Viral video: खोड काढली दुसऱ्याने आणि शिकार झाला वयोवृद्ध! यामुळे वळूने वृद्धाला शिंगावर घेऊन चेंडूसारखं हवेत फेकून दिलं..

0

Viral video: सोशल मीडिया (social media) हे व्हायरल व्हिडीओचे (viral video) व्यासपीठ बनलं आहे हे तुम्ही देखील मान्य कराल. सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होतात. खासकरून प्राण्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.(Viral Videos of Animals) प्राण्यांचे हे व्हिडिओ अनेकांना आवडतात देखील. कधी-कधी तुमची काहीही चूक नसताना, तुम्हाला लोकांनी केलेला चुकीचे परिणाम भोगावे लागतात. याच संदर्भातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रस्त्याने सायकलवरून जात असणाऱ्या एका वयोवृद्ध माणसाला वळूने आपल्या शिंगावर घेऊन, चेंडूसारखं हवेत फेकून दिलं. (Bull Attack Video) यात हा वयोवृद्ध बेशुद्ध पडला आहे‌. मात्र वळूने असं का केलं? याचे कारण जाणून तुम्ही देखील वळू विषयी संवेदना व्यक्त कराल.

काहीही संबंध नसताना लोकांनी केलेल्या चुकीचे अनेकदा आपल्याला देखील परिणाम भोगावे लागतात. याची अनेक उदाहरणे तुम्हाला माहिती असतील. तुमच्या देखील बाबतीत असा प्रकार घडला असेल. हाच प्रकार रस्त्याने सायकलवरून जात असणाऱ्या बिचाऱ्या वयोवृद्धा सोबतही घडला आहे. सायकलवरून रस्त्याने जात असताना अचानन एका वृद्धाला वळूने आपल्या दोन्हीं शिंगावर घेऊन चेंडू सारखं हवेत फेकून दिलं. ही धडक एवढी भयंकर होती की, या धडकेमुळे हा वृद्ध जागीच बेशुद्ध पडला.

काय घडलं नेमकं? 

एका रस्त्यावर वळू उभा राहिल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू आहे. तेवढ्यात त्या वळूच्या अंगावरून कोणीतरी पाणी टाकी टाकतं. आणि मग मात्र हा वळू प्रचंड संतापल्याचे दिसत आहे. वळूच्या अंगावरून कोणीतरी विनाकारण पाणी टाकल्याचं पाहायला मिळत आहे, मात्र पाणी वरुन आल्याने तो काहीही करू शकत नाही. मात्र या सगळ्याचा राग तो रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांवर काढताना पाहायला मिळत आहे.

विनाकारण वळूच्या अंगावर पाणी टाकल्यानंतर वळू प्रचंड संतापल्याचे दिसत आहे. आणि यानंतर वळू रस्त्याने येणाऱ्या टू-व्हीलरच्या अंगावर धावताना पाहायला मिळतो. मात्र टू-व्हिलर भरधाव वेगाने असल्याने दुचाकीस्वार निघून जातो. आणि त्याच्या पाठीमागे एक वयोवृद्ध व्यक्ती सायकल चालवत रस्त्याने जात असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. पाणी टाकल्याने वळू संतापला. आणि आपला राग कुठेतरी काढायचा म्हणून, त्याने बिचाऱ्या वृद्धाला आपल्या शिंगावर घेऊन हवेत फेकून दिलं.

काय म्हणाले नेटकरी?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुमच्या देखील काळजाचा थरकाप उडेल. हा व्हिडिओ फारच भयंकर असून, विनाकारण वळू रस्त्याने जात असणाऱ्या वृद्धाला आपल्या रागाचा बळी बनवतो, हे दृश्य मन हेलावून टाकणारं आहे. मात्र दुसरीकडे वळूची देखील विनाकारण माणसाने खोडू काढली. वळूच्या या कृत्याला माणूसच कारणीभूत आहे, असं देखील सोशल मीडियावर बोललं जात आहे. सर्वप्रथम माणसाने बाळूच्या अंगावर पाणी टाकलं नसतं, तर त्याला राग आला नसता, आणि त्याने रस्त्याने जाणाऱ्यांना त्रास दिला नसता. असं म्हणणारा देखील एक वर्ग सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा Registered Mobile Numbers: या सोप्या पद्धतीने चेक करा तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत; आणि या अडचणींपासून स्वतःला वाचवा..

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

Viral Video: देव तारी त्याला कोण मारी! कंटेनर पलटी होऊनही वाचला हा तरुण; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ..

Viral video: किती ही मस्ती! शांत बसलेल्या कुत्र्याला माकडाने डिवचले; पुढे जे घडले ते पाहून तुम्हीही..

Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.