Pm kisan update: पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता जमा होणार ‘या’ तारखेला; नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली माहिती..

Pm kisan update: शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. त्यापैकीच एक योजना म्हणजे, पंतप्रधान कृषी सन्मान योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार मदत दिली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजारांचे 11 हप्ते जमा झाले आहेत. आणि आता बाराव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारने या योजनेत काही बदल केल्याने बारावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. PM Kisan 12th Installment Released

प्रधानमंत्री कृषि सन्मान योजना ही २०१८ ला सुरू करण्यात आली. तेव्हापासून शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण २ हजाराचे 11 हप्ते मिळाले आहेत. या योजनेच्या स्वरूपाविषयी जाणून घ्यायचं झाल्यास दर चार महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षाला तीन हफ्ते शेतकऱ्यांना मिळतात. तीन हप्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ekyc करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. बारावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत ईकेवायसी बंधनकारक असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं, मात्र आता ही मुदत 30 सप्टेंबर करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकरी बाराव्या हप्त्याची वाट पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांना बारावा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता लागली असतानाच, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे कौतुक करताना या संदर्भात एक मोठं विधान केलं आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करत देशातील तमाम शेतकरी बंधू भगिनींचा आम्हा देशवासीयांना सार्थ अभिमान आहे‌. शेतकरी जितके अधिक शक्तिशाली बनतील, तितकाच आपला भारत समृद्ध होईल.

मला हे सांगताना आनंद होत आहे, पंतप्रधान किसान सन्मान निधी, त्याचबरोबर शेतीशी संबंधित असणाऱ्या अनेक योजनांचा देशांमधील अनेक शेतकऱ्यांना फायदा होत असून, या योजनेने शेतकऱ्याला एक प्रकारे प्रचंड बळ देखील मिळत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवरून म्हंटल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे केलेल्या कौतुकामुळे आता नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे बारावा हप्त्याची एकप्रकारे घोषणा देखील केली असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर १२ वा हप्ता कधी जमा होणार जाणून घेऊया सविस्तर.

बाराव्या हप्त्ता कधी जमा होणार

पीएम किसान योजनेचे स्वरूप लक्षात घेतलं तर, बारावा हप्ता हा यात महिन्यांत जमा होणे अपेक्षित आहे. त्याचे कारण म्हणजे, या योजनेचा पहिला हप्ता हा एक एप्रिल ते 31 जुलै या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला जमा केला जातो. तर दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दिला जातो. आणि वर्षातला तिसरा आणि शेवटचा हप्ता हा डिसेंबर ते 31 मार्च यादरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. साहजिकच या योजनेचे स्वरूप लक्षात घेतल्यानंतर, खात्यावर दुसरा हप्ता याच महिन्यात जमा होणार आहे. या महिन्यातल्या कोणत्या तारखेला १२वा हप्ता जमा होणार आहे, याविषयी तारीख अद्याप समजली नाही. मात्र बारावा हप्ताह याच महिन्यात जमा होणार असल्याची माहिती आहे. मात्र यासाठी तुमचं इकेवायसी पूर्ण असणं देखील आवश्यक आहे.

तुमच्या खात्याचा तपशील पाहा

या योजनेअंतर्गत तुम्हाला काही समस्या येत असेल, तर ती तुम्ही लवकरात लवकर सोडवणं आवश्यक आहे. eKYC करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असल्याने केंद्र सरकारने ई केवायसी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. तुम्हाला खात्यासंदर्भात काही अडचण येत असतील, तर तुम्हाला 155261 किंवा 1800115526 तसेच 011-23381092 या नंबरवर संपर्क साधावा लागणार आहे. या संपर्क क्रमांका शिवाय तुम्ही pmkisan-ict@gov.in यावर ईमेल देखील पाठवू शकता. जर तुम्ही eKYC केली नसेल, तर pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन eKYC करू शकता. eKYC कशी करायची? त्याचबरोबर तुमच्या खात्याची स्थिती कशी तपासायची? हे देखीलआपण सविस्तर जाणून घेऊ. 

तुमच्या खत्याची स्थिती तपासण्यासाठी आणि eKYC करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइल मधील क्रोमवर जाऊन pmkisan.gov.in सर्च करावं लागणार आहे. यानंतर पीएम किसानची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला ‘Farmers Corner‘ वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर तुम्ही तुमचा ‘आधार क्रमांक’ त्याच बरोबर ‘मोबाईल क्रमांक’ टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटची स्थिती पाहायला मिळेल. आणि ईकेवायसी देखील करता येईल.

हे देखील वाचाChild development: लहानपणीच मुलांना शिकवा या गोष्टी; भविष्यात करतील आई-वडिलांचे नाव उज्वल..

Google Search: घरात कोणी नसल्यावर मुली Google वर सर्च करतात या पाच गोष्टी; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Internet data:अचानक डाटा संपला? चिंता करू नका, हा नंबर डायल करा मिळेल अनलिमिटेड डाटा..

Driving licence: आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO ऑफिसला जायची गरज नाही; असा करा ऑनलाईन अर्ज 7 दिवसांत मिळेल घरपोच..

Camera lenses: फोनचा कॅमेरा खराब झालाय? चिंता करू नका, ही लेन्स लावा DSLR कॅमेरासारखे फोटो व्हिडिओ होतील क्लिक..

Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..

Kisan credit card: आता या तीन कागदपत्रांच्या आधारे चुटकीसरशी मिळतेय किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

PAN Card Apply Online: घरबसल्या तुमच्या मोबाईलवर पॅन कार्ड कसं काढाल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.