Virender Sehwag Son: वीरेंद्र सेहवाग पेक्षाही आक्रमक फटकेबाजी करतो सेहवागचा मुलगा; या संघाकडून खेळण्याची मिळाली संधी, पाहा व्हिडिओ..

0

Virender Sehwag Son: पहिल्या चेंडूपासूनच गोलंदाजाला सळो की पळो करून सोडणारा भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (virender sehwag) अनेकांना आपल्या फलंदाजीचे वेड लावले होते. अजूनही क्रिकेटचे चाहते (cricket fan) विरेंद्र सेहवागची फलंदाजी पाहतात. आता सेहवागप्रमाणे त्याचा मुलगाचाही फलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

(Virender Sehwag batting) क्रिकेटचा फॉरमॅट कोणताही असो, वीरेंद्र सेहवागची क्रिकेट खेळण्याची एक विशिष्ट शैली होती. टेस्ट क्रिकेटमध्ये देखील आपला आक्रमक खेळ वीरेंद्र सेहवागने कधीही सोडला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये सलामवीरांना चेंडू सोडून देवून जुना करायचं काम देण्यात आलेलं असतं. मात्र वीरेंद्र सेहवागने हा नियम बदलून, चेंडूला फटके मारून चेंडू जुना करण्याचे तंत्र अवलंबले आणि यात यश देखील मिळवले.

वीरेंद्र सेहवाग सारखा सलामीवीर अजूनही भारताला मिळाला नाही. मात्र आता वीरेंद्र सेहवाग प्रमाणेच त्याचा मुलगा आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आर्यवीरने (aryaveer Sehwag son) आपल्या फटकेबाजीच्या जोरावर सगळ्यांना मोहित केलं आहे. भारतीय क्रिकेटच्या अंडर 16 (Indian cricket team under16) संघामध्ये आर्यविरला स्थान मिळाले असून, आता तो आपला जलवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

बीसीसीआयने (BCCI) आयोजित केलेल्या विजय मर्चंट ट्रॉफीसाठी (Vijay merchant trophy) सेहवागचा मुलगा आता भारताकडून अंडर 16 संघातून खेळणार आहे. आर्याविर आता पंधरा वर्षाचा असून, त्याचा फलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (Viral) झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत सेहवागचा मुलगा सेहवाग प्रमाणेच जबरदस्त फटके मारताना पाहायला मिळत आहे. सेहवाग पेक्षाही अधिक तंत्रशुद्ध पद्धतीने तो फ्रंट फूटवर देखील खेळताना दिसत आहे.

दिल्लीचा संघ बिहार विरुद्ध सामना खेळत आहे. परंतु सेवागचा मुलगा आर्यविरला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नाही. नेटमध्ये तो सराव करताना मारत असलेले उत्कृष्ट फटके पाहता लवकर त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. वीरेंद्र सेहवागच्या मुलाची प्रोफेशनली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता एन्ट्री झाली असून, सेहवागचा मुलगा सेहवाग प्रमाणेच आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

असा आहे अंडर-16 विजय मर्चेंट ट्रॉफीचा दिल्ली संघ:

आर्नव बग्गा (कर्णधार), सार्थक रे (सलामीवीर) प्रणव, सचिन, श्रेय सेठी (विकेटकीपर), अनिंदो, लक्ष्मण प्रियांशु, उद्धव मोहन, ध्रुव, नैतिक माथुर, किरित कौशिक शांतनु यादव, मोहक कुमार आणि आर्यवीर सहवाग.

हे देखील वाचाMalaika Arora: ..म्हणून दिला घटस्फोट; घटस्फोटवर बोलताना मलायकाने ते सगळंच सांगून टाकलं.. 

Pradhan Mantri Awas Yojana: घरकुल लाभार्थ्यांना आता जागा खरेदीसाठी मिळणार अधिकचे पन्नास हजार; वाचा सविस्तर..

Ration Card: रेशन घेतल्याचा SMS तुम्हाला येतो का? SMS द्वारे कळतंय दरमहा किती रेशन घेतले, जाणून घ्या लगेच..

Urea Subsidy: युरिया खरेदीची चिंता मिटली; सरकार देतय 2,700 रुपये अनुदान, असा घ्या लाभ..

Physical Relation: शरीराच्या या भागाजवळ स्मार्टफोन ठेवत असाल, तर त्वरित थांबवा; लैंगिक ताकद होतेय कैकपटीने कमी..

india new coach: रोहित नंतर आता राहुल द्रविडचीही टीम इंडियाच्या कोच पदावरून हकालपट्टी; धोनी, सेहवागसह हे दिग्गज रेसमध्ये..

IND vs BAN: कॅच सुटल्यानंतर रोहित शर्माने या दोन खेळाडूंना दिल्या आयमाय वरून शिव्या; व्हिडिओ पाहून तुमचाही होईल संताप..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.