Video viral: धारधार शस्त्राने वार करून तरुणाचे भर रस्त्यावर केले तुकडे- तुकडे; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

0

Video viral: प्रेमाने जग जिंकता येते याविषयी नव्याने सांगण्याची गरज नाही, मात्र हेच प्रेम तुमच्या जीवावरही बेतू शकतं. याविषयी देखील तुम्हाला सांगण्याची गरज नाही. प्रेमप्रकरणातून (Love affair) अनेकांची हत्त्या केल्याच्या घटना घडल्याच्या तुम्ही अनेकदा पहिल्या असतील. मात्र काही घटना इतक्या भयंकर असतात की, त्या पाहिल्यानंतर तळपायाची आज मस्तकात तर जातेच, पण आपण नक्की माणूस आहोत का? यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होणाऱ्या असतात. अशीच एक घटना भंडाऱ्यात घडली असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

तरुण-तरुणी एकमेकांवर प्रेम करणं हे काही नवीन राहिले नाही. आपल्या परिसरात आसपास अनेक तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात असतात. काहीजण उघडपणे भेटतात, तर काहीजण समाजाच्या भीतीमुळे गुपचूप भेटतात. यात आता विशेष असं काही राहिले नाही. मात्र हे प्रेम प्रत्येकालाच सहन होईल असं नाही. मुला-मुलींच्या घरच्यांना जर हे प्रेम प्रकरण समजलं, तर अनेक जण मुलाचा किंवा मुलीचा काटा काढण्याचा डाव आखतात. खासकरून अशा प्रकरणामध्ये मुलाचा ब ळी जाताना आपण नेहमी पाहतो. या घटना आपल्याला नवीन नाहीत. मात्र आता तुमसर शहरात यापेक्षाही भयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सचिन मस्के (Sachin maske) या तरुणाचे एका मुलीसोबत प्रेम संबध होते. हे दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. मात्र या दोघांच्या प्रेमाला घरच्यांची परवानगी नसल्याने, हे दोघेही लपून-छपून एकमेकांना भेटत होते. हे दोघेही सतत एकमेकांसोबत फोनवर देखील बोलत असत. हे दोघेही एकमेकांच्या फोनवर देखील सतत बोलत आहेत, ही बाब घरच्यांना माहिती होती. पाच सहा दिवसांपुर्वी सचिन आपल्या प्रेयसीला घेऊन पळून गेला. दोन दिवस हे दोघेही गायब होते. मुलीच्या घरच्यांनी तुमसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर, हे दोघेही आपापल्या घरी परतले.

प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेल्यानंतर दोघेही आपापल्या घरी परतल्यानंतर, परिसरातील अनेकांना हे प्रकरण माहिती पडलं, आणि या सगळ्यांचा संताप म्हणून, या तरुणीचा भाव संतापला. काहीही करून सचिन मस्के या तरुणाचा काटा काढायचा त्याने निर्धार केला. सचिनला या प्रकरणामुळे आपला जी व जाणार आहे, याची जराही कल्पना नव्हती. मात्र या नराधमाने सचिनला कायमच संपवण्याचा निर्धार केला होता, यासाठी त्यांनी सुनियोजित क ट देखील आखला.

असा आखला प्लान

ठरल्यानुसार, सचिन मस्केचा खेळ खल्लास करायच्या उद्देशाने सचिनला तिघांपैकी एकाने आपल्या गाडीवर बसवून आणले. सचिनला आपल्या गाडीवर बसवून शहराच्या बाहेर एका रस्त्याच्या कडेला उतरवण्यात आलं. ज्या ठिकाणी सचिनला उतरवण्यात आलं, त्या ठिकाणी सुरा घेऊन एक व्यक्ती तयारच होता. पुढच्या काही मिनिटांत आपला जीव जाणार आहे, याची जराही कल्पना सचिनला नव्हती. सुरा असणारा व्यक्ती धावत धावत सचिन जवळ आला, आणि सचिनच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करू लागला.

नराधमांनी केलेल्या या हल्ल्यात सचिन धारातीर्थी पडला. मात्र तरी देखील या नराधमांनी त्याच्यावर दया मया दाखवली नाही. सचिन मस्के खाली पडल्यानंतर, नराधमाने त्याला रस्त्याच्या मध्यभागी आणून कोयत्याने त्याच्या मानेवर वार केले. या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा हृदय पिळवटून टाकणारा घटनाक्रम कैद झाला आहे. या व्हिडिओत या नराधमाने सचिनवर सपासपा केलेले, वार पाहून काळजाचं पाणी पाणी होत आहे.

या हल्ल्यात सचिन तडफडत होता, मात्र या नराधमाना याचा कसलाही फरक पडत नव्हता. सचिनचा जीव गेला तरी या नराधमाने सचिनचे बारीक-बारीक तुकडे केल्याचेही या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. भरदिवसा भररस्त्यात या नराधमाने सचिनवर निर्घृणपणे वार केले. रस्त्याने ये-जा करणारे अनेक जण हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. मात्र एकानेही सचिनला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला आहे. आता या तिन्हीं आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या तिघांवर आता ह त्ये चा गु न्हा नोंदवला असून, पोलीस आता कायदेशीर कारवाई करत आहेत.

 हे देखील वाचा Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

dog run behind the bike: धावत्या टू-व्हीलर मागे कुत्रं का पळतं? बाहेरगावी जाताना गाडी स्वच्छ धुवल्याने प्रवासात बाधा येत नाही, असं पुर्वज का म्हणायचे

Registered Mobile Numbers: या सोप्या पद्धतीने चेक करा तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत; आणि या अडचणींपासून स्वतःला वाचवा..

Viral video: खोड काढली दुसऱ्याने आणि शिकार झाला वयोवृद्ध! यामुळे वळूने वृद्धाला शिंगावर घेऊन चेंडूसारखं हवेत फेकून दिलं..

Viral Video: देव तारी त्याला कोण मारी! कंटेनर पलटी होऊनही वाचला हा तरुण; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.