Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..

0

Mahaforest Recruitment 2022: सरकारी नोकरी (government job) करायची अनेकांची इच्छा असते, मात्र प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळतेच असं नाही. अनेकदा तुम्ही पात्र असून देखील सरकारी नोकरी संदर्भात माहिती मिळाली नसल्याने, तुम्ही अर्ज करायचे राहून जाता, आणि तुम्ही चांगल्या पगाराच्या नोकरीला मुकले जाता. जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. वन विभाग चंद्रपूर (Maharashtra forest department) या ठिकाणी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून, या संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवारांचे अर्ज 17 जून पर्यंत मागवले असून, या पदासाठी तब्बल ४० हजार पगार दिला जाणार आहे. दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर

चंद्रपूर वन विभागाने (Chandrapur forest department) जारी केलेल्या भरती पदासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन, इमेलद्वारे अर्ज करता येणार आहेत. मात्र या पदांसाठी केवळ दोन जागा भरण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय अधिकारी आणि मिश्रक अधिकारी या दोन जागांवर पदे भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ही पदे मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत. प्रथम पडताळणी केल्यानंतर, उमेदवाराच्या मुलाखतीची तारीख सांगण्यात येईल, आणि त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

चंद्रपूर वन विभागाने जारी केलेल्या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी स्नातकोत्तर यामध्ये कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून वन्यजीव हा विषय घेऊन किमान 60 टक्क्यांहून अधिक गुण मिळवत पदवी संपादन करणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर उच्च माध्यमिक शाळेमधून परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुधन पर्यवेक्षक डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्हीं भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे. सोबतच MSCIT देखील आवश्यक आहे.

या उमेदवारांना देण्यात येणार प्राधान्य

चंद्रपूर वन विभागाकडून या भरती प्रक्रियेत संदर्भात अतिरिक्त पात्रता देखील ठेवण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना जंगलाचा अनुभव असेल, ज्यांना प्राण्यांना उपचार करण्याचा अनुभव असेल, पशुवैद्यकीय क्षेत्राच्या क्षेत्रामध्ये किमान तीन वर्षाचा अनुभव असेल, तर अशा उमेदवारांना निवडीत प्राधान्य देण्यात येणार आहे. एम एस ऑफिसमध्ये काम केले असल्यास आणि चांगले संभाषण कौशल्य असल्यास अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याच बरोबर इंटरनेट व्यवस्थित हाताळू शकणाऱ्या आणि मिश्रक म्हणून तीन वर्षे काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

वेतन आणि पदांची नावे

वैद्यकीय अधिकारी आणि मिश्रक या दोन पदासाठी एक एक जागा भरण्यात येणार आहे. या दोन्हीं पदांच्या पात्रतेविषयी आपण सविस्तर माहिती घेतली. आता आपण या दोन्ही पदांना अनुक्रमे किती मानधन दिले जाणार आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊ. पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी मासिक वेतन 40 हजार रुपये देण्यात येणार आहे. तर मिश्रक या पदासाठी वीस हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.

असा करा अर्ज 

पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्यासाठी तुम्हाला क्रोम वरून www.mahaforest.gov.in असं सर्च करावं लागणार आहे. त्यानंतर तुमच्या समोर वनविभागाची अधिकृत वेबसाइट ओपन झालेली दिसेल. वेबसाइट ओपन झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या ईमेल आयडी ओपन करून अर्ज करू शकता.

याशिवाय तुम्हाला पोस्टाने देखील चंद्रपूर वनविभाग कार्यालयात अर्ज पाठवता येणार आहे. विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर रामबाग वनवसाहत परिसर माता मंदिर, मुल रोड, चंद्रपूर- ४४२४०१. हा पोस्टाने अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे. याबरोबरच तुम्हाला डायरेक्ट ई-मेल द्वारे देखील तुमचा अर्ज करता येणार आहे. -Mail ID : dfochandrapur@gmail.com

जाहीरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा PM Mudra Yojana: व्यवसाय सुरू करायचाय पण पैसे नाहीत? चिंता करू नका, केंद्र सरकार देतय हमीशिवाय दहा लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या सविस्तर..

खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

Pradhan Mantri Ujjwala Yojana: या योजनेअंतर्गत मिळतोय मोफत गॅस सिलिंडर; असा करा अर्ज आणि घ्या योजनेचा लाभ..

Viral video: खोड काढली दुसऱ्याने आणि शिकार झाला वयोवृद्ध! यामुळे वळूने वृद्धाला शिंगावर घेऊन चेंडूसारखं हवेत फेकून दिलं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.