Maruti Jimny 7 Seater उठवणार आहे Mahindra Thar चा बाजार, गाडी एवढी नादखुळाय की..

0

Maruti Jimmy 7 Seater: आपल्याकडे महिंद्रा थारला (Mahindra Thar) खूपच मागणी असल्याचे पाहायला मिळते. महिंद्रा थार (Mahindra Thar) घेण्याचे बऱ्याच लोकांचे अद्याप देखील स्वप्न आहे. कारण या गाडीचा थाट देखील तसाच आहे. अगदी आमदार, खासदार, मंत्र्यांना देखील या गाडीने भुरळ पडलेली आपल्याला पाहायला मिळते. भल्या भल्या गाड्यांपुढे थार उठून दिसते. त्यामुळे गाडीची क्रेझ काही कमी व्हायला तयार नाही. आजदेखील बऱ्याच लोकांना ही कार आपल्याकडे असायला हवी, असे वाटते.

 

Mahindra Thar मध्ये नव्या वर्षात एक अपडेट पहायला मिळणार आहे, परंतु त्यामुळे गाडीची किंमत देखील महागणार आहे. कारण Mahindra Thar चे 5 डोअर व्हेरियंट लवकरच बाजारात दिसणार आहे. यामध्ये सध्याच्या थारच्या तुलनेने गाडीमध्ये जास्त जागा आणि नवीन वैशिष्ट्ये पाहायला मिळणार आहेत. परंतु या नव्या व्हेरियंटची किंमत देखील पूर्वीच्या गाडीच्या तुलनेत अधिक असणार आहे. सध्याच्या Mahindra Thar ची किंमत 13.69 लाख ते 16.29 लाख रुपये (एक्स शोरुम) एवढी आहे. परंतु Mahindra Thar 5 Door ची किंमत यापेक्षा अधिक असणार आहे. त्यातच आता बाजारात Mahindra Thar ला टक्कर देण्यासाठी Maruti Jimny 7 Seater लवकरच बाजारात येत आहे.

 

Maruti Jimny या SUV ची प्रतीक्षा बऱ्याच दिवसांपासून केली जात आहे. या गाडीच्या टेस्टिंगचे बरेच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. असं देखील बोलले जात आहे की, 2023 मध्ये 5 डोअर असलेले व्हेरियंट बाजारात येऊ शकते. थोड्या दिवसांपूर्वी मारुती सुझुकी जिम्नीच्या 5 डोअर व्हेरियंटचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते 7 सीटिंग पर्यायांसह दिसत आहे. त्यामुळे नक्की कोणत्या व्हेरीयंमध्ये गाडी बाजारात येणार आहे, याची उत्सुकता Maruti Suzuki च्या चाहत्यांना लागलेली आहे.

 

5 दरवाजे असणारी मारुती सुझुकी जिम्नी (Maruti Suzuki Jimny 7 Seater) ही जागतिक बाजारपेठेत विकली जाणाऱ्या 3-दरवाजे असणाऱ्या जिमनी सिएराची थोडी मोठ्या आकाराची आवृत्ती आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गाडीला काळ्या अलॉय व्हील आणि पाठीमागच्या डोअरवर स्पेअर व्हील सह डोअर हँडल पाहायला मिळत आहे. तसेच, गाडीमध्ये सीट्सवर लाल रंगाची अपहोल्स्ट्री पाहायला मिळत आहे. त्यामुळे लूक आणि डिझायान मध्ये देखील गाडी खूपच जबरदस्त असल्याचे पाहायला मिळते.

 

असा अंदाज लावण्यात येत आहे की, मारुती सुझुकी 5 सीटर वर्जनला बाजारात आणणार आहे, ज्यामध्ये 7 सिटचा (Maruti Suzuki Jimny 7 Seater) पर्याय देखील असू शकतो, असा अंदाज जाणकारांनी लावलेला आहे. याबाबत Maruti Suzuki कंपनीने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु सध्या बाजारात Mahindra Thar ला टक्कर देण्यासाठी गाडीची वैशिष्टे देखील भन्नाट असतील, यात काही शंका नाही. यामध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम (Touchscreen Infotainment System), इलेक्ट्रिक विंडो (Electric Windows) आणि एअर कंडिशनिंग (Air Conditioning) आणि स्टिअरिंग व्हील (Steering Wheel) हे फीचर्स मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Job: काम न करता 1 कोटी पगार, तरीही पट्ट्या म्हणतोय नको झालंय जीवन; पाहा काय आहे भानगड..

Tata Blackbird : लवकरच बाजारात येणार टाटा  ब्लॅकबर्ड बाजारात; लोकांना का आहे या कारची एवढी उत्स्कुता?

Mahindra Thar: महिन्यांत तब्बल ५ हजाराहून अधिक विक्री; का एवढी लोकप्रिय झालीय थार? जाणून घ्या, किंमत,वैशिष्ट्ये, आणि बरंच काही..

Malaika Arora: ..म्हणून दिला घटस्फोट; घटस्फोटवर बोलताना मलायकाने ते सगळंच सांगून टाकलं..

Virender Sehwag Son: वीरेंद्र सेहवाग पेक्षाही आक्रमक फटकेबाजी करतो सेहवागचा मुलगा; या संघाकडून खेळण्याची मिळाली संधी, पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.