Chandrakant Patil: शाई फेकून माणूस मरतो, सरकारच्या साथीने महाराष्ट्र पोलिसांचा अजब शोध; वाचा संपूर्ण प्रकरण..
Chandrakant Patil: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने थोर महापुरुषांचा अपमान भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नेत्यांकडून होताना पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा (chatrapati shivaji maharaj) अपमान केल्यानंतर आता चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) महात्मा फुले (Mahatma phule) यांचा अपमान केला. चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्या केलेल्या अपमानामुळे महाराष्ट्रातील जनता संतप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. (The ink was thrown away)
नियोजित पिंपरी चिंचवड (pimpri Chinchwad) दौऱ्यावर असताना काल चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करण्यात आली. मनोज गरबडे (manoj garbade) असं या शाई फेकणारचं नाव असून, तो फुले, शाहू आंबेडकर विचारांचा पाईक असल्याचे बोलले जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवली, असं वादग्रस्त विधान चंद्रकांत पाटील यांनी केल्याने त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करणाऱ्या मनोज गरबडे यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर लावलेल्या कलमामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करणाऱ्या मनोज गरबडे यांच्यावर लावण्यात आलेल्या कलमावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (chagan Bhujbal) यांनी देखील आक्षेप घेत संताप व्यक्त केला. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करणाऱ्या मनोज गरबडे यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणजेच, 307 हे कलम दाखल केलं आहे. शाई फेकल्याने जीव जाऊ शकतो, यावरून आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता असून, पोलीस (maharashtra police) देखील आता सरकारच्या दबावात काम करत असल्याचं बोललं जात आहे.
कोण आहे शाई फेक करणारा मनोज गरबडे?
छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विरोधात जो कोणी बोलेल तो आपला. असं छगन भुजबळ एका कार्यक्रमात म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेक करणे हे चुकीचं, मात्र महापुरुषांचा अपमान करून लोकांचा तुम्ही किती संताप करणार आहात? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थीत केला. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करणारा मनोज गरबडे हा फुले शाहू आंबेडकर विचारवादी असल्याचं छगन भुजबळ यांनी देखील म्हटले आहे. दरम्यान जीवे मारण्याचा प्रयत्न, हे कलम का लावण्यात आलं? याविषयी देखील चंद्रकांत पाटील यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
महिन्याभरात भाजपकडून महापुरुषांचा सातत्याने अपमान
गेल्या महिन्याभरात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी महापुरुषांविषयी सातत्याने वादग्रस्त विधान केल्याचे पाहायला मिळतं. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत. नवीन आदर्श पाहायचे असतील तर तुम्हाला महाराष्ट्रात अनेक पाहायला मिळतील सभाग्रस्त विधान केलं होतं. यानंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांची अनेक वेळा माफी मागितली, असं विधान केलं. यानंतर मंगल प्रभात लोढा यांनी देखील एकनाथ शिंदेच्या बंडखोरीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेशी केली.
यामुळे लावले कलम 307
वादग्रस्त विधानानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक… #ChandrakantPatil pic.twitter.com/tHnYv87RHm
— Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) (@jogalshailaja) December 10, 2022
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेक करणाऱ्या मनोज गरबडेवर पोलिसांनी 307 कलम दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपला संताप व्यक्त केला. शाही फेकून कोणी मरू शकतो, हे मला समजत नाही. छगन भुजबळ यांच्या विधानाला प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, माझ्यावर हल्ला हा पूर्वनियोजित होता. माझ्या डोळ्याचे कॅन्सर ऑपरेशन झालं आहे. डोळ्यांमध्ये शाई गेली तर माझा जीव देखील जाऊ शकतो. आणि म्हणून, त्याच्यावर 307 कलम लावलं असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
हे देखील वाचा Electric Bike: या चार इलेक्ट्रिक बाईकचे दिवाने आहेत भारतीय; जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि सर्वकाही..
Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..
Mahindra Bolero Neo Plus: बोलेरो अवतरली नव्या अवतारात ९ सीटर, लाजवाब लूकसह बनली सगळ्यांचा बॉस..
Anushka Sharma pregnant: विराट कोहली दुसऱ्यांदा होणार पिता; इतक्या महिन्याची गरोदर आहे अनुष्का..
Ishan Kishan: ईशान किशनचे द्विशतक पूर्ण होताच विराट कोहलीने सुरू केला भांगडा; पाहा व्हिडिओ..
Second Hand Bike: 2019 मधील hero spender Plus मिळतेय २० हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम