Steel and Cement Rate: स्टील आणि सिमेंटच्या दरात पुन्हा एकदा विक्रमी घसरण; घर होणारा आता निम्म्या किंमतीत..

Steel and cement Rate: आपलंही एक सुंदर घर (Dream home) असावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी प्रत्येकजण दिवस-रात्र मेहनत देखील करत असतो. मात्र तरी देखील आपल्या स्वप्नातलं घर बांधणं अनेकांना शक्य होत नाही. अलीकडच्या काळात तर बेरोजगारी बरोबरच महागाई देखील दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने, सर्वसामान्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न महत्वाचा झाला आहे. एकीकडे दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे, हे जरी खरं असलं तरी दुसरीकडे मात्र स्टील आणि सिमेंटच्या दरात मात्र दिवसेंदिवस विक्रमी घसरण होताना पाहायला मिळत आहे.

आपलं हक्काचं घर (house) बांधण्याचा विचार करत असणारांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. काही महिन्यांपासून सिमेंटचे दर प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळालं होतं. स्टील बरोबर सिमेंटचे दर देखील कमी झाले आहेत. साहजिकच यामुळे आता घर बांधण्यासाठी लागणारा अधिक खर्च वाचणार आहे. येत्या काही दिवसांत तुम्ही घर बांधण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी म्हत्वाची आहे. कारण सध्या स्टील आणि सिमेंटचे दर उतरल्यामुळे घर बांधण्यासाठी (Dream home) अतिशय उत्तम वेळ असल्याचं बोललं जात आहे.

भारत सरकारने स्टील आणि सिमेंट वरील आयात कर वाढवल्यामुळे देशांतर्गत विकल्या जाणाऱ्या बाजारपेठांमधून या वस्तूंचे दर ढासळले आहेत. जानेवारी ते एप्रिल दरम्यान स्टीलच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचं आपण पाहिलं होतं. मात्र त्यानंतर स्टीलचे दर ऐतिहासिकरित्या कमी झाल्याचे देखील पाहायला मिळाले. स्टीलचे दर वाढत असले, तरी जानेवारी आणि एप्रिलच्या तुलनेत हे दर खूप कमी आहेत. सिमेंटचे दर देखील तब्बल पन्नास ते साठ रुपयांनी कमी झाले असल्याने, आता घर बांधणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे

एप्रिल महिन्यात स्टीलच्या दराने उच्चांक गाठला होता. या महिन्यात स्टीलचे दर तब्बल 82,000 पर्यंत पोहचले होते. मात्र त्यानंतर स्तीलचे दर पन्नास ते ५५ हजारांपर्यंत देखील आले होते. मात्र आता पावसाने उघडीप दिली असल्याने, अनेक शहरांमध्ये बांधकाम क्षेत्र सुरू झाली असल्याने, गेल्या काही दिवसांपासून स्टीलच्या दरात वाढ होत आहे. मात्र तरी देखील एप्रीलच्या तुलनेत सद्याचे स्टीलचे दर १२ ते १५ हजारांनी स्वस्त आहेत. आता स्टीलचे दर ६५ते ६७ हजार रुपये प्रति टन विकले जात आहे. गेल्या काही महिन्यांत भौगोलिक त्याचबरोबर राजकीय गोष्टींमध्ये कच्च्यामालाच्या किंमती वाढल्या होत्या. साहजिकच यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सीमेंटच्या किंमती देखील वाढल्याचे पाहायला मिळाले होते.

सिमेंटचे सर घसरले.

एप्रिल महिन्यातील सीमेंटच्या दराचा विचार करायचा झाल्यास सिमेंटचे पोते ४६० रुपयांवर पोहचले होते. आता मात्र हे दर ६० ते ७० रुपयांनी उतरले आहेत. सद्या सिमेंटचे दर ५० किलोचे पोते ३८० ते ४०० रुपयांना विकले जात आहे. म्हणजेच सिमेंटचे दर ६० ते ७० रुपयांना उतरले आहेत. एकीकडे सिमेंटचे दर उतरले असले तरी दुसरीकडे मात्र वाळू आणि विट महागल्याचे पाहायला मिळत आहे.

वीट, वाळू मात्र महाग 

स्टील, सिमेंट या वस्तूंच्या किंमती कमी झाल्या असल्या तरी, दुसरीकडे मात्र वीट त्याचबरोबर वाळू काही प्रमाणात महागल्याचं पहिला मिळत आहे. वीट आणि वाळू महाग होण्याचं कारण म्हणजे, मान्सूनमध्ये जोरदार पाऊस पडल्याने वाळू आणि विटेचा उत्पन्नात घट झाली. पुरवठा करण्यास व्यवसाय कमी पडल्याने, सध्या या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. आणि म्हणून वीट आणि वाळू महाग झाल्याचे चित्र आहे. वीट आणि वाळू महाग झाली असली तरी, या वस्तूंचा व्यवस्थित पुरवठा सुरू झाल्यानंतर या वस्तू कमी होण्याची शक्यता आहे. साहजिकच यामुळे नवीन घर बांधण्याचा विचार करत असणारांसाठी हे सोन्याने दिवस आहेत.

हे देखील वाचाMongoose and snake: इवलेसे मुंगूस सापवर पडले भारी; थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल..

Crocodile and Child: तो नदीत बुडत होता, पाठीमागे मगर लागली होती, पण त्याने हिंमत सोडली नाही; तुम्हीच पाहा हा थरारक व्हिडिओ..

Child development: लहानपणीच मुलांना शिकवा या गोष्टी; भविष्यात करतील आई-वडिलांचे नाव उज्वल..

Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..

Relationship Tips: या सहा गोष्टी पार्टनर करत असेल, तर नात्याचा ओलावा कमी होत चाललाय; नात्यात ओलावा आणण्यासाठी करा या गोष्टी..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.