Samsung Galaxy F13: Samsung चा हा स्मार्टफोन Flipkart वर मिळतोय ४ हजारांनी स्वस्त; आताच करा ऑर्डर अन्यथा..

Samsung Galaxy F13: घरात येणाऱ्या नवीन स्मार्टफोनकडे अनेक जण आकर्षित होत असतात. मार्केटमध्ये येणारे नवनवीन स्मार्टफोन (smartphone) आपल्या कडेही असावेत, असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र नवीन स्मार्टफोनच्या किंमती आवाक्या बाहेर असल्याने सर्वसामान्य याकडे दुर्लक्ष करतात. मात्र आता तुम्हाला Flipkart वर सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोन खरेदीवर तब्बल 40 ते 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. साहजिकच यामुळे आता ग्राहकांना सॅमसंगचे स्मार्टफोन तब्बल निम्म्या किंमतीवर खरेदी करता येणार आहेत. आज आपण अशाच एका स्मार्टफोन विषयी जाणून घेणार आहोत, जो फ्लिपकार्टवर (Flipkart) जबरदस्त डिस्काउंटमध्ये विकला जात आहे.

स्मार्टफोन या ब्रँडकडे अनेक तरुण-तरुणी आकर्षित होत असल्याचं पाहायला मिळतं. या ब्रँडचे स्मार्टफोन नेहमी चर्चेत असतात. या ब्रँडचे स्मार्टफोन चर्चेत राहण्याला कारणही तसंच आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशी किंमत आणि जबरदस्त फीचर्समुळे सॅमसंग ग्राहकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वी झाले आहेत. इतर स्मार्टफोन प्रमाणे सॅमसंगचा Samsung Galaxy F13 स्मार्टफोन देखील गेल्या काही महिन्यांपासून कमालीच्या चर्चेत आहे. या स्मार्टफोनची विक्री देखील खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.

Samsung Galaxy F13 या स्मार्टफोनची मूळ किंमत जवळपास 17 हजार रुपये आहे. मात्र सध्या हा स्मार्टफोन फ्लिपार्टवरवर 30 टक्के डिस्काउंटवर विकला जात आहे. सतरा हजार रुपयांचा स्मार्टफोन तुम्ही केवळ आता 13000 रुपयांत खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी फ्लिपार्टवरवर ग्राहकांची झुंबड उडाली आहे. फक्त तीस टक्के डिस्काउंटच नाही, तर या फोन खरेदीवर तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे. एक्सचेंज ऑफर केली तर तीस टक्के डिस्काउंट अधिक एक्सचेंज ऑफर मिळून तुम्हाला या फोन खरेदीवर तब्बल साडेबारा हजार रुपये डिस्काउंट मिळू शकतो.

या स्मार्टफोन खरेदी संदर्भातली ऑफर अजूनही संपली नाही. Exchage ऑफर बरोबर जर तुम्ही या स्मार्टफोनचे पेमेंट IDFC बँक कार्डने केले, तर तुम्हाला अतिरिक्त 1000 रुपये सूट देखील या फोन खरेदीवर मिळणार आहे. जबरदस्त कॅमेरा आणि ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले तुम्हाला या फोनच्या खरेदीवर मिळणार आहे. Samsung Galaxy F13 या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन विषयी जाणून घ्यायचं झाल्यास, चार जीबी रॅम आणि बारा जीबी स्टोरेजचा पर्याय देखील या फोनच्या खरेदीवर मिळत आहे.

Samsung Galaxy F13 या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याविषयी विचार करायचा झाल्यास, या फोनला ट्रिपल सेटअप कॅमेरा देण्यात आला आहे. उत्कृष्ट कॅमेरा असल्याचा रिव्ह्यू देखील समोर आला आहे. अनेकांच्या पसंतीस या फोनचा कॅमेरा उतरला आहे. या स्मार्टफोनचा बॅक कॅमेरा हा ५०+ ५+२ देण्यात आला आहे. तर फ्रंट कॅमेरा ८mp देण्यात आला आहे. 50 मेगापिक्सल कॅमेरात तुम्ही अल्ट्रा वाइड अॅगल देखील क्लिक करू शकता.

Samsung Galaxy F13 स्मार्टफोनच्या बॅटरीचा विचार करायचा झाल्यास स्मार्टफोनची बॅटरी तब्बल ६००० mAh ची देण्यात आली आहे. कंपनीने या स्मार्टफोनची बॅटरी तब्बल दोन दिवस जाणार असल्याचा दावा देखील केला आहे. एकूणच काय तर जबरदस्त बॅटरी बॅकअप, भन्नाट प्रोसेसर, उत्कृष्ट डिझाईन, आणि लाजवाब कॅमेरासह ग्राहकांना Samsung Galaxy F13 हा स्मार्टफोन आकर्षक डिस्काउंटमध्ये खरेदी करता येणारा आहे.

हे देखील वाचा Google Search: घरात कोणी नसल्यावर मुली Google वर सर्च करतात या पाच गोष्टी; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Pm kisan update: पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता जमा होणार या तारखेला; नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली माहिती..

Internet data:अचानक डाटा संपला? चिंता करू नका, हा नंबर डायल करा मिळेल अनलिमिटेड डाटा..

Driving licence: आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO ऑफिसला जायची गरज नाही; असा करा ऑनलाईन अर्ज 7 दिवसांत मिळेल घरपोच..

Camera lenses: फोनचा कॅमेरा खराब झालाय? चिंता करू नका, ही लेन्स लावा DSLR कॅमेरासारखे फोटो व्हिडिओ होतील क्लिक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.