Viral video: बाप-लेकीचा आणि बहीण-भावाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही रोखू शकणार नाही अश्रू; मुलगी असावी तर अशी..

0

Viral video: लग्न हा प्रत्येकाच्या आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा असतो. घरातील मंडळी पासून पाहुणेमंडळी पर्यंत अनेक जण आनंदी आणि उत्साही असल्याचं आपण पाहतो. प्रत्येक जण लग्नाच्या तयारीत व्यस्त असतो. अनेकांपेक्षा नवरा आणि नवरी आपले लग्न होत असल्याने अधिक उत्साही आणि आनंदी असतात. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र या सगळ्यात तुम्ही दुर्लक्षित केलेली कोणती गोष्ट असेल, तर ती लग्न झाल्यानंतर नवरी मुलगी सासरी जात असणारा क्षण.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मात्र या सगळ्यांमध्ये मुलीसाठी खूप मोठी आव्हानं असतात. लहानपणापासून हातावरच्या तळा फोडा प्रमाणे जपलेल्या मुलीला अखेर आपल्या आई-वडिलांना सोडून दुसऱ्याच्या घरी जाऊन राहावे लागते, आणि नवीन आयुष्य सुरु कराव लागतं. हा प्रत्येक मुलींसाठी खूप आव्हानांचा काळ असतो. मुली ज्या आव्हानांचा सामना करतात, हे प्रत्येकाला जाणून घेणे शक्य नाही. आई-वडिलांना सोडणारा हा क्षण किती वेदनादायी असतो. हे अनुभवण्यासाठी प्रत्येकाने नवरी मुलगीची ज्यावेळेस विदाई होते, तो क्षण आवर्जून पाहणं गरजेचं आहे.

खासकरून अविवाहित असणाऱ्या तरुणांनी हाक क्षण अनुभवनं फार आवश्यक आहे. आपण पाहतो लग्नानंतर मुलींना खूप ही न वागणूक दिली जाते. वेळोवेळी मुलींचा अपमान केला जातो. वीस पंचवीस वर्षे आई-वडिलांनी आपल्या तोंडचा घास देऊन सांभाळलेली पोरगी इतरांच्या घरात आपलं नवीन अनोळखी माणसांसोबत कसं घालवेल? याची कल्पना विचार प्रत्येकाने करणे फार आवश्यक आहे. लग्नानंतर मुलगी आपल्या आई वडिलांना सोडून आपले नवीन आयुष्य सुरू करताना तिच्यासमोर किती आव्हानं असतील, हे प्रत्यक्ष तुम्ही लग्नानंतर, विदाई होतानाचा क्षण अनुभव आवश्यक आहे.

लग्नानंतर नवरीची बिदाई होताना आईची, भावाची आणि वडिलांची काय अवस्था होते, हे तुम्ही अनेकदा पाहिला असेल. मात्र काही व्हिडिओ काळजाला घाव घालणारे असतात. हे व्हिडिओ पाहून कधी कधी वाटतं लग्न ही प्रथा कोणी अस्तित्वात आणली असेल? आणि लग्नानंतर मुलगीच आपलं घरदार सोडून आपल्या प्रिय आई-वडिलांना,भावाला सोडून दुसऱ्याच्या घरी का जात असेल? असा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा आल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून, तुम्ही देखील हेच म्हणाल.

सोशल मीडियावर हळदी समारंभामधील नवरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत तब्बल दीड कोटी लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत भाऊ आपल्या बहीणीला हळद लावताना पाहायला मिळत असून, हे दृश्य पाहताना अनेकांच्या डोळ्यातून पाणी वाहत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत भाऊ बहिणीला हळद लावताना पाहायला मिळत असून, या दरम्यान बहिणीला हुंदका फुटतो. आपल्या भावाला सोडून दुसऱ्याच्या घरी जावं लागणार, हा विचार तिच्या मनात कदाचित आला असल्याने ती रडत असल्याचे दिसत आहे. भाऊ मात्र संयमाने आपल्या बहिणीला अधिक रडू येऊ नये म्हणून, एन्जॉय करताना दिसत आहे. मात्र शेवटी त्याचा देखील बांध फुटतो. आणि तोही जोरजोरात रडतो. हे दृश्य अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दुसऱ्या एका व्हिडीओत लग्न झाल्यानंतर विदाई दरम्यान आपल्या मुलीला सोडवताना वडिलांची झालेली अवस्था देखील अनेकांना पाहावत नाही. मुलगी नेहमी वडिलांची लाडकी असते असं बोललं जातं. मुलीला देखील सर्वात प्रिय आपले बाबा असतात. लहानपणापासून बाबांनी आपल्याला कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही, आणि आता त्याच बाबांना आपण अचानक सोडून जाणार, कदाचित हा विचार मुलींच्या मनात येत असल्याने मुली हंबरडा फोडतात.

दुसरीकडे आपल्या मुलीला आता लहानाचं मोठं करून आपण दुसऱ्याच्या घरी का पाठवत आहोत? ही प्रथा कोणी बनवली असे अनेक विचार मनात येऊन वडील देखील मुलींची विदाई होताना जगाचा विचार न करता हंबरडा फोडताना पाहायला मिळतात.

हे देखील वाचा second hand Hero Splendor Plus: दहा हजार किलोमीटर पळालेली hero-splendor-plus मिळतेय फक्त २१ हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

effects of lack of sex: शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..

Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

Viral video: केक खाल्ला नाही म्हणून लग्न मंडपातच नवरा आणि नवरीची तुफान मारामारी; पहा viral video..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.