया आहे. युजर्सची पडताळणी झाली की काही संभाषणात्मक प्रक्रियेमधून तुम्हाला क्रेडिट कार्डमध्ये प्रवेश दिला जातो. यामध्ये तुमचा तपशील चेक करण्यासाठी तुमचे नाव, पॅन कार्ड इत्यादीची तपासणी केली जाते. पाच हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्हाट्सअपवर एक नंबर जतन करायचा आहे. त्याच्याशी चॅट करून तुम्ही कर्ज घेऊ शकता. आता आपण सविस्तर प्रक्रिया सोप्या भाषेत जाणून घेऊ.

कागदपत्रांशिवाय व्हाट्सअपवर तुम्हाला पाच हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोन बुकमध्ये “80975 53191” नंबर जतन करायचा आहे. हा नंबर CASHe चा WhatsApp नंबर असणार आहे. तुमचा फोन बुकमध्ये हा नंबर सेव्ह केल्यानंतर, तुम्हाला तुमचे व्हाट्सअप उघडून या क्रमांकावर hiii.. असा संदेश पाठवायचा आहे.

80975 53191 हा क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करून तुमच्या व्हाट्सअप वरून या नंबरवर hii असा मेसेज पाठवल्यानंतर, “nstant credit line” हा पर्याय पाहिला मिळेल. तुम्हाला बरोबर “nstant credit line” यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर (Pan Card) असणरे नाव टाईप करून सेंड करायचं आहे. त्यानंतर AI समर्थित बॉट तुमच्या खात्याची पडताळणी करून उर्वरित प्रोसेस पूर्ण करेल.

तुमच्या खात्याची स्थिती तपासल्यानंतर, जर CASHe च्या नियमामध्ये तुमचं खात बसत असेल, तर व्हेरिफिकेशन करून केवळ तीस ते चाळीस सेकंदामध्ये तुम्हाला पाच हजार रुपये क्रेडिट केलेला मेसेज येईल. जर तुम्हाला पाच हजारांपेक्षा अधिक कर्जाची आवश्यकता असेल, तर तुम्हाला CASHe ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करावं लागणार आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही चार लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता.

हे देखील वाचा Second Hand Car: 25 हजारांत मिळतेय जबरदस्त कंडीशन असणारी सेकंड हॅण्ड Maruti Alto; वाचा सविस्तर..

DRDO Recruitment: दहावी आणि ग्रॅज्युएट उमेदवारांना या पदासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज..

Four Day Working Week: आता कंपनीत आठवड्यात फक्त 4 दिवस करावे लागेल काम, 3 दिवस सुट्टी; एवढंच नव्हे..

Physical Relation: शरीराच्या या भागाजवळ स्मार्टफोन ठेवत असाल, तर त्वरित थांबवा; लैंगिक ताकद होतेय कैकपटीने कमी..

LPG Price: घरगुती गॅस आणि व्यवसायिक गॅसच्या दर कमी झाले? काय झाला निर्णय..

BCCI T20 Plan: रोहितमुळे विराटचा गेला बळी! विराट कोहलीलाही वगळले T20 संघातून; अखेर T-20 कर्णधारपदी हार्दिकच्या नावावर शिक्कामोर्तब..

Chanakya Niti: लग्नानंतर काही दिवसांतच पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या साविस्तर..

Bigg Boss 16: पत्नीच्या जीवावर मोठा झालेल्या गोल्डन मॅनला सिझन संपत आल्यानंतर बिग बॉसमध्ये कशी मिळाली एंट्री? वाचा सविस्तर..

Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.