Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

0

Relationship Tips: प्रेम हे आंधळ असतं, माणूस एकदा प्रेमात पडला की किळसवाणे वाटणारे जग अचानक त्याला सुंदर वाटू लागतं. एखाद्याच्या प्रेमात पडल्यानंतर माणसाला त्याच्यातील दोष दिसत नाहीत. माणूस हळूहळू प्रेमात अखंड बुडाला जातो. एखाद्यावर जीवापाड प्रेम आणि डोळे झाकून विश्वास ठेवण्यात गैर देखील काही नाही. मात्र अशा केसेसमध्ये तुमच्या या प्रेमाचा आणि विश्वासाचा पार्टनर (partner) फायदा देखील उठवू शकतो. अशावेळी माणूस पूर्णतः तुटून जातो, आणि त्याचा प्रेमावर असणारा विश्वासही उडून जातो. एखाद्यावर प्रेम करत असताना तुमच्या पार्टनरचे वर्तणूक देखील तुम्ही लक्षात घेणे आवश्यक आहे. तरच तुम्ही स्वतःला भविष्यात उध्वस्त होण्यापासून वाचवू शकता.

प्रेमात पडल्यानंतर आपला पार्टनर जे काही करेल ते आपल्याला गोड वाटू लागतं. हे जरी खरं असलं, तरी आपल्याला वास्तवाची जाणीव असणं फार आवश्यक असतं. प्रेम हे निस्वार्थी असेल तरच, प्रेमाचं भविष्यात नात्यात रुपांतर होऊ शकतं. तुमचा पार्टनर त्याच्या काही वैयक्तिक फायद्यासाठी देखील तुमच्या सोबत राहू शकतो. अलीकडच्या काळात अनेकज वापर करून घेण्यापुरतचं नातं जोडतात किंवा रिलेशनशिपमध्ये येत असतात. तुमचा पार्टनर तुमचा वापर करून घेत आहे, तुम्हाला चीट करत आहे, हे तुम्ही कसे ओळखाल? आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

या गोष्टी लववत असेल तर..

जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता, तेव्हा तुमचा पार्टनर तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो. दिवसभरात त्याच्यासोबत घडणाऱ्या अनेक गोष्टी तो आपल्या पार्टनरसोबत शेअर करत असतो. पार्टनर ऑफिसमध्ये कामाला असेल, तर त्या ठिकाणी जे काही घडतं यासंदर्भात देखील तो आपल्या पार्टनरला बोलतो. यामधे ऑफिसचे मित्र ऑफिसमध्ये केलं जाणारं काम साऱ्या गोष्टीची माहिती आपल्या पार्टनरला देत असतो. जर असे प्रकार तुमच्या सोबत घडत असतील, तर तुमचा पार्टनर तुमच्यावर खरं प्रेम करत आहे, असा त्याचा अर्थ होतो.

मात्र तुमचा पार्टनर तुमच्या पासून स्वतःच्या मित्रांविषयी काही माहिती देत नसेल, ऑफिसच्या कामासंदर्भात काही अपडेट देत नसेल, रोज त्याच्यासोबत घडणाऱ्या गोष्टींची किंचितही तुम्हाला खबर लागू देत नसेल, तर समजून जा तुमचा जोडीदार तुम्हाला चीट करत आहे. आणि तो फक्त तुमचा वापर करून घेण्यापुरता तुमच्या सोबत राहिला आहे. रिलेशनशिपमध्ये असताना आपण अनेकदा पाहतो, पार्टनर त्याच्या कॉलेजबद्दल मित्रांबद्दल किंवा ऑफिस बद्दल काहीही माहिती देत नाही. अशा घटना तुमच्या बाबत देखील घडत असतील तर, काहीतरी शिजत आहे, हे तुम्ही वेळीच ओळखणे आवश्यक आहे.

फोन पासून लांब

रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींना आपल्या पर्सनल आयुष्या विषयाची सगळी अपडेट आपल्या पार्टनरला असणं आवश्यक असतं. जर तुम्ही खऱ्या रिलेशनशिपमध्ये असाल, तर तुमच्या पार्टनरने तुमच्या फोनचा वापर केला, तर तुम्हाला त्या विषयी कौतुक वाटत असतं. जर तुमच्या बाबतीत असं काही घडत असेल, तर तुमचा पार्टनर तुमच्यावर खरं प्रेम करत आहे. मात्र जर मोबाईल पासून तुम्हाला लांब ठेवत असेल, त्याच्या मोबाईलला तुम्हाला हात लावू देत नसेल, अनेक एप्लीकेशनवर जर त्याने पासवर्ड टाकले असतील, आणि तो पासवर्ड तुम्हाला सांगत देखील नसेल, तर समजून जा तुमचा पार्टनर तुम्हाला चीट करत आहे.

नात्याची माहिती लपवणे

जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, आणि तुमचा पार्टनर या नात्यासोबत खुश असेल, सकारात्मक असेल, तर तो तुमच्याबद्दल त्याच्या जवळच्या लोकांना सांगेल. यामध्ये मित्र नातेवाईकांचा देखील समावेश असू शकतो. मात्र जर तो तुमच्या सोबत तात्पुरत्या काळासाठी आणि गरजेपुरता राहिला असेल, तर मात्र तुमची ओळख कोणाशीही करून देत नाही. तुमच्या नात्याची माहिती लपवण्याचा प्रयत्न करतो. जर असा अनुभव तुम्हाला देखील आला असेल, तर समजून जा तुम्ही चुकीच्या माणसासोबत प्रेम केले आहे.

पैसे खर्च

प्रेम ही खूप सुंदर कल्पना आहे. अनेक जण प्रेमासाठी वाट्टेल ते करतात. मात्र अलीकडच्या काळात अनेक जण स्वतःच्या फायद्यासाठी रिलेशनशिपमध्ये येतात, ही देखील वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही. तुम्ही खऱ्या रिलेशनशिपमध्ये असाल, आणि तुमचा पार्टनर तुमच्यावर जिवापाड प्रेम करत असेल, तर तो तुमच्या सुखदुःखात सामील असतो. तो तुमचा पैसा खर्चण्यावर देखील विचार करतो. अनावश्यक खर्च टाळण्याचा नेहमी प्रयत्न करतो. जर तुमचा पार्टनर असा काही विचार करत नसेल, आणि संधी मिळेल तिथे तुम्हाला पैसे खर्च करायला लावत असेल, तर समजून जा, हे प्रेम नाही हा गेम आहे. यातून वेळीच बाहेर पडणं आवश्यक असतं. अन्यथा तुमचं भविष्य अंधारात जाऊ शकतं.

हे देखील वाचा Lion and elephant: 14 सिंहांच्या तावडीतून हत्तीने बुध्दी वापरून स्वतःला वाचवलंच; आणि सिंहांचा कार्यक्रमही केला..

Marriage Tips: या पाच गोष्टींचे पालन करा, अन्यथा वैवाहिक जीवनाचा होईल सत्यानाश..

SBI Recruitment 2022: भारतीय स्टेट बँकेत तब्बल इतक्या जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Pm kisan update: पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता जमा होणार या तारखेला; नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली माहिती..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.