Proprietary Rights: हे सात पुरावे तुमच्याकडे असतील तरच तुम्ही जमिनीचे मालक असता..

Proprietary Rights: अलीकडच्या काळात जमिनीवरून सातत्याने वाद होताना पाहायला मिळतात. जमिनीच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या असल्याने, जमिनीचा प्रॉपर्टीवरून वाद-विवाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. आपला संबंध नसताना देखील अनेकांच्या जमिनीवर आपला हक्क सांगून, अतिक्रमण करण्याच्या घटना देखील देशातल्या अनेक भागात घडल्याचे सातत्याने समोर आले आहे. तुमच्या देखील बाबतीत असा काही प्रकार होऊ नये, यासाठी तुमच्याकडे संबंधित जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

एखाद्या जमिनीसंदर्भात काही वाद निर्माण झाला, तर ही जमीन आपलीच आहे. आणि या जमिनीचा मालक आपणच आहोत. या संदर्भात तुम्ही तोंडी बोलून कितीही सांगितलं, तरी कायद्याच्या दृष्टीने ते खरंच असेल, असं नाही. तुम्ही त्या जमिनीचे मालक आहात, हे सांगण्यासाठी तुमच्याकडे भक्कम पुरावा हवा. अनेकदा आपण एखाद्याला भाडे तत्वावर शेती करण्यासाठी देतो. मात्र काही वर्षानंतर, तो शेतकरी हे शेत आपलंच असल्याचं सांगतो. याबाबतचे अनेक खटले न्यायालयात प्रलंबित देखील आहेत. आज आपण जमिनीचा मालकी हक्क सांगणारी सात कागदपत्रे पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्ही त्या जमिनीचे मालक आहात, हे स्पष्ट होतं. जाणून घेऊया सविस्तर.

खरेदी खत

एखाद्याची जमीन खरेदी करताना सर्वप्रथम त्या जमिनीची किंमत मोजून खरेदीखत केलं जातं. याविषयी तुम्हाला अधिक सांगण्याची गरज नाही. खरेदीखत हे कोणत्याही जमिनीचे मालकी हक्क सांगण्यासाठीचा हा पहिला पुरावा आहे हे लक्षात ठेवा. खरेदीखत आपल्या जमिनीचा मालकी हक्क सांगणारा हा प्रथम पुरावा असतो. खरेदी खतावर संबंधित जमिनीचा व्यवहार किती तारखेला झाला, त्याचबरोबर कोणाकडून कोणी विकत घेतली, विकत घेतलेले क्षेत्र किती आहे? आणि ते किती किमतीला घेतलं? याची सविस्तर माहिती देण्यात आलेली असते. या कागदावरची संपूर्ण माहिती, नंतर फेरफार या उताऱ्यावर रेखाटली जाते. आणि नंतर तुमचं नाव सातबाऱ्यावर लावलं जातं.

सातबारा उतारा

जमिनीचा मालकी हक्क सांगण्यासाठी महत्त्वाचा पुरावा म्हणजे, सातबारा असतो. पर्यावरण जमिनीचा किती हेक्टर आणि कोणाच्या नावावर आहे? हा योग्य उल्लेख असेल, तर तुमच्या जमिनीला अजिबात धोका नाही असं आपण म्हणू शकतो. सातबारा उतारामध्ये त्यातील जमिनीचा उल्लेख केला जातो. त्यामधील कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे? याची माहिती देण्यात आलेली असते. महत्त्वाचं म्हणजे या उताऱ्यावर भूधारणा पद्धत सांगितलेली असल्याने, या जमिनीचा खरा मालक कोण असतो? याची ओळख पटणं अधिक सोयीस्कर होतं. आणि म्हणून, तुमचा उतारा व्यवस्थित आहे की नाही, हे चेक करण्यासाठी तुम्ही प्रत्येक वर्षी सातबारा उतारा काढणं फायद्याचं ठरतं.

 8-अ उतारा

अनेक शेतकऱ्यांची जमीन हे वेगवेगळ्या गटामध्ये समाविष्ट किंवा विभागलेली असू शकते. या सर्व गटासंदर्भातली शेत जमिनीची संपूर्ण माहिती या ८अ म्हणजेच आपल्या खाते उताऱ्यावर नमूद केलेली असते. ८अ या कागदपत्रामुळे संबंधित गावामध्ये तुमच्या मालकीचे क्षेत्र कोणत्या कोणत्या गटात समाविष्ट आहे? याची देखील माहिती या कागदपत्रामुळे समजते. हे कागदपत्र देखील जमिनीचा मालकी हक्क सांगण्यासाठी खूप महत्त्वाचा पुरावा असतो.

