Relationship: जोडीदाराकडून या 5 अपेक्षा कधीच ठेवू नका, अन्यथा नक्कीच होईल घटस्फोट..

0

Relationship: कुठलेही नाते (Relationship) टिकवण्यासाठी एकमेकांच्या ईच्छा, अपेक्षा आणि त्यांच्या मर्यादा समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. नात्यात जेव्हा अपेक्षा वास्तविकतेपेक्षा खूपच जास्त असतात, तेव्हा नात्यात कटुता यायला सुरुवात होते. आपल्या नात्यात (Relationship) अशी परिस्थिती टाळण्यासाठी एकमेकांबद्दल असलेल्या अपेक्षा आणि वास्तविकता यामध्ये संतुलन ठेवणे गरजेचे आहे. नात्यात जोडीदार खूपच अपेक्षा ठेवत असेल आणि तुम्हाला ते शक्य होणार नसेल तर याबाबत तुम्ही त्याच्याशी अगोदरच बोलायला हवे. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येणार नाही. अशा 5 अपेक्षा ज्यामुळे तुमचे नाते बिघडू शकते, चला तर त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

 

जोडीदार कायमच आनंदी ठेवेल: या जगात अशी कुठलीच व्यक्ती कायमस्वरूपी आनंदी असेल आणि कायमच दुस-या व्यक्तीला सतत आनंदी ठेवू शकणार नाही. तुमचे नाते (Relationship) कितीही प्रमाचे असेल तरीही कायमच समोरची व्यक्ती तुम्हाला खुश ठेवेल असे नाही. त्यामुळे जर तुमच्या मनात असे असेल की, तुमच्या जोडीदाराने तुम्हाला कायमच आनंदी ठेवावे तर ते प्रथमत: तुमच्या मनातून ही काढून टाका. कारण अशी अपेक्षा ठेवून तुम्ही असाल तर तुम्हाला निराशाच येणार. कारण जी व्यक्ती तुमच्या सोबत कधीतरी असते, ती तुम्हाला काही काळासाठी सुखी ठेवू शकेल. परंतु कायमस्वरूपी सोबत असणारा तुमचा जोडीदार हे करू शकत नाही. जोडीदारातील सकारात्मक गोष्टी शोधा आणि आनंदी राहा.

 

कायमच तुमच्या मताला सहमती देईल: नात्यात (Relationship) आपल्या जोडीदासोबत काही विषयांवर सहमती न दाखवणे देखील खूप गरजेचे असते. कारण कधी कधी जोडीदाराने घेतलेला निर्णय चुकीचा देखील असू शकतो. तसेच तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा असू शकतो. त्यामुळे तुमच्या चुकीच्या निर्णयावर तुमच्या जोडीदाराला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवनात आपल्या जोडीदाराचे आणि आपले आयुष्य दोघांच्या निर्णयावर अवलंबून असते. जर एखादा निर्णय दोघांतील एकाने घेतला तर त्याचा त्रास दोघांना देखील सहन करावा लागतो. त्यामुळे जर तुमचा जोडीदार तुमच्या मताशी सहमत नसेल तर त्याला बोलुद्या. त्याला तुम्ही घेतलेला निर्णय मान्य करायला भाग पाडू नका.

 

जोडीदारामध्ये बदल होणार नाही: काळानुरूप प्रत्येक गोष्टीत बदल घडत असतो. त्यामुळे बदलाची काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे माणसात देखील बदल होणारच. त्यासाठी बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कधीकधी माणसातील बदल फायदेशीर देखील ठरतो. त्यामुळे आपल्या जोडीदारामध्ये बदल होणारच नाही, अशी अपेक्षा ठेवू नका. माणसात बदल घडण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. जसे माणसाचे वय वाढत जाते, तशा माणसाच्या जबाबदाऱ्या देखील वाढतात, स्वभाव शांत होतो. त्यामुळे कदाचित बऱ्याचदा माणसातील बदल हा होत असतो.

 

जोडीदार चूकच करणार नाही: अशी म्हण आहे की, चुकतो तो माणूस. अर्थात मनुष्याकडून चुका होणे हे स्वभाविकच आहे. माणूस चुका करूनच शिकत असतो. त्यामुळे नात्यात (Relationship) एकमेकांच्या चुका समजून घेणे खूप गरजेचे आहे. जर समजूतदारपणाची भावना नसेल तर नात्यात कटूता येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जर जोडीदाराकडून चूक झाली तर त्याच्यावर मोठ्याने ओरडून काही होणार नाही. जोडीदाराला रागात बोलून देखील उपयोग होणार नाही. त्याची चूक कशामुळे झाली, याचे आत्मपरीक्षण करून पुन्हा अशी चूक करू नये, असे सांगा.

 

 

जोडीदार नेहमी तुमच्यासोबत असायलाच हवा: बऱ्याचदा जोडीदाराला असे वाटते की, आपला जोडीदार नेहमीच आपल्या सोबत असायला हवा. बऱ्याचदा काही कारणास्तव तुमचा जोडीदार तुमच्यापासून कामानिमित्त बाहेर गेला असेल, तुमच्या बाबतीत एखादी घटना घडली असेल तर तुमच्या जोडीदाराने तेथून लगेच तुमच्याकडे यावे, अशी अपेक्षा तुम्ही ठेवता कामा नये. बऱ्याचदा जोडीदार कामानिमित्त बाहेर असेल आणि तुम्ही आजारी पडला तरी काही लोकांची अपेक्षा असते की, आपला जोडीदार आत्ता लगेच आपल्या जवळ असायला हवाच. सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना प्रत्येक गोष्टीचा समतोल साधणे गरजेचे आहे. जसे की फक्त प्रेमावर तुमचे कुटुंब चालणार नाही. तर कुटुंब चालवण्यासाठी अर्थार्जन करणे देखील गरजेचे असते. त्यामुळे प्रत्येक वेळी, छोट्या छोट्या कठीण प्रसंगांत आपला जोडीदार आपल्या जवळ असायला हवा. अशी अपेक्षा नात्यात ठेवू नये.

हेही वाचा: Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

Chanakya Niti: पत्नी नेहमी पतीपासून या 3 गोष्टी लपवून ठेवते, त्यातली दुसरी आहे खूपच धोकादादक..

Chanakya Niti: लग्नानंतर काही दिवसांतच पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या साविस्तर.. 

Job: काम न करता 1 कोटी पगार, तरीही पट्ट्या म्हणतोय नको झालंय जीवन; पाहा काय आहे भानगड..

Arjun Kapoor च्या बहिणीने चक्क कॅमेऱ्यासमोरच दाखवलं नको ते, व्हिडिओ व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.