SBI Recruitment 2022: भारतीय स्टेट बँकेत तब्बल इतक्या जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

SBI Recruitment 2022: बँकेत (bank) नोकरी (bank job) करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेक जण वर्षं वर्ष मेहनत देखील करत असतात. मात्र अलीकडच्या काळात सर्व क्षेत्रातील भरती प्रक्रिया रखडली असल्याने अनेकांना बेरोजगार राहावं लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु आता भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची मेगा भरती निघाली असून, बँकेत नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 देण्यात आली आहे. (SBI SCO Bharti 2022)

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना आता ही मोठी संधी आली आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत एकूण 714 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही मोठी पदसंख्या असल्याने आता या भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. आता आपण या भरती संदर्भातील सर्व अपडेट सविस्तर जाणून घेऊ. सर्वप्रथम आपण या भरतीसाठी उमेदवारांची पात्रता काय आहे? हे जाणून घेऊ.

पदे पात्रता आणि जागा

भारतीय स्टेट बँकमध्ये 714 जागांसाठी करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, पदांसाठी वेगवेगळी पात्रता ठेवण्यात आली आहे. आपण पदानुसार पात्रता जाणून घेऊ. ‘असिस्टंट मॅनेजर‘ या पदाच्या 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदाच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास उमेदवारांचे बी टेक/ एमसीए/ एम टेक/ एम एस सी/ कम्प्युटर सायन्स/ आयटी सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन/ त्यासोबतच दोन वर्षाचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे.

डेप्युटी मॅनेजर’ या पदांसाठी 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदाच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे बी इ/ बी टेक/ एमसीए/ एम टेक/ एम एस सी/ कम्प्युटर सायन्स/ आयटी सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ त्यासोबतच चार वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव’ या पदांसाठी पाच रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास उमेदवारांचे शिक्षण बी टेक/ एमसीए/ एम टेक/ एम एस सी/ कॅम्पुटर सायन्स/ आयटी सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ सोबतच सहा वर्षाचा अनुभव.

मॅनेजर बिजनेस डेव्हलपमेंट’ या पदासाठी दोन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदाच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे एमबीए त्याचबरोबर PGDM इत्यादी शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर” या पदासाठी २ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदाच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे एमबीए शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच PGDM असणे देखील आवश्यक आहे. उमेदवारांना किमान ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

रिलेशनशिप मॅनेजर” पदासाठी तब्बल 335 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत‌. या पदाच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे शिक्षण हे पदवीधर असणे आवश्यक आहे. सोबतच तीन वर्षाचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे.

इन्वेस्टमेंट ऑफिसर‘ या पदासाठी एकूण 52 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवार पदव्युत्तर त्याचबरोबर पदवीधर आवश्यक आहे. सोबतच पाच वर्षाचा अनुभव देखील बंधनकारक आहे.

सिनियर रिलेशनशिप मॅनेजर‘ पदासाठी एकूण 147 जागा भरण्यात येणार आहेत. या पदाच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे पदवीधर शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच सहा वर्षाचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे.

रीजनल हेड’ या पदासाठी एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार असून, शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास उमेदवारांना या क्षेत्राचा १२ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असल्याचं अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. सोबतच उमेदवार पदवीधर असावा, अशी देखील सूचना करण्यात आली आहे.’कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव’ या पदासाठी एकूण 75 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे शिक्षण हे पदवीधर असणे आवश्यक आहे.

मॅनेजर‘ या पदासाठी एकूण 11 रिक्त पदे भरण्यात येणार असून, यासाठी उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास उमेदवाराचे शिक्षण एमबीए त्याचबरोबर PGDM पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांना या पदाचा किमान पाच वर्ष अनुभव असणे देखील आवश्यक आहे.

सिस्टम ऑफिसर’ या पदासाठी एकूण तीन रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा असल्यास या पदासाठी उमेदवारांचे बी टेक/त्याचबरोबर बीई/ एम टेक/ कॉम्प्युटर सायन्स/आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इत्यादी क्षेत्रात पदवी 60 गुणांसह संपादन केलेली असणं आवश्यक आहे. सोबतच या पदाचा ३वर्ष अनुभव देखील असणं बंधनकारक आहे.

वयोमर्यादा: स्टेट बँकेत केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेच्या वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे वय 20 ते 38 वर्ष ठेवण्यात आले आहे. हे वय ओपन कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. तर एससी त्याबरोबर एसटी या उमेदवारांसाठी पाच वर्ष अतिरिक्त सूट देखील मिळणार आहे. सोबतच ओबीसी या उमेदवारांना तीन वर्षाची देखील अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.

अर्ज शुल्क: ओपन त्याचबरोबर ओबीसी उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याकरिता शुल्का आकारले जाणार आहे. 750 रुपये भरून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. मात्र एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही.

असा करा ऑनलाईन अर्ज

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून, इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन www.sbi.co.in असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर, तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे देखील वाचाGoogle Search: घरात कोणी नसल्यावर मुली Google वर सर्च करतात या पाच गोष्टी; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Samsung Galaxy F13: Samsung चा हा स्मार्टफोन Flipkart वर मिळतोय ४ हजारांनी स्वस्त; आताच करा ऑर्डर अन्यथा..

Pm kisan update: पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता जमा होणार या तारखेला; नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली माहिती..

Internet data:अचानक डाटा संपला? चिंता करू नका, हा नंबर डायल करा मिळेल अनलिमिटेड डाटा..

Driving licence: आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO ऑफिसला जायची गरज नाही; असा करा ऑनलाईन अर्ज 7 दिवसांत मिळेल घरपोच..

Camera lenses: फोनचा कॅमेरा खराब झालाय? चिंता करू नका, ही लेन्स लावा DSLR कॅमेरासारखे फोटो व्हिडिओ होतील क्लिक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.