Mahindra Bolero Neo Plus: बोलेरो अवतरली नव्या अवतारात ९ सीटर, लाजवाब लूकसह बनली सगळ्यांचा बॉस..

0

Mahindra Bolero Neo Plus: महिऺंद्रा कंपनी नेहमी आपल्या नवनवीन कार्स बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहे. इतर वाहन कंपन्यांना पुरेपूर तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. महिंद्रा थारने (Mahindra Thar) देखील सगळ्यांचा बाजार उठवलेला आपल्याला पाहायला मिळाला. बाजारात महिंद्रा थारने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. आजदेखील बाजारात त्या गाडीच्या तोडीची कार उपलब्ध नाही. अजूनदेखील या गाडीला खूपच मागणी असल्याचे पाहायला मिळते. स्कॉर्पिओने (Mahindra Scorpio) देखील भारतीय बाजारात चांगलाच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे.

 

आता महिंद्राची आणखी एक कार (Bolero New Version) बाजारात धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. ती म्हणजे महिंद्रा बोलेरो निओ प्लस (Mahindra Bolero Neo Plus). महिंद्रा आता लवकरच आता बोलेरोची नवीन आवृत्ती (Bolero New version) बाजारात आणणार आहे. या कारमुळे बाजारातील इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण अगोदरच बोलेरोला देशातील ग्रामीण भागात देखील खूप मागणी आहे. त्यात Mahindra Bolero Neo Plus एवढी खतरनाक आहे की, टाटा आणि मारुती सारख्या कंपन्यांना मोठे आव्हान देणार आहे. महिंद्रा बोलेरो निओ प्लस (Mahindra Bolero Neo Plus) ही कार तिच्या जबरदस्त वैशिष्ट्यांसह बाजारात दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कार कमीत कमी किंमतीत बाजारात उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे.

 

Mahindra Bolero Neo Plus मध्ये कंपनीने इतर गाड्यांपेक्षा उत्तम फीचर्स (Features) आणि डिजिटल तंत्रज्ञान (Digital Technology) वापरले आहे. या कारमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान असणार आहे. बोलेरोने भारतीय बाजारात गेल्या ३० वर्षांपासून आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. त्यामुळे नवीन कारला फीचर्स देखील तसेच मिळणार आहेत. Bolero Neo Plus या कारला तिच्या पॉवरफुल इंजिन आणि आकर्षक अशा डिझाईनमुळे बाजारात चांगलीच पसंती मिळणार असल्याचे वातावरण तयार झाले आहे. कारण बरेच लोक ही गाडी बाजारात येण्याची वाट पहात आहेत.

 

महिंद्राच्या बोलेरो नवीन व्हर्जनमध्ये (Bolero New Version) काय काय नवीन देण्यात आले आहे, हे पाहूया. बोलेरो निओ प्लस (Bolero Neo Plus) तिच्या बजेट एवढ्या इतर कंपन्यांच्या कारच्या तुलनेत खूपच जबरदस्त आणि मजबूत असल्याचे पाहायला मिळते. ज्यात उच्च क्षमतेचे इंजिन आणि गाडीचे पार्टस देखील खूपच मजबूत देण्यात येणार आहेत. अगोदरच्या बोलेरोला देखील खूपच दणकट पार्टस आपण पाहिले आहेच. महिंद्रा कंपनीने बनवलेल्या गाड्या सहजपणे डोंगराळ भागातील रस्त्यांवर देखील चालतात. महिंद्रा बोलेरोची नवीन आवृत्ती(Mahindra Bolero New Version) मजबूत तर आहेच, परंतु आकर्षक डिझाइनह सज्ज असल्याचे पाहायला मिळते.

 

बोलेरो निओ प्लसची वैशिष्ट्ये (Bolero Neo Plus Features):                                                      इतर मध्यम बजेट असणाऱ्या कारच्या तुलनेत 9 सीटर बोलेरो निओ प्लसमध्ये (9 Seater Bolero Neo Plus) खूपच जबरदस्त वैशिष्टे (फीचर्स) देण्यात आली आहेत. त्यामुळेच गाडी बाजारात येण्यापूर्वीच गाडी बद्दल एवढी चर्चा होताना पाहायला मिळत आहे. महिंद्रा कंपनीने बोलेरो निओ प्लसमध्ये ( Mahindra Bolero Neo Plus Engine) 1.5 लीटर 2.2L mHawk इंजिन वापरले आहे. ज्यामध्ये 75 BHP आणि 210 NM उच्च टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. यासोबतच महिंद्रा कंपनीने या नवीन व्हर्जनमध्ये बोलेरोमध्ये 5 गिअर मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. हेही वाचा: Tata Blackbird : लवकरच बाजारात येणार टाटा  ब्लॅकबर्ड बाजारात; लोकांना का आहे या कारची एवढी उत्स्कुता?

 

गाडीच्या आकाराबद्दल बोलायचे झाले तर, बोलेरा निओ प्लस (Bolero Neo Plus) आकाराने मोठी असेल. कारची लांबी 4400 मिमी, रुंदी 1795 मिमी आणि उंची 1812 मिमी पाहायला मिळणार. 2680 मिमी लांब व्हीलबेस मिळेल. बोलेरो निओशी तुलना केली असता, या कारला 405 मिमी लांब आणि 5 मिमी उंची अधिक देण्यात आली आहे. तर व्हीलबेसमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Mahindra Bolero Neo Plus मधील लांबीची वाढ मागील ओव्हरहॅंगमध्ये पाहायला मिळते. हेही वाचा: Maruti Jimny 7 Seater उठवणार आहे Mahindra Thar चा बाजार, गाडी एवढी नादखुळाय की..

 

Mahindra Bolero Neo Plus मध्ये नवीन MID डिस्प्ले, 7-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, (7 Inch Touchscreen Infotenment System) ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह एक नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, माउंट केलेल्या कंट्रोल्ससह टिल्ट ॲडजस्टेबल पॉवर स्टीयरिंग व्हील (Adjustable Power Steering Wheel), इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल ORVM, फ्रंट आर्मरेस्ट (Front Armrest), ड्रायव्हर‌‌ उंची ॲडजस्टेबल सीट, इको मोडसह एसी यासह बरीच वैशिष्ट्ये मिळणार आहेत. महिंद्रा बोलेरो निओ प्लसची किंमत (Mahindra Bolere Neo Plus Price) रु. 10 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होऊ शकते आणि टॉप मॉडेलसाठी ती 13 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Second Hand Bike: 2019 मधील hero spender Plus मिळतेय २० हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Bajaj ची ही जबरदस्त बाईक मोबाईल पेक्षा स्वस्त, 100 किमी मायलेज; एवढंच नव्हे तर..

Chanakya Niti: या चार गोष्टींमुळे आयुष्यातून निघून जाते लक्ष्मी; प्रचंड मेहनत करूनही मिळत नाही यश..

Malaika Arora: अर्जुन त्याच्यासारखा नाही मर्द आहे, म्हणून मी.. मलायका अरोराचं खळबळ जनक विधान..

most searched people in 2022: भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च झालेली दहा नावं जाणून तुम्हीही व्हाल चकित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.