Child development: लहानपणीच मुलांना शिकवा या गोष्टी; भविष्यात करतील आई-वडिलांचे नाव उज्वल..

Child development: आपल्याही मुलाने भविष्यात नावलौकिक मिळवावा, असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. लग्न झाल्यानंतरच अनेकजण कुटुंब नियोजन करण्यास सुरुवात करतात. प्रत्येकाच्या जीवनात आई-वडील होणे हा ऐतिहासिक आणि आनंदाचा असतो. पहिल्यांदा आई वडील झाल्यानंतर, घरात खूप आनंदाचे वातावरण असते. मूल लहान असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्यासोबत खेळण्यात रमुन जात असतात. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र मुल जसजसं मोठं होऊ लागतं तसतशी काळजी प्रत्येक पित्याला वाटत असते.

आई वडील झाल्यानंतर दोन वर्षाचा काळ आपल्या चिमुकल्यासोबत खेळण्यात जातो. मात्र दोन वर्षानंतर मुल जसं मोठं होऊ लागतं तसं त्याच्या भविष्याची चिंता देखील आई-वडिल करत असतात. मुलाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतरच, खऱ्या अर्थाने त्याला काही गोष्टी शिकवायला सुरुवात करणं आवश्यक असते. लहान मुलं नेहमी मोठ्यांचे अनुकरण करून त्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करत असतात. सहाजिकच यामुळे आपल्या वर्तणुकीचा त्यांच्या जडणघडणीवर परिणाम पडत असतो.

समाजात काही मुलं खूप तापट आणि उद्धट असल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. मोठी होऊन हीच मुलं योग्य प्रवाहाच्या बाहेर गेल्याचे देखील पाहायला मिळतं. आणि मग त्याचा परिणाम म्हणून, त्याचा आई-वडिलांना दोषी ठरवलं जातं. शांत, संयमी आणि कर्तृत्ववान असणाऱ्या आई-वडिलांची मुलं अनेकदा तुम्ही पाहिलं असेल, वाईट मार्गाला लागतात. आई वडील खूप चांगले पण मुलगा खूप विचित्र निघाला, असे टोमणे मग समाजात ऐकायला मिळतात. असं नक्की का घडतं? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आपली ही मुलं भविष्यात जेंटलमन आणि कर्तृत्ववान म्हणून उदयास यावी असं तुम्हाला वाटत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी म्हत्वाची आहे.

नम्रपणा

माणसाच्या अंगात जितका नम्रपणा असेल, तितका माणूस शिखरावर पोहोचतो. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तुमच्याकडे नम्रपणा असेल, तर तुम्ही कोणाच्याही मनात आपलं स्थान निर्माण करू शकता. माणसाकडे जितका नम्रपणा तितका तो श्रेष्ठ ठरतो. नम्रपणा हा एकाएकी येत नाही, तो मूळचा असावा लागतो. लहानपणी तुम्ही लहान मुलांना नम्र वागायला शिकवलं, तर भविष्यात हाच नम्रपणा त्याला कर्तुत्ववान माणूस घडवायला कारणीभूत ठरू शकतो. लहानपणी तुम्ही चिमुकल्यांना नम्रपणे वागणं शिकवण आवश्यक आहे.

मोठ्यांचा आदर

नम्रपणाबरोबरच जर माणसांमध्ये समोरच्याचा आदर करण्याचा गुण असेल, तर तो अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींचा जर आपण लहानपणी सादर करायला सुरुवात केली, तर आपली देखील सन्मानाने आपुलकीने विचारपूस केली जाते. आणि म्हणून लहानपणीच मुलांना या गोष्टींचे ज्ञान आणि आदरपूर्वक बोलायला शिकवण फार आवश्यक असतं.

जेवणाचा सन्मान 

अनेकदा आपण पाहतो, आपल्या आवडीचे जेवण नसेल तर आपण त्या जेवणाला नावे ठेवतो. जेवणाचा तिरस्कार करतो. मात्र ही भावना खूप चुकीची आहे. तुम्ही जेवणाचा सन्मान करणं फार आवश्यक असतं. कोणतंही जेवण आपलं पोट भरण्याचं काम करत असतं. अन्न कधीही वाया जाऊ नये, याची काळजी घेणं एक चांगला व्यक्ती म्हणून तुमचं काम असतं. साहजिकच या गोष्टी तुम्ही मुलांना लहान वयातच समजावून सांगितल्या तर मोठ्यापणी त्यांना अन्नाची किंमत लक्षात राहते.

