Second Hand Bike: १५ आणि २२ हजारांत विकली जातेय Bajaj Pulsar; जाणून घ्या कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल..

Second Hand Bike: दिवसेंदिवस महागाई वाढत चालली असल्याने सर्वसामान्यांना आता अनेक संकटांना समोर जावे लागतं आहे. इंधनाच्या दरवाढीने (fuel price) देखील उच्चांक गाठला आहे. इंधनाबरोबरच टू-व्हीलर (two wheeler) गाड्यांच्या किमती देखील गेल्या काही वर्षात जवळपास डबल झाल्याचे पाहायला मिळतं. साहजिकच यामुळे आता सर्वसामान्यांना नवीन गाडी खरेदी करणं परवडत नसल्याचे चित्र आहे. एवढंच नाही, तर इंधनाच्या किमतींमुळे अनेक जण आता टू- व्हीलरचा वापर करण्याऐवजी सार्वजनिक वाहनाचा वापर करताना दिसून येतात.

अनेक जण सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यामुळे आपल्या घरी असणारी टू-व्हीलर बाजारात विकताना देखील पाहायला मिळत आहेत. एका सर्वेत लॉकडाऊन नंतर टू-व्हीलर विकणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले होते. गेल्या एक दीड वर्षापासून टू-व्हीलर विकणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने, आता बाजारात अनेक सेकंड हॅन्ड टू-व्हीलर खूप कमी किंमतीत मिळत आहेत. जर तुम्हाला देखील नवीन टू-व्हीलर खरेदी करणे परवडत नसेल, किंवा जबरदस्त कंडिशन असणारी सेकंड हॅन्ड टू-व्हीलर खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

भारतीय बाजारपेठेत कमालीची लोकप्रिय असणारी बजाज कंपनीची पल्सर (Bajaj Pulsar) ही बाईक (bike) खूप मोठ्या प्रमाणात तरुणाई खरेदी करताना दिसताहेत. स्पोर्ट बाईक (sport bike) सारखा जबरदस्त लुक असल्याने, पल्सर गाडी खूप स्टायलिस्ट वाटते. फक्त स्टायलिशच नाही, तर वाऱ्यासारख्या वेगाने धावण्यासाठी देखील ही बाईक प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इतर अनेक बड्या कंपन्यांच्या तुलनेत या टू-व्हीलरला जबरदस्त मायलेज देखील मिळत असल्याने अनेक जण ही बाईक खरेदी करणं पसंत करतात.

ग्राहकांच्या मागणीचा विचार करून बजाज कंपनीने 150cc बाईक सारखाच लूक आता 125cc बाईकमध्ये देखील उतरवला आहे. अनेक जण मायलेजचा विचार करून दीडशे सीसी इंजिन खरेदी करण्यापेक्षा १२५cc बाईक खरेदी करताना दिसून येतात. या नवीन गाडीच्या किंमतीचा विचार करायचा झाल्यास, 90 हजार रुपयांच्या आसपास किंमत मोजावी लागते. मात्र हीच जबरदस्त कंडिशन असणारी सेकंड हॅन्ड बाईक तुम्हाला पंधरा हजार रुपयांत खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. कुठे आहे ही वापर? जाणून घेऊया सविस्तर.

तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल, सेकंड हॅन्ड टू व्हीलर गाड्यांच्या खरेदी विक्री करणाऱ्या अनेक ऑनलाईन वेबसाईट उपलब्ध आहेत. या वेबसाईटवर अनेक जण आपल्या टू-व्हीलर विक्री आणि खरेदी देखील करतात. मात्र अनेकांना मोजक्याच वेबसाईट माहिती आहेत. त्यामुळे या वेबसाईटवर कमी किंमतीत विकल्या जाणाऱ्या गाड्यांविषयी अनेकांना माहिती मिळत नाही. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट लक्षात घेऊन तुमच्यासाठी अशा काही वेबसाईटवर खूप कमी किंमतीत विकल्या जाणाऱ्या गाड्यांची माहिती घेऊन आलो आहोत, आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

पहिली ऑफर

https://www.olx.in/ या वेबसाईटवर बजाज कंपनीची पल्सर बाईक केवळ १५,००० हजार रुपयांना मिळत आहे. ही इतर पल्सरच्या तुलनेत ही गाडी अधिक मायलेज देखील देणार आहे. कारण या बाईचे इंजिन १२५cc आहे. या गाडीचे मॉडेल २०१४ मधील आहे. जबरदस्त कंडिशन असणारी ही गाडी खरेदी करण्यासाठी तुम्हाला याच प्लॅटफॉर्मवरून व्यवहार करावा लागणार आहे. तुम्ही या वेबसाईटवरून विक्रेत्याशी संपर्क करू शकता. गाडीची कंडिशन प्रत्यक्ष पाहण्यासाठी तुम्ही एक राऊंड देखील आणू शकता. एकदा गाडी खरेदी केल्यानंतर पुन्हा तक्रार करता येणार नाही.

दूसरी ऑफर

https://www.quikr.com/ या वेबसाईटवर  देखील तुम्हाला बजाज पल्सर खरेदी करता येऊ शकते. या वेबसाईटवर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या गाडीचे मॉडेल हे २०१२ मधील आहे. या पल्सर गाडीची किंमत देखील १५ हजार ठेवण्यात आली आहे. ही गाडी खरेदी करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन विक्रेत्याशी संपर्क करावा लागणार आहे. विक्रेत्याशी संपर्क केल्यानंतर, तुम्हाला गाडीची प्रत्यक्ष कंडीशन पाहण्यासाठी एक राऊंड देखील आणता येणार आहे.

तिसरी ऑफर

https://www.bikes4sale.in/ या वेबसाइटवर विक्रीसाठी लावण्यात आलेल्या बजाज पल्सरची किंमत २२ हजार निश्चित करण्यात आलेली आहे. या पल्सर गाडीचे मॉडेल हे २०१६ मधील असून, ही गाडी जबरदस्त कंडीशनमध्ये आहे. मात्र या गाडीचे पेमेंट करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या हप्त्याची सुविधा मिळणार नाही. वन टाइम पेमेंट करून तुम्ही ही गाडी खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन गाड्यांच्या किंमती आणि गाड्यांची कंडिशन पाहायची असेल, तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. 

सोळा हजार किंमत असणारी पल्सर पाहण्यासाठी यावर क्लिक करा..    Pulsar 150 चाळीस हजार किंमत असणारी पल्सर पाहण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा Hardik Pandya: या बॉलिवुड अभिनेत्रीसोबतच्या डेटिंगमुळे पांद्याच्या वैवाहिक जीवनात भूकंप; असा झाला खुलासा..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

Bank Account: आता अकाउंटमध्ये पैसे नसतील तरीही काढता येणार दहा हजार कॅश; वाचा सविस्तर..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Steel Rate: स्टील, सिमेंटच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण; नविन घर बांधणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ..

Tea Side Effects: उठल्यानंतर सकाळी चहा पित असाल तर सावधान; शरीरावर होतायत हे सात गंभीर परिणाम..

Hair fall tips: आहारात या दोन पदार्थाचा समावेश केल्यास केस गळती थांबून १५ दिवसांत येतात घनदाट केस..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.