Lion and elephant: 14 सिंहांच्या तावडीतून हत्तीने बुध्दी वापरून स्वतःला वाचवलंच; आणि सिंहांचा कार्यक्रमही केला..

Lion and elephant: सध्या देशभरात गणपतीचा उत्सव (Ganesh utsav) मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. हत्तीचा (elephant) आणि गणपतीचा खूप जवळचा संबंध आहे, याविषयी तुम्हाला अधिक सांगण्याची गरज नाही. जसं की तुम्हाला माहिती आहे, गणपतीला बुद्धीदाता म्हणून ओळखले जाते. हत्तीची देखील गणना बुद्धिमान प्राण्यात होते. हत्ती खरोखरच बुद्धिमान प्राणी असतो, याची प्रचिती सोशल मीडियावर (social media) व्हायरल झालेल्या व्हिडिओत (Viral video) तुम्हाला देखील पाहायला मिळेल.

जंगलाचा राजा सिंहाला (lion) सगळेच प्राणी घाबरून आपलं आयुष्य जगत असतात. यामध्ये हत्ती देखील अपवाद नाही. एखाद्या सिंहाला हत्तीने पाहिले तरी हत्ती सुद्धा आपली वाट बदलून वेगळ्या मार्गाने प्रवास करू लागतो. पण सिंहाच्या नादी लागण्याच्या फंद्यात पडत नाही. अनेक प्राण्यांवर एक सिंह देखील भारी पडत असल्याचं तुम्ही अनेक व्हिडिओतून पाहिलं असेल. एका सिहाने देखील भल्यामोठ्या हत्तीची शिकार केल्याचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा पाहिले असतील. मग विचार करा एक नाही तर तब्बल 14 सिंहानी मिळून एका हत्तीला घेरल्यावर त्याची काय अवस्था झाली असेल?

सोशल मीडियावर प्राण्यासंदर्भातले रोज नवनवीन व्हिडिओ सध्या चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. सुशांत नंदा या आयपीएस अधिकाऱ्यांनी आपल्या ट्विटरवर एका जंगलातला व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत तब्बल 14 सिंहानी मिळून एका हत्तीला घेरलं आहे. हत्ती देखील खूप छोटा असल्याने आता हत्तीचं काही खरं नाही, असं अनेकांना वाटलं. पण हत्ती बुद्धिवान प्राणी तो एवढ्या लवकर हार थोडी मानणार आहे.

काय घडलं नेमकं?

सुशांत या आयपीएस अधिकाऱ्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत एका तलावाच्या कडेला हत्तीला तब्बल 14 सिंहांनी घेक्षल्याचं पाहायला मिळत आहे. अचानक चौदा सिंहानी घेरल्यानंतर, हत्ती देखील प्रचंड गोंधळून जात असल्याचे देखील दिसत आहे. शिकार आता चालून आली आहे, या उद्देशाने उपस्थित सिंह हत्तीवर तुटून देखील पडतात. मात्र मोठ्या हिंमतीने हत्ती सिंहांच्या आक्रमणाचा सामना करतो. सिंहापेक्षा आपण खूप ताकतवान असलो, तरी आपण अनेक सिंहांचा सामना करू शकत नाही. हे हत्ती वेळीच ओळखतो. आणि एक युक्ती चालवतो.

आपण खूप ताकदवान असलो, तरी या ठिकाणी आता आपली ताकद उपयोगी पडणार नाही, हे ओळखून हत्ती देखील या सिंहांना पराभूत करण्यासाठी बुद्धीचा वापर करण्याचा निर्णय घेतो. कडेचा तलाव पाहून हत्तीला डोक्यात प्रकाश पडतो. आणि हत्ती सिंहाच्या तावडीतून सुटण्यासाठी तलावाच्या मध्यभागी जाण्याचा निर्णय घेतो. तलावाच्या मधे ज्या भागात पाणी जास्त आहे, त्या ठिकाणी हत्ती जातो. सिंह त्याला पाण्याबाहेर खेचण्याचा प्रयत्न देखील करतात. मात्र हत्ती आपल्या बुद्धीचा वापर करून पाण्याच्या मध्यभागी जाताना देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

पाण्यामध्ये सिंहांना आपल्यावर आक्रमण करता येणार नाही, हे ओळखून सिंह तलावाच्या मध्यभागी येतो. सुरुवातीला हत्ती काय करणार आहे? याची काही कल्पना सिंहाला नसल्याने सिंह देखील त्याचा पाठलाग करताना दिसत आहे. मात्र नंतर सिंहाच्या लक्षात येतं, पाण्यामध्ये आपला इलाज चालणार नाही. आणि बरोबर या संधीचा फायदा उठवून हत्ती आपल्यावर आक्रमण करू शकतो. हत्ती देखील पुढच्या क्षणी सिंहावर धावत जाऊन आक्रमण करतो. हत्तीने केलेले आक्रमण पाहून सिंह देखील आपला जीव वाचवून तलावाच्या बाहेर धूम ठोकून पळून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रचंड मोठ्या संकटातून देखील आपल्या बुद्धीचा वापर करून हत्तीने स्वतःला तर वाचवलंच मात्र सिंहाचा देखील करेक्ट कार्यक्रम केला.

हे देखील वाचा Marriage Tips: या पाच गोष्टींचे पालन करा, अन्यथा वैवाहिक जीवनाचा होईल सत्यानाश..

SBI Recruitment 2022: भारतीय स्टेट बँकेत तब्बल इतक्या जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Samsung Galaxy F13: Samsung चा हा स्मार्टफोन Flipkart वर मिळतोय ४ हजारांनी स्वस्त; आताच करा ऑर्डर अन्यथा..

Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.