youtube income: ‘या’ नियमात राहून YouTube वर ‘हे’ व्हिडिओ अपलोड केल्यास मिळतील लाखों रुपये..

0

youtube income: अलीकडच्या काळात अनेक युट्युबर यूट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये कमवत असल्याचं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. आठवड्यातून एखादा व्हिडिओ युट्युबवर अपलोड करून देखील अनेकजण लाखो रुपये कमावतात. तुमच्याकडे जर क्रिएटिव्हिटी असेल, आणि तुम्ही जर यूट्यूबच्या नियमांचं पालन केलं तर तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला याच विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

यूट्यूबच्या माध्यमातून अनेक जण लाखो रुपये कमवत असल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, मात्र फक्त युट्युबवर व्हिडिओ अपलोड करून पैसे मिळत नाहीत. त्यासाठी काही स्ट्रिक देखील वापराव्या लागतात. बेरोजगारीच्या दुनियेत युट्युबवर रोजगार निर्माण करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. या मधून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह तर करू शकताच, मात्र यूट्यूबच्या माध्यमातून अनेकांना तूम्ही रोजगार देखील उपलब्ध करून देऊ शकता. अनेक जण या क्षेत्राकडे वळले आहेत. मात्र अनेकांना युट्युब वरून पैसे कसे मिळवायचे याविषयी माहिती नाही, अनेक जण फक्त युट्युबवर व्हिडिओ अपलोड करतात. मात्र त्याच्या टेक्निकल गोष्टी जाणून घेत नाहीत.

Youtube Partner Program धोरणाची पूर्तता करणे आवश्यक

फक्त युट्युबवर अनेक दर्जेदार व्हिडीओ अपलोड करून पैसे मिळतील असं नाही, त्यासाठी तुम्हाला युट्यूब पार्टनर प्रोग्राम म्हणजेच (YPP) नावाच्या धोरणाची पूर्तता करणे आवश्यक आहे. YPP नावाच्या धोरणाची पुर्तता करणाऱ्या वापरकर्त्यांनाच YouTube पैसे देण्याचे काम करते. यूट्यूबच्या माध्यमातून जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील, तर तुमचं YouTube चैनल हे Youtube Partner Program चा भाग असणे आवश्यक आहे. आता (YPP) चा भाग होण्यासाठी वापरकर्त्यांना काय करावं लागते, याविषयी देखील आपण जाणून घेऊयात.

Youtube Partner Program चा भाग होण्यासाठी करावे लागते हे काम 

युट्युबवर जर तुम्ही इन्कम करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला यूट्यूब चैनल उघडावे लागेल. आणि या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करावे लागतील. फक्त व्हिडिओ अपलोड करून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, त्यासाठी तुमचं युट्युब चॅनल हे Youtube Partner Program चा भाग असावे लागते. Youtube Partner Program मध्ये सामील होण्यासाठी तुमचे किमान एक हजार सबस्क्राईबर असणे आवश्यक आहे. तुम्ही या संदर्भात युट्युब स्टुडिओला भेट देऊन याविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता.

Youtube Partner Program चा सदस्य होण्यासाठी तुमच्याकडे फक्त एक हजार सदस्यत्व असुनही चालत नाही, त्यासाठी तुम्हाला साधारण एक दीड महिना काही व्हिडिओ अपलोड करावे लागतात. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या चॅनेलवर एकच व्हिडिओ वारंवार अपलोड करूनही चालत नाही. जर ही बाब youtube च्या लक्षात आली, तर तुम्हाला यातून बाहेरचा रस्ता दाखवला जातो. अनेकांना असं वाटू शकतं, यूट्यूब पार्टनर प्रोग्रामचा सदस्य झाल्यानंतर आपण आता कसलेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करू शकतो, तर तसही नाही. याविषयी देखील आपण सविस्तर आपण जाणून घेऊया.

सदस्य होऊनही या नियमांचे करावे लागेल पालन

अनेकांचा असा समज असतो, एकदा का आपण Youtube Partner Program चा सदस्य झालो की, आपल्याला चिंता नाही. मात्र असं अजिबात नाही, यूट्यूबच्या नियमांचं पालन आपल्याला नेहमी करावं लागतं. अन्यथा यूट्यूब आपला चॅनेल बंद देखील करू शकतं. अनेक जण युट्यूबवर टाकलेले व्हिडिओ अनेकदा अपलोड करतात, मात्र असे केल्यास युट्युब ॲक्शन घेऊन तुमचं सदस्यत्व रद्द करू शकतं.

हे व्हिडिओ चुकूनही अपलोड करू नका

युट्युबवर काय अपलोड करावे, यापेक्षा आपण काय अपलोड करू नये? याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. Youtube Partner Program चे सदस्य झाल्यानंतर, चुकूनही तुम्ही समाजात तेढ निर्माण होणारे व्हिडिओ अपलोड करून चालत नाही. याबरोबरच जातीय सलोखा बिघडवण्यासंदर्भात देखील तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागते.

या नियमांचे जर तुम्ही पालन केले नाही, आणि ही बाब यूट्यूबच्या लक्षात आली तर, तुमचे यूट्यूब चॅनल बंद देखील करण्याचा अधिकार युट्युबला आहे. वरील सर्व नियमांचे पालन करून जर तुम्ही युट्युबवर उत्तम रित्या क्रिएटिव्हिटीचे प्रदर्शन केले, तर तुम्ही युट्युबवर महिन्याला दोन लाखांपर्यंत इन्कम मिळवू शकता.

हे देखील वाचा effects of lack of sex: शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

Video viral: धारधार शस्त्राने वार करून तरुणाचे भर रस्त्यावर केले तुकडे- तुकडे; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

second hand Hero Splendor Plus: दहा हजार किलोमीटर पळालेली hero-splendor-plus मिळतेय फक्त २१ हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

Viral video: बाप-लेकीचा आणि बहीण-भावाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही रोखू शकणार नाही अश्रू; मुलगी असावी तर अशी..

Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..

Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.