Kisan credit card: आता या तीन कागदपत्रांच्या आधारे चुटकीसरशी मिळतेय किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Kisan credit card: शेतकऱ्याला आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan credit card) राबवण्यास सुरुवात केली. शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासते, मात्र ऐनवेळी बीबीयाणे खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर कीटकनाशके, खते इत्यादी शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी वेळेला शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. ही बाब लक्षात घेऊन, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ‘किसान क्रेडिट कार्ड’ देण्याची योजना राबवली. मात्र सुरुवातीला किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक किचकट कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती. मात्र आता शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड हे चुटकी सरशी मिळणार आहे.

पिक येईपर्यंत शेतकऱ्यांना पैशाची कमतरता भासू नये, शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज काढावं लागू नये, त्याचबरोबर शेतकरी स्वावलंबी व्हावा, यासाठी केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना राबवली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला केंद्र सरकारकडून खूप कमी व्याजदर आकारून कर्ज देण्यात येते. एवढेच नाही, तर पन्नास हजार रुपये बिनव्याजी रक्कम देखील शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत दिली जाते. या योजनेचे अनेक फायदे असले, तरी देखील किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक किचकट कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असल्याने शेतकऱ्यांनी सचरूवातीला याकडे पाठ फिरवली होती.

अनेक किचकट कागदपत्रांमुळे सुरुवातीला अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेत नसल्याचे पाहायला मिळाले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच, किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त तीन डॉक्युमेंट्स द्यावी लागणार आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या नियमामुळे वंचित राहिलेल्या अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्या तीन कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे? आता आपण हे सविस्तर जाणून घेऊ.

आता क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत दिले जाणारे किसान क्रेडिट कार्ड हे फक्त शेतकऱ्यांसाठीच फायदेशीर नाही, तर शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. मच्छीपालन, पशुपालन, इत्यादी व्यवसायांसाठी देखील सरकार खूप कमी प्रमाणात व्याज दर आकारून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करते. पशुपालन त्याचबरोबर मच्छी पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल तीन लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते. बरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 75 दरम्यान असणे आवश्यक आहे.

पीएम किसान योजनेशी संलग्न

पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या वेबसाटबरोबर आता किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जोडली गेली आहे. पीएम किसान योजनेची वेबसाईट आहे, त्याच वेबसाईटवर आता ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड हवं असेल, अशा शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. म्हणजे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना अर्जाबरोबर फक्त आधार कार्ड त्याचबरोबर पॅन कार्ड आणि फोटो जोडणे आवश्यक आहे. फक्त हे तीन कागदपत्रे जर शेतकऱ्यांकडे असतील, तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून कसा कर्ज पुरवठा केला जातो? हे देखील जाणून घेऊ.

असा केला जातो कर्जपुरवठा

ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे, अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकार या योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज हे केवळ 60 टक्के व्याजदराने प्रोव्हाइड करते. महत्त्वाचं म्हणजे, कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी वेळेत परतफेड केली तर अशा शेतकऱ्यांना तब्बल तीन टक्के सवलत देण्यात येते. जर शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाचा परतावा केला, तर शेतकऱ्यांना फक्त चार टक्के दराने तीन लाख रुपये पाच वर्षांकरिता मिळतात. शेतकरी या भन्नाट योजनेचा लाभ या किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत घेऊ शकतात.

हे देखील वाचा Health Tips: डेंग्यूचा डास फक्त याच लोकांना चावतो; डेंगू पासून दुर राहायचं असेल तर करा हे काम..

Health Tips: केळाचं नियमित सेवन केल्याने शरीरावर होतात हे पाच महत्वपूर्ण बदल; जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे तोटे..

Health Tips: हे चार घरगुती उपाय केल्यास मानेवरचा काळसरपणा क्षणात होता दूर..

Second hand bike: याठिकाणी केवळ 16 हजारांत मिळतेय Hero Splendor Plus; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Hardik Pandya: या बॉलिवुड अभिनेत्रीसोबतच्या डेटिंगमुळे पांद्याच्या वैवाहिक जीवनात भूकंप; असा झाला खुलासा..

Bank Account: आता अकाउंटमध्ये पैसे नसतील तरीही काढता येणार दहा हजार कॅश; वाचा सविस्तर..

Steel Rate: स्टील, सिमेंटच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण; नविन घर बांधणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.