Indian Railway Jobs: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये 2 हजार 521 जागांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..
Indian Railway Jobs: दहावी पास उमेदवारांसाठी (10th pass candidates) रेल्वेमध्ये सरकारी नोकरी (government job) करण्याची सुवर्णसंधी (Indian Railway Vacancy) आहे. भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 2521 रिक्त जागांची भरती केली जाणार असून, यासंदर्भातली अधीसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती पश्चिम मध्य रेल्वेमध्ये (West Central Railway) करण्यात येणार असून, उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर ठेवण्यात आली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. जाणून घेऊया या भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर माहिती सोप्या भाषेत. (Indian Railway Recruitment 2022)
भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास उमेदवारांसाठी 2521 अप्रेंटिसच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या संदर्भातील अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 17 डिसेंबर ठेवण्यात आली आहे. या भरती संदर्भात शैक्षणिक पात्रता काय आहे? वयाची अट, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, दरमहा किती पगार? याविषयी जाणून घेऊया सविस्तर. सर्वप्रथम आपण वयाची अट जाणून घेऊया.
वयाची अट
दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेत केल्या जाणाऱ्या भरतीसाठी काय पात्रता आहे, जाणून घेऊया सविस्तर. या भरतीसाठी उमेवरांचे वय 15 ते 24 वर्ष असणे आवश्यक आहे. कॅटेगीरीनुसार उमेदवारांना वयामध्ये सवलत मिळणार आहे. एससी आणि एसटी या उमेदवारांसाठी पाच वर्ष अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
भारतीय रेल्वेमध्ये उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवाराचे शिक्षण हे कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच सरकार मान्यता प्राप्त संबंधित क्षेत्रामध्ये आयटीआय त्याचबरोबर डिप्लोमा (NCVT तसेच SCVT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवाराची निवड आणि अर्ज शुल्क
भारतीय रेल्वेमध्ये उमेदवारांच्या निवडीविषयी जाणून घ्यायची झाल्यास, उमेदवारांची निवड ही दहावीचे गुण आणि गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही शुल्क आकारला जाणार आहे. ओपन कॅटेगिरी मधून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क 100 रुपये आकारला जाणार आहे. तर एससी, एसटी त्याचबरोबर पीडब्ल्यूडी या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मात्र कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही.
असा करा ऑनलाईन अर्ज
भारतीय रेल्वेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन wcr.indianrailways.gov.in असं सर्च करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्यासमोर रेल्वे विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर, तुम्हाला ” Go To Contacts” हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर तुम्हाला “Recruitment” या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर “Railway Recruitment Cell” हा पर्याय ओपन झालेला असेल. तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे.
यानंतर तुम्हाला “Engagement of Act Apprentices For 2022-23” हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला बरोबर या पर्यायावर क्लिक करायचा आहे. यावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर “Apply” हा पर्याय ओपन होईल. तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही अर्ज व्यवस्थिरित्या भरून संबंधित कागदपत्र अपलोड करायची आहेत. कागदपत्र अपलोड केल्यानंतर, तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करून केलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे.
हे देखील वाचा Indian Post Bharti 2022: भारतीय डाक विभागात दहावी पास उमेदवारांसाठी विविध पदांची भरती; लगेच करा अर्ज..
Electric Bike: या चार इलेक्ट्रिक बाईकचे दिवाने आहेत भारतीय; जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि सर्वकाही..
Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..
Mahindra Bolero Neo Plus: बोलेरो अवतरली नव्या अवतारात ९ सीटर, लाजवाब लूकसह बनली सगळ्यांचा बॉस..
Anushka Sharma pregnant: विराट कोहली दुसऱ्यांदा होणार पिता; इतक्या महिन्याची गरोदर आहे अनुष्का..
Ishan Kishan: ईशान किशनचे द्विशतक पूर्ण होताच विराट कोहलीने सुरू केला भांगडा; पाहा व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम