india new coach: रोहित नंतर आता राहुल द्रविडचीही टीम इंडियाच्या कोच पदावरून हकालपट्टी; धोनी, सेहवागसह हे दिग्गज रेसमध्ये..

0

India New Coach: 19 वर्षापासून भारतीय क्रिकेट संघाला (indian cricket team) कोणतीही आयसीसी ट्रॉफी (ICC trophy) जिंकता आलेली नसल्याने आता बीसीसीआयने (BCCI) कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. कसोटी क्रिकेट (test cricket) आणि bilateral सिरीजमध्ये (bilateral series) विराट कोहलीचा जबरदस्त रेकॉर्ड असून, देखील आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नसल्याने, विराट कोहलीची (Virat Kohli) बीसीसीआयने कर्णधार पदावरून हकालपट्टी केली. आयपीएलमध्ये कर्णधार (IPL captain) म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधार पदाची सुत्रे देण्यात आली. मात्र रोहित शर्मा सपशेल अपयशी ठरल्याने आता बीसीसीआयने कडक पावले उचलली आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये (T20 World Cup) भारतीय संघाने सुमार कामगिरी केल्याने BCCI ने आगामी विश्वचषकासाठी आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात पहिलं पाऊल बीसीसीआयने निवड समिती बरखास्त करून सुरुवात केली. आता टी-ट्वेंटी क्रिकेट संघाचा कर्णधारपदी देखील हार्दिक पांड्याची निवड निश्चित केली आहे. अधिकृत घोषणा बाकी असली तरी, जानेवारीमध्ये नवीन निवड समिती स्थापन झाल्यानंतर घोषणा करण्यात येणार आहे.

रोहित शर्माची t-20 क्रिकेट कर्णधार पदावरून हकलपट्टी केल्यानंतर, आता भारतीय क्रिकेट संघाचा कोच राहुल द्रविड Indian cricket team coach Rahul Dravid sacked) याची देखील टी-ट्वेंटी संघाच्या प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

बीसीसीआय भारतीय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये वेगवेगळा कर्णधार आणि वेगवेगळ्या प्रशिक्षकांची निवड करणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून सूत्रांना देण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने आशिया कप (Asia Cup) दक्षिण आफ्रिका दौरा (South Africa tour) आणि वर्ल्डकपमध्ये (World Cup) केलेल्या सुमार कामगिरीची दखल बीसीसीआयने घेतली आहे. काल नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेश आणि भारत (IND vs BAN) यांच्यामधील पहिल्या एकदिवसीय (first ODI) सामने देखील भारतीय संघाला पराभव पत्करावा लागल्याने आता या हालचालींना आणखी वेग आला आहे. (India lost first ODI) या संदर्भातली माहिती बीसीसीच्या अधिकाऱ्यांनी inside स्पोर्टला दिली आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी महेंद्रसिंग धोनी Mahendra Singh Dhoni वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) माईक हेसन या तिघांची नावे सध्या चर्चेत आहेत. फक्त कसोटी क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी राहुल द्रविड यांना कायम ठेवायचे की नाही, याविषयी देखील चर्चा सुरू असल्याचे BCCI च्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे .मात्र T-20 आणि वनडे क्रिकेटच्या (ODI cricket) प्रशिक्षक पदावरून राहुलची हाकलपट्टी निश्चित मानली जात आहे. टी-ट्वेंटीसाठी वीरेंद्र सेहवाग, तर वनडेसाठी महेंद्रसिंग धोनीच नाव निश्चित करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून कळते आहे.

महेंद्र सिंग धोनी

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी ट्वेंटी वर्ल्डकप त्याचबरोबर 50 षटकाचा विश्वचषक आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवलं होतं. महेंद्रसिंग धोनीचा 50 षटकांच्या सामन्यातला अनुभव भारतीय संघाला पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्वचषकात कामी येऊ शकतो, असा विश्वास बीसीसीआयला वाटत आहे. त्यातच राहुल द्रविडवर तिन्ही फॉरमॅटच्या कोचचा वर्कलोड (workload management) प्रचंड असल्याने हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वीरेंद्र सेहवाग

आक्रमक फलंदाजी बरोबरच वीरेंद्र सेहवाग आक्रमक इंटेंटसाठी देखील ओळखला जातो. भारतीय संघाचा ट्वेंटी खेळण्याचा अप्रोच पाहता खेळाडूंना मुक्तपणे खेळ करण्यास सांगणारा नवीन प्रशिक्षक हवा असल्याचं BCCI चे म्हणणे आहे. t20 खेळण्याची पद्धत बदलावी लागणार असल्याचं रोहित शर्माने देखील म्हटलं होतं, मात्र कर्णधार झाल्यानंतर, पॉझिटिव अप्रोच ना त्याच्या खेळात दिसला, ना इतर खेळाडूंच्या खेळात. साहजिकच यामुळे आता कॅप्टन बरोबरच t20 क्रिकेट साठी नवीन आक्रमक कोचची देखील BCCI नियुक्ती करणार आहे. यासाठी सेहवागचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.

हे देखील वाचा IND vs BAN: कॅच सुटल्यानंतर रोहित शर्माने या दोन खेळाडूंना दिल्या आयमाय वरून शिव्या; व्हिडिओ पाहून तुमचाही होईल संताप..

Sayali Sanjeev Ruturaj Gaikwad: सायली संजीवने मान्य केले हे नाते, म्हणाली आम्ही दोघे एकमेकांचे ..

KL Rahul Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी नव्हे, या तरूणी सोबत होणार राहुलच लग्न; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण..

MI Cape Town: IPL 2023 पूर्वी नीता अंबानींचा मास्टर स्ट्रोक; मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद राशिद खानकडे..

Pregnancy Tips: या दिवसांत संबंध ठेवल्यास लगेच राहाल गरोदर..

Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..

Golden Guys: औषध देऊन पत्नीचा गर्भपात, बाहेरील स्त्रियांशी संबंध; सनी विषयी माहिती नसलेल्या या गोष्टी जाणून सरकेल पायाखाली जमीन..

Bigg Boss 16: पत्नीच्या जीवावर मोठा झालेल्या गोल्डन मॅनला सिझन संपत आल्यानंतर बिग बॉसमध्ये कशी मिळाली एंट्री? वाचा सविस्तर..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.