Health Tips: केळाचं नियमित सेवन केल्याने शरीरावर होतात हे पाच महत्वपूर्ण बदल; जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे तोटे..

0

Health Tips: चिमुकल्यांपासून वयोवृद्धांपर्यंत केळी (banana) सर्व वयोगटातील मंडळी मोठ्या प्रमाणात खाताना पाहायला मिळतात. केळी लगेच आणि स्वस्त उपलब्ध होत असल्याने, अनेकांना केळी खाणे परवडते. व्यायाम करणारी मंडळी तर दररोज केळी खातात. अनेकांना केळी खाण्याचे फायदे माहितीही असतील, मात्र केळी खाल्ल्याने नेमके कोणते फायदे होतात? आणि केळाचे अतिसेवन केल्यास काय परिणाम होतात? हे देखील जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही केळीचे नियमित सेवन करत असाल, तर केळीचे फायदे आणि तोटे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

केळीमधून मोठ्या प्रमाणात पोषक तत्व आणि जीवनसत्व भेटतात. आरोग्याचा विचार करायचा झाला तर केळी खूप महत्वाचे फळ मानले जाते. ही गोष्ट जरी खरी असली, तरी त्याचे काही तोटे देखील आहेत. माणसाचे निरोगी आरोग्य हे निरोगी आहारावर अवलंबून असतं. हे तुम्ही अनेकदा ऐकलं वाचलं असेल, त्याचप्रमाणे दिवसातून किती केळी खाल्ली पाहिजे, याला देखील मर्यादा आहेत. हे देखील तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे. दिवसातून किती केळी खाल्ली पाहिजे? याशिवाय केळी संदर्भात सर्व फायदे आणि तोटे आपण सविस्तर जाणून घेऊ.

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दिवसातून दोन किंवा जास्तीत जास्त तीन केळी खाणे आवश्यक आहे. जास्तीतजास्त दिवसभरात दोन ते तीन केळी योग्य असल्याचं तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र यापेक्षा अधिक केळी खाल्ल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आता आपण सर्वप्रथम दररोज किती केळी खाणे आवश्यक आहे? आणि जास्त केळी खाल्ल्याने त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? हे सविस्तर पाहू.

वजन कमी होऊ शकते: अनेकांचा असा समज आहे, की जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने वजन वाढतं. मात्र ही निव्वळ अफवा आहे. याउलट अतिरिक्त केळीचे सेवन केल्याने, भूक खूप कमी लागते, आणि त्यामुळे आपले वजन कमी होऊ शकते. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन त्याचबरोबर फायबर पाहायला मिळते. साहजिकच यामुळे जास्त प्रमाणात केळी खाल्ल्यानंतर पोट जडाजड येते. आणि भूक लागत नाही.

आळस येतो: केळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम त्याचबरोबर पोटॅशियम घटक देखील पाहायला मिळतात. या घटकांच्या गुणधर्माचा विचार करायचा झाल्यास हे घटक आपल्या स्नायूंना थंड ठेवण्याचं काम करतात. यामुळे सहाजिकच तुम्हाला दिवसभर आळस आणि झोप लागण्याचे प्रकार देखील होण्याची शक्यता असते. हे झाले केळी खाण्याचे तोटे. मात्र केळी खाण्याचे जबरदस्त फायदे देखील आहेत, आता आपण तेही जाणून घेऊ. 

ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त: निरोगी आरोग्य आणि शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्ही नियमित एक किंवा दोन केळी खाणे आवश्यक आहे. जर तुम्ही खेळाला फॉलो करत असाल, तर खेळाडू दररोज केळी खात असल्याचे तुमच्या लक्षात येईल. केळी हे सर्वसामान्यांना परवडणारे फळ असल्याने तुम्ही निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी आहारात केळाचे नियमित सेवन करणं गरजेचं आहे.

स्मरणशक्ती वाढते: निरोगी आरोग्य ठेवायचं असेल, तर शहरासाठी फायदेशीर असणाऱ्या विटामिनची आवश्यकता असते. आपल्या आहारातून विविध प्रकारचे विटामिन मिळणे आवश्यक असतं. केळीमध्ये देखील विटामिन बी हे जीवनसत्व मिळते. जे आपल्या मेंदूची कार्यक्षमता अधिक जोमाने वाढवण्याचे काम करते. साहजिकच याचा परिणाम आपल्या स्मरणशक्तीवर होतो, आणि म्हणून केळीचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे.

त्वचा तरुण दिसण्यास मदत: ते वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र केळाच्या नियमित सेवनामुळे तुमच्या चेहऱ्यावरची त्वचा तरूण दिसते. केळाच्या नियमित सेवनाने शरीरामधील कोलेजचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. ज्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतो.

रक्त वाढण्यास मदत: केळीच्या नियमित सेवनाने तुमच्या शहरांमध्ये असणाऱ्या रक्ताचे प्रमाण देखील वाढले जाते. केळामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्याचे पाहायला मिळते. जे रक्त वाढीचे काम करते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दिवसातून किती केळी खाल्ल्या पाहिजेत, हे आपण सविस्तर जाणून घेतलं. त्याचे फायदे तोटे देखील समजून घेतले. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर शेअर करायला विसरू नका.

हे देखील वाचा Health Tips: हे चार घरगुती उपाय केल्यास मानेवरचा काळसरपणा क्षणात होता दूर..

Second Hand Bike: १५ आणि २२ हजारांत विकली जातेय Bajaj Pulsar; जाणून घ्या कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल..

Hardik Pandya: या बॉलिवुड अभिनेत्रीसोबतच्या डेटिंगमुळे पांद्याच्या वैवाहिक जीवनात भूकंप; असा झाला खुलासा..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

Asia Cup: चहलच्या पत्नीला श्रेयस अय्यर करतोय डेट; दिनेश कार्तिक मुरली विजयची होणार पुनरावृत्ती..

MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

Steel Rate: स्टील, सिमेंटच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण; नविन घर बांधणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ..

Bank Account: आता अकाउंटमध्ये पैसे नसतील तरीही काढता येणार दहा हजार कॅश; वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.