Viral Video: रस्त्यावर बिबट्या गाईची शिकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल; व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा उडेल थरकाप..

Viral Video: प्राण्यासंदर्भातले नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) दररोज व्हायरल (viral) होत आहेत. काही व्हिडिओ (video) समाधानकारक असतात, तर काही काळजाचं पाणी करणारे असतात. सिंह, (lion) वाघ, (tiger) बिबट्या,(leopard) या हिंस्र प्राण्यांना शिकार करताना सोशल मीडियावर आपण नेहमी पाहिलं आहे. या ताकदवान प्राण्यांनी एखाद्या प्राण्याची शिकार करायचं ठरवलंच, तर बहुतेकदा शिकार ही होतेच. मोस्टली या प्राण्यांना तुम्ही जंगलात शिकार करताना पाहिलं असेल, मात्र सोशल मीडियावर व्हायरस झालेल्या एका व्हिडिओत एक बिबट्या चक्क रस्त्यावरच गाईची शिकार करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

जंगलामध्ये अनेकदा गाई, म्हैस सारख्या अनेक प्राण्यांची शिकारी सिंह, वाघ, करताना पाहायला मिळतात. बिचाऱ्या हतबल असणाऱ्या गाई, म्हैस हिंस्र प्राण्यांची शिकार होताना आपण पाहतो. याविषयी आपल्याला फारसं वाईट वाटत नाही. कारण ही निसर्गाची साखळी आहे. मात्र चक्क रस्त्यावर येऊन, एका बिबट्याने गाईची केलेली शिकार मात्र मनाला प्रचंड वेदना देऊन जात असल्याचं पाहायला मिळत आहे. बिचारी रस्त्याच्या कडेला चरण्यात मग्न असताना, अचानक बिबट्याने तिचा गळा आपल्या जबड्यात पकडला. गाई आपल्याला कोणीतरी वाचवेल, या आशेने बिबट्याचा प्रतिकार करत राहिली.

काय घडलं नेमकं? 

@saket_Badola या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ खूपच वेदनादायक आहे. रस्त्याच्या कडेला सुरक्षा कुंपणच्या आतून एक बिबट्या भल्या मोठ्या गाईची शिकार करताना पाहायला मिळत आहे. कुंपणाच्या खालून बिबट्याने चरत असणाऱ्या गाईचा बरोबर गळा आपल्या जबड्यात घट्ट पकडल्याचं पाहायला मिळत आहे. गाईचा बरोबर गळा पकडल्याने गाईला देखील किंचितही हालचाल करता येत नसल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

रस्त्याने अनेक वाहन देखील येत जात आहेत. मात्र गाईची मदत करायला कोणीही जात नसल्याचं दिसत आहे. कदाचित निसर्गाच्या या साखळीत कोणाचीही हस्तक्षेप करायची इच्छा नसावी. मात्र हा व्हिडिओ पाहून अनेकांना वेदना होत आहेत. बिबट्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कंपाऊंडच्या खालून गायीचा गळा आपल्या जबड्यात पकडल्याने, गाई हतबल होऊन काही काळ प्रतिकार करते. मात्र बिबट्याच्या या हल्ल्यात ती जास्त वेळ आपला तग धरू शकली नाही.

बिबट्याचा बराच वेळ प्रतिकार केल्यानंतर, अखेर गाईने देखील आपली हार मानली. असे म्हंटले जाते, जो अधिक ताकदवान असतो. तो लढाईत किंवा संघर्षात जास्त काळ टिकून राहतो. या व्हिडिओत देखील बिबट्या गाईचा गळा आपल्या जबड्यात पकडल्यानंतर, जोपर्यंत गाई हार मानत नाही, तोपर्यंत तो देखील शांत थांबतो. अखेर गाई खाली कोसळते. आणि मग बिबट्या संरक्षण कंपाऊंडच्या खालून गाईला ओढत जगलामध्ये घेऊन जातो.

काय म्हणाले नेटकरी?

@saket_Badola यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकलेल्या हा व्हिडिओ ६५ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. साकेतने बिबट्याच्या जबड्यात प्रचंड ताकत असते, हे दर्शवणारा हा व्हिडिओ असल्याचे कॅप्शन दिले आहे. अनेक युजर्सने हा व्हिडिओ काढणारांना दोषी ठरवलं आहे. व्हिडिओ काढणारांनी गाईचे संरक्षण करणे आवश्यक होतं. मात्र त्यांच्या डोळ्या देखत एका गाईची शिकार होताना देखील ही मंडळी किती सहजतेने व्हिडिओ काढत आहेत? हे खूप वेदनादायी असल्याचं म्हटले आहे.

हे देखील वाचा Mongoose and Cobra: मुंगूस आणि कोब्राची झुंज पाहून होईल काळजाचं पाणी पाणी; कोण जिंकतं पाहा तुम्हीचं..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

Proprietary Rights: हे सात पुरावे तुमच्याकडे असतील तरच तुम्ही जमिनीचे मालक असता..

Ration Card: नवीन रेशन कार्डसाठी असा करा online, ऑफलाईन अर्ज; दहा दिवसांत रेशन कार्ड मिळेल घरपोच..

MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.