Udayanraje Bhosale: उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीसांची काढली लाज; म्हणाले, असला कसला …; पाहा व्हिडिओ..

0

Udayanraje Bhosale: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल (Maharashtra governor) तसेच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यासह अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना पदावरून हटवलं जावं, पक्षातून देखील हकलपट्टी करावी. अशी भूमिका छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी घेतली आहे. यासंदर्भात आज रायगडमध्ये (Raigad) झालेल्या शिवसन्मान निर्धार मेळाव्यात त्यांनी भारतीय जनता पार्टीवर (bjp) अप्रत्यक्ष अनेक वार केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालणारे हे देखील तितकेच दोषी असल्याचं मत उदयनराजे यांनी रायगडमध्ये झालेल्या शिवसन्मान निर्धारामध्ये व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाची दिलेली शिकवण राज्यकर्त्यांनी आपापल्या सोयीने वापरणे सुरू केले असल्याचा घनाघात देखील उदयनराजे यांनी अप्रत्यक्ष भाजपावर केला. त्यावेळी भारताचे तीन तुकडे झाले, आज 30 तुकडे होतील अशी खंत देखील व्यक्त केली.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, (Bhagat Singh Koshyari) मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांना पाठीशी घालत असल्याचे देखील उदयनराजे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेल्या मंडळींविषयी स्पष्ट भूमिका का घेतली जात नाही? असा देखील संताप उदयनराजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

ज्यांच्यामुळे आज आपण जिवंत आहोत, त्यांच्या सन्मानासाठी एकत्र यावं लागत आहे, हे दिवस येतील असं कधीही वाटलं नव्हतं. असं देखील उदयनराजे म्हणाले. राज्यपालांनी केलेल्या विधानानंतर त्यांची तत्काळ पदावरून हकलपट्टी करायला हवी होती. यात कसला आलाय प्रोटोकॉल? चूक ती चूकच असते. राज्यपालांनी केलेल्या विधानानंतर पांघरूण घालणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. असं म्हणत, उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांचं नाव न घेता फटका लगावला.

आझाद मैदानावर आंदोलन

आजचा दिवस हा इतिहासामध्ये लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. निर्धार शिवसन्मानाचा यासाठी आपण सगळेजण जमलो आहोत, ही एक ऐतिहासिक तारीख आहे. आजचा दिवस इतिहासात कोरला गेला आहे. असे देखील उदयनराजे म्हणाले. लवकरच आपल्याला एक तारीख ठरवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाकरिता मुंबईच्या आझाद (Azad maidan) मैदानावर जमावं लागणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

हे देखील वाचा Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..

KL Rahul Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी नव्हे, या तरूणी सोबत होणार राहुलच लग्न; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण..

Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर..

Bigg Boss 16: पत्नीच्या जीवावर मोठा झालेल्या गोल्डन मॅनला सिझन संपत आल्यानंतर बिग बॉसमध्ये कशी मिळाली एंट्री? वाचा सविस्तर..

Second Hand Car: 25 हजारांत मिळतेय जबरदस्त कंडीशन असणारी सेकंड हॅण्ड Maruti Alto; वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.