Driving licence: आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO ऑफिसला जायची गरज नाही; असा करा ऑनलाईन अर्ज 7 दिवसांत मिळेल घरपोच..

0

Driving licence: ड्रायव्हिंग लायसन शिवाय तुम्ही कुठेही मनमोकळे टू-व्हीलर किंवा फोर व्हीलरमध्ये फिरू शकत नाही. गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन हे बंधनकारक आहे. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अजूनही देशात ड्रायव्हिंग लायसन नसणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं आढळतं. ड्रायव्हिंग लायसन शिवाय अनेक जण ड्रायव्हिंग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर, विनापरवाना ड्रायव्हिंग दंड देखील वाढवण्यात आला. त्यामुळे अनेक जण ड्रायव्हिंग लायसन काढताना पाहायला मिळत आहेत. पूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ ऑफिसला अनेक हेलपाटे घालावे लागत होते. आरटीओ ऑफिसला जाऊन ड्रायव्हिंग लायसन काढण्याची प्रक्रिया मोठी किचकट वाटत असल्याने अनेक जणांनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही.

अजूनही जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन काढलं नसेल, आणि ड्रायव्हिंग लायसन काढू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी कोणत्याही आरटीओ ऑफिसला भेट द्यावी लागणार नाही. केवळ एक ऑनलाईन अर्ज करून तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन केवळ सात दिवसांत घरपोच मिळवू शकता. होय तुम्ही बरोबर वाचलं आहे. आज आपण याच संदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत.

सरकारने आता ड्रायव्हिंग लायसन काढण्यासंदर्भातली प्रक्रिया ही डिजिटल केली असून, ड्रायव्हिंग लायसन करणाऱ्यांसाठी ही समाधानकारक बातमी आहे. आरटीओ ऑफिसला जाऊन ड्रायव्हिंग लायसन काढण्यासंदर्भातली प्रोसेस ही अनेकांना खूप किचकट वाटत होती. मात्र आता अशा चालकांना ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब करून ड्रायव्हिंग लायसन्स सहज काढता येणार आहे. कलम चार नुसार देशातील प्रत्येक नागरिकाला लर्निंग लायसन ठेवण्याची परवानगी दिली गेली आहे. अनेकांना माहिती नसेल, तर तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्हाला सोळा वर्षे पूर्ण झाली असतील, तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन काढू शकता.

Learning licence किंवा परमनंट ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला हवं असेल, तर तुम्हाला आता यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. Learning licence काढण्यासंदर्भातली सर्व प्रोसेस आता ऑनलाइन झाली असून, तुम्हाला त्यासाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची आवश्यकता लागणार नाही. मात्र जर तुम्हाला परमनंट ड्रायव्हिंग लायसन काढायचे असेल, तर तुम्हाला एक वेळ आरटीओ ऑफिसला जावं लागणार आहे. आता आपण दोन्हीं लायसन काढण्यासंदर्भातील सविस्तर प्रोसेस जाणून घेऊ.

असा करा ऑनलाईन अर्ज

ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइलमधील क्रोमवर जाऊन https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do असं सर्च करावं लागणार आहे. क्रोमवर जाऊन तुम्ही हे सर्च केल्यानंतर, परिवहन विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसेल. यानंतर, तुम्हाला खाली ‘select State name’ या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

select State name पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला अनेक राज्यांची नावे पाहायला मिळतील. यामधील तुम्ही तुमच्या राज्यावर जाऊन सिलेक्ट करायचा आहे. सहाजिकच तुम्ही ‘महाराष्ट्र’ हा पर्याय निवडला असेल. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला ‘Apply for Learner Licence’ ‘Apply for Driving Licence’ ‘Apply for DL Renewal’ असे पर्याय पाहायला मिळतील. यापैकी तुम्हाला ‘Apply for Learner Licence‘ हा पर्याय निवडायचा आहे. जर तुम्हाला पक्क ड्रायव्हिंग लायसन हवं असेल, तर तुम्ही दुसरा पर्याय देखील निवडू शकता.

Apply for Learner Licence या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर..

असा चार्ट ओपन झालेला दिसेल. या चार्ट खाली जो ‘कंटिन्यू’ पर्याय आहे, तुम्ही त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला Applicant does not hold any Driving/Learner licence issued in India हा पर्याय सिलेक्ट करून ‘सबमिट‘ पर्यायावर क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्यासमोर submit via Aadhar verification आणि submit without Aadhar verification या दोन पर्यायापैकी एक निवडायचा आहे. जर तुम्ही सबमिट विदाऊट आधार वेरिफिकेशन हा पर्याय निवडला असेल, तर तुमच्या मोबाईलवरील ओटीपीवरून तुम्ही या अर्जाची पूर्तता करू शकता.

हे देखील वाचा Google Search: घरात कोणी नसल्यावर मुली Google वर सर्च करतात या पाच गोष्टी; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Camera lenses: फोनचा कॅमेरा खराब झालाय? चिंता करू नका, ही लेन्स लावा DSLR कॅमेरासारखे फोटो व्हिडिओ होतील क्लिक..

butterfly yoga: हे योगासन केल्यास विवाहित पुरुषांना होतात हे जबरदस्त फायदे; जाणून तुम्हीही कराल सुरू..

Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..

Kisan credit card: आता या तीन कागदपत्रांच्या आधारे चुटकीसरशी मिळतेय किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.