जमीन मोजणीचे नकाशे

तुमच्या जमिनीबाबत काही वाद निर्माण झाल्यास किंवा जमीन कमी भरत असेल, तर संबंधित जमीन मोजण्याचे काम केलं जातं. त्यासाठी गट नकाशा तुमच्याकडे असेल, तर तुम्ही संबंधित जमिनीचे मालक असल्याचा हा एक पुरावा ग्राह्य धरला जातो. गट नकाशा मधील शेतजमीन कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर आहे? त्याचबरोबर किती जमीन नावावर आहे? या संदर्भात देखील गट नकाशावर सविस्तर माहिती असते. तुमच्या शेजारील ज्या शेतजमिनी असतात त्याचे देखील गट क्रमांक तुम्हाला पाहायला मिळू शकतात याचाच अर्थ शेजारील कोणत्या शेतकऱ्याचं क्षेत्र आहे, किंवा रान आहे, हे तुम्हाला या मधून समजते.

जमीन महसूलाची पावती: प्रत्येक वर्षी तुम्ही तुमच्या क्षेत्राचा महसूल भरत असता. हा महसूल भरल्यानंतर, तुम्ही तलाठ्याकडून जी पावती घेता, ही पावती देखील तुमच्या जमिनीचा मालकी हक्क सांगण्यासाठी खूप महत्त्वाचा पुरावा मानला जातो. तुम्ही या पावत्या व्यवस्थित सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. जमिनीची मालकी हक्क सिद्ध करण्याची गरज पडलीच तर, तुमचा हा पुरावा देखील महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो.

संबंधीत जमिनीचे खटले: तुमच्या मालकी हक्काच्या जमिनीबाबत यापूर्वी कोर्टात काही खटले चालले असतील, काही केसेस असतील, तर संबंधित खटल्याची कागदपत्रे, जसे की निकाल, जबाबाच्या प्रति, अशी अनेक संबंधित कागदपत्रे तुम्ही जपून ठेवणं आवश्यक असतं. संबंधित जमिनीचा काही वाद झाला तर तो मलाही कागदपत्रे खूप उपयुक्त ठरू शकतात.

प्रॉपर्टी कार्ड

ज्या पद्धतीने जमिनीसाठी सातबारा उतारा असतो, त्याच प्रमाणे बिगर शेती जमिनीसाठी देखील प्रॉपर्टी कार्ड म्हणून हे एक महत्त्वाचे कागदपत्र देण्यात येतं. प्रॉपर्टी कार्डवर बिगर शेती जमिनी बाबत सगळी माहिती देण्यात आलेली असते. यामध्ये कोणाच्या नावावर किती बिगर शेती क्षेत्र आहे? याची माहिती देण्यात आलेली असते. बिगर शेती क्षेत्रात तुमची जी स्थावर मालमत्ता असते, त्याची सविस्तर माहिती तुम्हाला प्रॉपर्टी कार्डमध्ये देण्यात आलेली असते. यामध्ये तुमचा बंगला, किंवा जागेवर व्यवसाय करत असलेली माहीती प्रॉपर्टी कार्ड या कागदपत्रात नमूद करण्यात आलेली असते.

हे देखील वाचा अतिक्रमण: जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची ही आहे योग्य प्रक्रिया..

Yuzvendra Chahal: श्रेयस अय्यरला डेट करत असल्याची चहलच्या पत्नीची कबुली; चहलही म्हणाला आज पासून नवीन आयुष्य..

Infinix Hot 12: 50 MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी असणारा स्मार्टफोन केवळ साडेनऊ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Steel Rate: स्टील, सिमेंटच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण; नविन घर बांधणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ..

Farmer Scheme: या तीन योजना शेतकऱ्यांना करतात लाखोंचे अर्थसहाय्य; जाणून घ्या या योजनांविषयी सविस्तर..

Government Scheme: या शेतकऱ्यांना सरकारकडून दिले जातेय ५० हजारांचे अनुदान; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.