Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..

0

Golden Guys Bigg Boss: रियल लाईफ आणि रिल लाईफ (real life and reel life) यात खूप फरक आहे. अनेकांना आपलं आयुष्य देखील मोठमोठ्या सेलिब्रिटींसारखं (celebrity)असावं असं वाटत असतं. मात्र हे आभासी जग आहे. समाजामध्ये आपली क्रेझ असावी, असंख्य लोक आपल्याला ओळखत असावीत, असं प्रत्येकाला वाटणं काही गैर नाही. मात्र समाजापुढे आपण कशामुळे चर्चेत राहू हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. अनेकजण गुन्हेगारीच्या माध्यमातून समाजावर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये समाजामध्ये ‘गोल्डन मॅन’ हा देखील एक ट्रेंड पाहायला मिळाला. अनेक जण हातामध्ये, गळ्यामध्ये सोन्याच्या भल्या मोठ्या साखळ्या घालून वावरू लागले. आणि याची खूप मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यामधील काही तरुण देखील गोल्डन बॉईज (golden guys) म्हणून उदयास आले. सनी वाघचौरे (Sunny waghchaure) संजय गुजर (Sanjay gujar) या दोन तरुणांनी देखील गोल्डन बॉईज (golden boys) म्हणून आपली ओळख निर्माण केली ऑडी (Audi) सारख्या महागड्या कार, सोन्याचा मोबाईल (golden mobile) अंगावर कैक किलो सोनं, यामुळे या तरुणांची समाजामध्ये खूप मोठी क्रेझ वाढली.

सनी वाघचौरे आणि संजय गुजर ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ती ‘बिग बॉस’मध्ये (Bigg Boss season 16) केलेला वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे. (Wildcard entry) अंगावर आठ किलो सोनं घालून बिग बॉसमध्ये प्रवेश केलीली ही तरुण पोरं कोण आहेत? असा बिग बॉसच्या जगभरातील असंख्य चाहत्यांना प्रश्न पडला. एवढ्या कमी वयामध्ये या तरुणांनी एवढी मोठी संपत्ती कशी कमवली? असा अनेकांना प्रश्न पडला. Audi, range rover, Jaguar, यासह अनेक महागड्या गाड्या यांनी कसा खरेदी केल्या सहाजिकच हा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याचे पाहायला मिळाले.

सनी वाघचौरे या गोल्डन बॉयची चर्चा अनेक महागड्या गाड्या, अंगावर कैक किलो सोन्यामुळे झाली, त्याच्याहून जास्त चर्चा त्याची एका वेगळ्या कारणामुळे देखील झाली. सनी वाघचौरे याच्यावर त्यांच्या पत्नीनेच आपल्यावर प्राण घातक हल्ला केल्याचा आरोप केला होता. एवढंच नाही, तर मला कौटुंबिक हिंसाचाराला देखील सामोरे जावं लागत असल्याचं तिने आपल्या आरोपांमध्ये म्हटलं होतं. याशिवाय घर उपयोगी वस्तू देखील तो मला माहेरून आणण्यासाठी दमदाटी करतो असं देखील तिने दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटलं आहे.

सनी वाघचौरे यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली? याविषयी ठोस माहिती मिळाली नाही. मात्र ते अनेक सेलिब्रिटींच्या चित्रपटांना प्रोडूसर म्हणून देखील पैसे लावत असल्याची माहिती आहे. सनीची अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटी सोबत चांगली ओळख असल्याचे बोलले जातात मध्यंतरी ‘द कपिल शर्मा’ (the Kapil Sharma) या रिॲलिटी शोमध्ये (reality show) देखील सनी आणि संजय गुजर पाहायला मिळाले होते. या शोमध्ये विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) यांनी हे माझे मित्र असल्याचे म्हणत ओळख देखील करून दिली होती.

अंगावर आठ किलो सोनं range rover, Jaguar, Audi सोन्याचे स्मार्टफोन्स, मोठमोठ्या सेलिब्रेटीं सोबत ओळख, अशी लाईफस्टाईल (lifestyle) असणारा हा तरुण पत्नीला छळ करतो, गर्भपात करण्यासाठी देखील भाग पाडतो, बेल्टने मारहाण, माहेरवरून सोनं घेऊन यायला सांगणे, असे अनेक आरोप त्याच्यावर झाल्याने त्याच्या लाईफस्टाईल बरोबर तो बदनाम देखील तितकाच झाला. या आरोपामुळे त्याने कमावलेली संपत्ती ही त्याच्या पत्नीच्या जीवावर कमावली असल्याचं सोशल मीडियावर बोललं जातं.

या तरुणाचा भंगाराचा व्यवसाय होता, असं देखील बोललं जातं. मात्र त्याच्याकडे इतकं सोनं कुठून आलं? या प्रश्नाची माहिती अधिकृतपणे अजूनही कोणाला मिळालेली नाही. अंगावर इतकं सोनं कुठून आलं? असा प्रश्न त्याला ‘बिग बॉस’ मध्ये देखील विचारण्यात आला, मात्र या प्रश्नाचे उत्तर देणं त्याने टाळलं. सनी वाघचौरे या तरुणाकडे एकूण आठ किलो सोनं असल्याची माहिती आहे. हे सोनं जवळपास पाच कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं समोर आलं आहे.

हे देखील वाचा Bigg Boss 16: पत्नीच्या जीवावर मोठा झालेल्या गोल्डन मॅनला सिझन संपत आल्यानंतर बिग बॉसमध्ये कशी मिळाली एंट्री? वाचा सविस्तर..

KL Rahul Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी नव्हे, या तरूणी सोबत होणार राहुलच लग्न; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण..

BCCI T20 Plan: रोहितमुळे विराटचा गेला बळी! विराट कोहलीलाही वगळले T20 संघातून; अखेर T-20 कर्णधारपदी हार्दिकच्या नावावर शिक्कामोर्तब..

Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर..

WhatsApp CASHe: आता व्हाट्सअपवर मिळणार पाच हजार रुपयांचे कर्ज केवळ एका मिनिटात; जाणून घ्या प्रक्रिया..

Second Hand Car: 25 हजारांत मिळतेय जबरदस्त कंडीशन असणारी सेकंड हॅण्ड Maruti Alto; वाचा सविस्तर..

Four Day Working Week: आता कंपनीत आठवड्यात फक्त 4 दिवस करावे लागेल काम, 3 दिवस सुट्टी; एवढंच नव्हे..

Physical Relation: शरीराच्या या भागाजवळ स्मार्टफोन ठेवत असाल, तर त्वरित थांबवा; लैंगिक ताकद होतेय कैकपटीने कमी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.