YouTube First Video: यूट्यूब वरील सर्वात पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला का? त्या व्हिडिओने कमावलेत एवढे..

0

YouTube First Video: जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म अशी ओळख असलेल्या युट्युबवर कोण व्हिडिओ पहात नसेल तर आश्चर्य वाटण्यासारखेच आहे. आज प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल मध्ये युट्युब (YouTube) पहिल्यापासूनच इन्स्टॉल केलेले असते. त्यामुळे बऱ्याच लोकांना युट्युब सहजासहजी उपलब्ध होते. आज युट्युब वर प्रत्येक गोष्ट सर्च करून बघितली जाते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर देखील युट्युब व्हिडिओ बनवण्यात आले आहेत. त्यामुळे युट्युब वर आपण दिवसातून एकदा तरी व्हिडिओ पाहण्यासाठी जात असालच. यूट्यूबवर (YouTube First Video) एकापेक्षा एक असे वरचढ व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत.

 

यूट्यबची (YouTube First Video) स्थापना होऊन 14 फेब्रुवारी 2005 मध्ये झाली. अर्थात यूट्यूबचे सध्या 18 व्या वर्षात पदार्पण झाले आहे. आज यूट्यूबवर सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यूट्यूब बऱ्याच लोकांना जगण्याची कला शिकवते. लातूर येथील एका खेड्यातला प्रतिक नावाचा तरुण सांगतो, कोरोना काळात देशभर लॉकडाउन घोषित करण्यात आले होते. या काळात सगळे लोक आपापल्या घरात होते. तेव्हा मी यूट्यूबवर (YouTube) जास्त सक्रिय झालो होतो. मी लॉकडाऊन मधील बराच काळ यूट्यूबवर घालवला. यूट्यूब बघत असताना मला एक व्यवसाय सापडला, त्याचा मी खूप दिवस अभ्यास केला. बऱ्याच अभ्यासानंतर मी व्यवसायाला सुरुवात केली, आज मी त्या व्यवसायातून महिन्याला 50 हजार कमवत आहे.

 

एक तरुण यूट्यूब (YouTube) व्हिडिओ काय बघतो आणि त्याच व्यवसायाचा अभ्यास देखील तेथूनच करतो आणि आज महिन्याला 50 हजार कमावतो. एवढं मोठं व्यासपीठ यूट्यूब आहे. मध्यंतरी एका पंक्चर काढणाऱ्या बापाचा मुलगा आज 25 लाख रुपयांची गाडी घेऊन फिरतो, तेही यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करून. यूट्यूबने सर्वसामान्यांच्या मुलांना स्टार बनवले आहे. बरेच सर्वसामान्य लोक यूट्यूबच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. याच यूट्यूबवर पहिला व्हिडिओ कसा होता जाणून घेऊया.

 

आज वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये यूट्यूब व्हिडिओ पाहायला मिळतो. एवढंच नव्हे तर व्हिडिओचे थंबनेल देखील जबरदस्त असतात. परंतु 17 वर्षांपूर्वी युट्युबचे सहसंस्थापक (Co-founder) जावेद करिम यांनी Jawed या नावाने यूट्यूब चॅनल तयार करून यूट्यूबवरून पहिला व्हिडिओ (YouTube First Video) शेअर केला होता. हा यूट्यूबवर पोस्ट करण्यात आलेला पहिलाच व्हिडिओ होता. जावेद करीम यांनी हा व्हिडिओ केवळ 19 सेकंदाचा बनवला होता. या व्हिडीओमध्ये खुद्द जावेद दिसत असून, तो San Diego Zoo मध्ये पिंजऱ्यामध्ये असणारे हत्ती दाखवताना पाहायला मिळत आहे. Me at the zoo असं या व्हिडीओला टायटल देण्यात आले आहे.

 

24 एप्रिल 2005 ला यूट्यूबवर हा 19 सेकंदाचा पहिला (YouTube First Video) पोस्ट करण्यात आला होता. जावेद करीम यांनी त्यांच्या चॅनलवर केवळ एकच व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडियोला अद्याप 249 मिलियन पेक्षा अधिक म्हणजेच जवळपास 25 कोटी व्ह्यूज आहेत. 1 कोटी 12 लाख 18 हजार 86 कमेंट्स आहेत. तर जावेद करीम यांच्या Jawed या यूट्यूब चॅनलला 3.19 M म्हणजेच 31 लाख 90 हजार सबस्क्राइबर आहेत. त्यांनी फक्त यावरून एकच व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कुठलाही थंबनेल नाही. यूट्यूबची स्थापना चैड हर्ले, स्टीव चेन आणिचैड हर्ले, स्टीव चेन और जावेद करीम जावेद करीम या तिघांनी मिळून 2005 मध्ये केली होती. YouTube वर How To Kiss अर्थात किस कसा करायचा? हे सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.

हेही वाचा: youtube income: या नियमात राहून YouTube वर हे व्हिडिओ अपलोड केल्यास मिळतील लाखों रुपये..

Relationship: जोडीदाराकडून या 5 अपेक्षा कधीच ठेवू नका, अन्यथा नक्कीच होईल घटस्फोट..

Job: काम न करता 1 कोटी पगार, तरीही पट्ट्या म्हणतोय नको झालंय जीवन; पाहा काय आहे भानगड..

Maruti Jimny 7 Seater उठवणार आहे Mahindra Thar चा बाजार, गाडी एवढी नादखुळाय की..

Chanakya Niti: पत्नी नेहमी पतीपासून या 3 गोष्टी लपवून ठेवते, त्यातली दुसरी आहे खूपच धोकादादक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.