Mongoose and snake: इवलेसे मुंगूस सापवर पडले भारी; थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल…

Mongoose and snake: सोशल मीडिया (social media) हे वायरल व्हिडिओचे (viral video) व्यासपीठ आहे. दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. खास करून प्राण्यासंदर्भातले व्हिडिओ तुफान वायरल होत असतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हायरल झालेले व्हिडिओ अनेकांच्या पसंतीचे देखील उतरतात. प्राण्यांच्या लाईफस्टाईल विषयी जाणून घेण्याची अनेकांमध्ये उत्सुकता असते. प्राणी काय खातात? कसे राहतात? कशी शिकार करतात? या विषयी अनेकांमध्ये कुतूहल असल्याचे पहायाला मिळते. मुंगूस आणि सापाचा (Mongoose and snake) आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान झाला आहे.

साप आणि मुंगूस एकमेकांचे किती कट्टर दुश्मन आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. खासकरून मुंगुसाने जर सापाला पाहिलं तर मुंगूस सापावर तुटून पडल्याचे पाहायला मिळतं. या दोघांच्या लढाईत बहुतेकदा मुंगूस जिंकल्याचा आपण पाहतो. मात्र कधीकधी तुम्ही साप देखील मुंगसावर भारी पडल्याचं पाहिलं असेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत देखील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळत आहे. साप आणि मुंगसाची ही लढाई सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत या दोघांची झुंज कडेला असणारे लोक पाहत असल्याचं देखील दिसत आहे.

काय घडलं नेमकं? 

सोशल मीडियावर व्हायरस झालेल्या या व्हिडिओत साप आणि मुंगूस अचानक समोरासमोर येतात. दोघेही अचानकपणे समोरासमोर आल्यानंतर, आता या दोघांची झुंज होणार हे निश्चित झाल्यानंतर, रस्त्याने जाणारे लोक देखील थांबल्याने पाहायला मिळत आहे. रस्त्याने जाणाऱ्या लोकांना काही कळायच्या आत दोघांची झुंज सुरू होते, आणि अनेक जण या दोघांच्या झुंजी पाहण्यासाठी थांबतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत मुंगूस खूपच लहान असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे साप प्रचंड मोठा असल्याने, मुंगसाचे काही खरे नाही, असं सगळ्यांना वाटत होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत साप देखील सुरुवातीला मुंगसावर जोरदार प्रहार करताना पाहायला मिळत आहे. मुंगूस मात्र शांत डोक्याने सापाचा सामना करताना दिसत आहे. सापावर हल्ला करण्याची संधी मिळताच मुंगूस सापावर तुटून पडते. आणि या लढाईचा अंत काय होणार? हे जवळपास स्पष्ट होते.

मुंगासाला हल्ला करण्याची संधी मिळताच त्याने सापाची यशस्वी शिकार केली. मुंगसाने भल्यामोठ्या सापाचे तोंड आपल्या तोंडात पकडुन सापाला गदागदा हलवले. मुंगसच्या या धक्क्यातून साप बेजार झाला. सापाच्या लक्षात आले, आता आपला खेळ संपला आहे. साप देखील काही प्रतिकार करण्याऐवजु शांत पडतो. अखेर मुंगूस सापाची शिकार करण्यात यशस्वी होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा snake of India या अकाऊंट वरून शेअर करण्यात आला आहे.

हे देखील वाचा  Viral Video: रस्त्यावर बिबट्या गाईची शिकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल; व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा उडेल थरकाप..

Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..

Relationship Tips: या सहा गोष्टी पार्टनर करत असेल, तर नात्याचा ओलावा कमी होत चाललाय; नात्यात ओलावा आणण्यासाठी करा या गोष्टी..

Relationship Tips: मुलं आपल्या वयापेक्षा कमी मुलींकडेच जास्त आकर्षित का होतात? ही 5 कारणे जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.