शेअर करायला शिकवा 

माणूस हा समाजशिल प्राणी आहे. समाजात राहायचं म्हटल्यावर त्याला समाजाचे भान असणं फार आवश्यक असतं. आपण पाहतो, अनेक लोकं कोणालाही स्वतःची वस्तू मदत म्हणून देत नाहीत. मात्र हे चांगला व्यक्ती म्हणून योग्य नाही. जर तुम्ही एकमेकांना देवाण-घेवाण करत असाल, तर यामुळे तुम्हाला सामाजिक भान राहते. खासकरून तुम्ही एकमेकांना जेवणाची देवाण घेवाण करणे खूप आवश्यक आहे. लहानपणीच या गोष्टी शिकवल्या, तर मुलं मोठी झाल्यानंतर कधीही सामाजिक भान विसरत नाहीत.

दयाळू

दयाळू हा माणसातला खूप चांगला गुण आहे. दयाळू माणसांच्या अवतीभवती अनेक लोकांचा पसारा कायम असतो. दयाळू माणसांकडे समाज अधिक आकर्षित होत असतो. सहाजिकच याचा फायदा त्यांना प्रत्येक कामात होतो. आणि म्हणून तुम्ही देखील लहान मुलांना नेहमी आपण दयाळू असणं आवश्यक असतं. हे शिकवणे आवश्यक आहे. लहानपणी जर मुलांना दयाळूपणाची ओळख करून दिली, तर भविष्यात ही मुलं आपलं सामाजिक भान कधीही हरवत नाहीत.

पैशाचे महत्व

जीवन जगण्यासाठी पैसा फार उपयोगी ठरतो. हे जरी खरं असलं, तरी अलीकडच्या काळात पैशाला फार महत्त्व आल्याने, माणूस आपली मूल्य आणि तत्वे विसरत चालला आहे. हे देखील वास्तव आहे. मात्र पैसा सर्वस्व नाही, याचं देखील भान असणं फार आवश्यक असतं. जर लहान मुलांना लहानपणीच पैशाचे महत्व समजावून सांगितलं, तर भविष्यात त्यांना याचा खूप फायदा होतो. पैसा जपून कसा वापरावा? याचे देखील महत्त्व त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करणे, हा लहान मुलांचा स्वभाव असतो, मात्र तुम्ही लहानपणीच मुलांचा हट्टीपणा दूर करणे आवश्यक असते.

प्रामाणिकपणा

प्रामाणिकपणा हा देखील माणसाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा गुण आहे. माणसाकडे जर प्रामाणिकपणा असेल, तर तुम्ही कोणत्याही प्रसंगावर मात करून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता. साहजिकच म्हणून तुम्ही लहान मुलांना लहानपणीच प्रामाणिक राहायला शिकवणे आवश्यक आहे.

स्वावलंबी

दुसऱ्याच्या मदतीने जर तुम्ही यश मिळवले असेल, तर लोकांची मदत घेऊन तुम्ही यश मिळवला आहे, याचे टोमणे खावे लागू शकतात. म्हणून तुम्ही आयुष्याचे काय करायचं आहे, ते स्वतः स्वावलंबी म्हणून करणं आवश्यक आहे. लहान मुलांना देखील लहानपणापासूनच स्वावलंबी बनण्याचे धडे तुम्ही देणे आवश्यक असते. लहान मुलांना लहानपणी छोटी-छोटी कामे देऊन तुम्ही त्याच्यावर जबाबदाऱ्या टाकून स्वावलंबी बनवू शकता.

हे देखील वाचा Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..

Crocodile and Child: तो नदीत बुडत होता, पाठीमागे मगर लागली होती, पण त्याने हिंमत सोडली नाही; तुम्हीच पाहा हा थरारक व्हिडिओ..

Mongoose and snake: इवलेसे मुंगूस सापवर पडले भारी; थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल..

Relationship Tips: या सहा गोष्टी पार्टनर करत असेल, तर नात्याचा ओलावा कमी होत चाललाय; नात्यात ओलावा आणण्यासाठी करा या गोष्टी..

Childbirth Tips: गरोदरपणात आणि प्रसूती झाल्यानंतर इतक्या दिवसांनी संबंध ठेवणे आवश्यक; अन्यथा होतील हे गंभीर परिणाम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.