Camera lenses: फोनचा कॅमेरा खराब झालाय? चिंता करू नका, ही लेन्स लावा DSLR कॅमेरासारखे फोटो व्हिडिओ होतील क्लिक..

0

Camera lenses: स्मार्टफोन (smartphone) आता अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. स्मार्टफोनने लोकांना स्मार्ट तर बनवलचं मात्र अनेकांना रोजगार देखील दिला, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. स्मार्टफोन खरेदी करताना अनेकजण कॅमेराचा विचार करूनच खरेदी करताना पाहायला मिळतात. स्मार्टफोनचा कॅमेरा (smartphone camera) उत्तम असेल, तर तुम्ही चांगले फोटो (photo) आणि व्हिडिओ सूट करू शकता. जर तुम्ही युट्युबर (Youtubers) किंवा ब्लॉगर ( blogger) असाल तर तुमच्यासाठी स्मार्टफोन मधील सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे कॅमेरा. आज आपण स्मार्टफोन मधील कॅमेऱ्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

स्मार्टफोन कितीही महागडा असला, तरी कालांतराने त्याचा कॅमेरा खराब होत असतो. हा अनुभव तुम्हाला देखील आला असेल. जर तुमच्याही मोबाईल मधील कॅमेरा खराब झाला असेल, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. किंवा नवीन स्मार्टफोन विकत घेण्याची देखील आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये खराब झालेल्या कॅमेऱ्यापेक्षा जास्त उत्तम आणि अगदी DSLR कॅमेरासारखा कॅमेरा फोटो आणि व्हिडिओ काढू शकता. होय तुम्ही बरोबरच ऐकलं आहे. जाणून घेऊया सविस्तर.

जर तुमच्याकडे असणाऱ्या फोनचा कॅमेरा ब्लर किंवा खराब झाला असेल, तर तुम्ही अजिबात घाबररून जाण्याची गरज नाही. अमेझॉनवर (Amazon) असा एक लेन्स अप्लिकेशन विकला जात आहे, ज्याच्या वापराने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा पूर्वीपेक्षा दमदार करू शकता. थोडक्यात पूर्वी तुमचा कॅमेरा ब्लर फोटो कॅप्चर करत होता ते बंद होऊन, फोटो अधिक स्पष्ट क्लिक होऊ लागतील. एवढेच नाही, तर तुमच्या कॅमेऱ्याचा ब्राईटनेस देखील वाढला जाणार आहे. मात्र त्याचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी जाणून घेणे देखील महत्वाचं आहे.

तुमच्या खराब झालेल्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याकरिता एक लेन्स ॲमेझॉन वर विकली जात आहे. ती तुम्ही ॲमेझॉन वर जाऊन सहज खरेदी करू शकता. कॅमेऱ्याची लेन्स तुमच्या ओरिजनल कॅमेऱ्या बरोबर अगदी फिट बसते. तुमचे व्हिडिओ आणि फोटो ब्लर न येता अगदी पूर्वीपेक्षाही दमदार कॅप्चर केले जातात. अमेझॉनवर विकल्या जात असणाऱ्या लेंसेस स्पेशल असून, या लेंसेसचा अधिक ब्राईटनेस देखील देण्यात आलेला आहे अमेझॉनवर विक्री होत असणाऱ्या लेंसेंसची किंमत फक्त अठराशे ते 2000 रुपयांच्या आसपास आहे.

कॅमेरा खराब कशामुळे होतो

महागड्या स्मार्टफोनचा देखील कॅमेरा कालांतराने खराब होत असल्याचा अनुभव अनेकांना येतो. मात्र हे कॅमेरे खराब कशामुळे होतात? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? स्मार्टफोनच्या कॅमेरा ब्लर होण्यासाठी मागे अनेक कारणे आहेत, त्यापैकी तुम्ही ज्यावेळी तुमचा फोन सतत खिशामध्ये ठेवता, त्यावेळी कॅमेऱ्याच्या असणाऱ्या लेंसेस घर्षणामुळे ब्लर होतात. याशिवाय फोनमध्ये देखील अचानक कॅमेरा सुरू राहतो. आणि यामुळे देखील कॅमेऱ्यावर याचा परिणाम होतो. त्याबरोबरच अचानक फोन हातातून खाली पडल्यानंतर फोनची असणारी वेगवेगळ्या घटकांची फिटिंग देखील हलली जाते. यामुळे देखील कॅमेऱ्याच्या लेंसेंस खराब होतात.

लेन्स खरेदी करताना ही घ्या काळजी

अमेझॉन वरून कॅमेराची लेन्स खरेदी करताना तुम्हीला काळजी देखील घ्यावी लागणार आहे. अनेकदा आपल्या चुकीच्या मोबाईल वापरामुळे लेंस बरोबर फोन मधील कॅमेरा देखील खराब होतो अशा वेळेस फोटो किंवा व्हिडिओ काढताना कॅमेरा डॉट येतात. जर तुमच्या स्मार्टफोन कॅमेऱ्याला देखील डॉट येत असतील, तर तुम्ही लेन्स खरेदी करणे योग्य नाही. कारण तुमच्या स्मार्टफोन मधील मूळ कॅमेराच खराब झाला असल्याने, लेन्सचा काहीही परिणाम कॅमेऱ्यावर पडणार नाही. मात्र जर तुमचा कॅमेरा उत्तम असेल, आणि लेन्स खराब असेल, तर ॲमेझॉनवर खूप दर्जेदार लेन्सची विक्री केली जात आहे. तुम्ही या लेन्सेस खरेदी करून कॅमेरा कॉलिटी दर्जेदार बनवू शकता.

हे देखील वाचा MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

Google Search: घरात कोणी नसल्यावर मुली Google वर सर्च करतात या पाच गोष्टी; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

butterfly yoga: हे योगासन केल्यास विवाहित पुरुषांना होतात हे जबरदस्त फायदे; जाणून तुम्हीही कराल सुरू..

Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..

Steel and Cement Rate: स्टील आणि सिमेंटच्या दरात पुन्हा एकदा विक्रमी घसरण; घर होणारा आता निम्म्या किंमतीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.