Chanakya Niti: या चार गोष्टींमुळे आयुष्यातून निघून जाते लक्ष्मी; प्रचंड मेहनत करूनही मिळत नाही यश..

0

Chanakya Niti: प्रत्येकाला आपणही यशस्वी (successful and reach) आणि धनवान असावं असं वाटत असतं. यामध्ये गैर देखील काही नाही. मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात लक्ष्मीचा वास असतोच, असं नाही. याला पूर्णतः मनुष्यच (man) जबाबदार असतो. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ मिळत असतं. आयुष्यामध्ये लक्ष्मी संदर्भात देखील हाच नियम लागू होतो. आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांच्या नीतीशास्त्रानुसार (Chanakya niti) धनाची देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहावी, असं वाटत असेल तर तुम्ही चुकूनही चार गोष्टी करू नये, असं सांगतात. कोणत्या आहेत, त्या चार गोष्टी? जाणून घेऊया सविस्तर.

आचार्य चाणक्य हे जगामधील सर्वोत्तम विद्वान होते. त्यांनी सांगितलेली चाणक्य नीती आजही लहान पासून मोठ्यांपर्यंत अनेक जण वाचतात. चाणक्य यांनी सांगितलेल्या नीतीचे तंतोतंत पालन केल्यास आयुष्य यशस्वी होऊ शकते. आचार्य चाणक्य यांनी मनुष्यावर लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी काही तत्वे सांगितली आहेत. आयुष्यामध्ये यश कसे मिळवायचे या व्यतिरिक्त आचार्य चाणक्य यांनी भरपूर पैसा कसा कमवू शकता, याविषयी देखील सविस्तर सांगितले आहे. (Acharya Chanakya was the best scholar in the world)

जीवनामध्ये प्रत्येकाला आपल्याकडे देखील मुबलक पैसा संपत्ती असावी, असं वाटत असतं. यासाठी अनेकजण दिवस रात्र मेहनत देखील करतात. मात्र तरी देखील अनेकांच्या नशिबात लक्ष्मीची कृपा नसते. ही समस्या अनेकांना जाणवते. तुम्हाला देखील याचा अनुभव आला असेल. मोठ्या प्रमाणात कष्ट करून देखील अशा समस्या का जाणवतात, असा तुम्हाला प्रश्न पडला आहे का? तर याला देखील तुम्हीच जबाबदार आहात. तुम्ही करत असलेलले कष्ट, काम यामधून इतरांना काही त्रास तर होत नाही ना, त्याच बरोबर तुम्ही कळत नकळत आपल्या वागण्यामुळे इतरांना याचे परिणाम भोगावे लागत लागतायत? असं असेल तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहत नाही. असं आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे.

लक्ष्मी म्हणजेच, धन ही खूप चंचल स्वभावाची मानली जाते. ज्या मनुष्याने इतरांवर अन्याय करून त्याचबरोबर जुगार, चोरी यासारख्या अवैध मार्गातून पैसा कमवला असेल, तर त्याच्याकडे हा पैसा फार काळ टिकत नाही. अशा मनुष्याच्या आयुष्यातून लक्ष्मी लगेच बाहेर पडते. धन कधीच एका ठिकाणी फार काळ टिकत नाही. धनाजी म्हणजे, संपत्तीची देवाण-घेवाण नेहमी सुरू असते. साहजिकच यामुळे लक्ष्मीची खूप मोठ्या प्रमाणात आराधना करणे आवश्यक असते. आदर करणे गरजेचे असते.

मनुष्याने आयुष्यामध्ये चुकीच्या मार्गाने पैसा कमावला असेल, तर हा लक्ष्मीचा अपमान समजला जातो. आणि म्हणून अशा माणसाला आयुष्यामध्ये यश मिळत नाही. जर तुम्ही पैसा अवैध मार्गाने कमावला असेल, तर तुम्हाला कमावलेला पैसा तुमच्या आयुष्यातून कसा नाहीसा झाला, याचा देखील ठाव ठिकाणा लागत नाही. याबरोबर जुगारात जिंकलेले पैसे हे नेहमी तुम्हाला दारिद्र्य मिळवून देतात.

इतरांवर अन्याय आणि छळ करून कमावलेला पैसा देखील तुमच्या आयुष्यातून लवकर निघून जातो. शिवाय अशा मनुष्याच्या आयुष्यामध्ये कधी समाधान आणि आनंद येत नाही. लोकांना त्रास न देता योग्य मार्गाने जर तुम्ही पैसा कमावला, तर तो पैसा तुम्हाला दीर्घकाळ साथ देतो. आणि अशा लोकांवर लक्ष्मीची देखील कृपा राहते.

हे देखील वाचा 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.