Ishan Kishan: ईशान किशनचे द्विशतक पूर्ण होताच विराट कोहलीने सुरू केला भांगडा; पाहा व्हिडिओ..

0

Ishan Kishanभारत आणि बांगलादेश (Ind vs BAN) यांच्यामध्ये खेळले गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनने द्विशतक झळकावत विश्वविक्रम केला. ईशान किशन द्विशतक झळकवणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला. (Ishan Kishan became the fourth Indian to score a double century) त्याचबरोबर सर्वाधिक जलद द्विशतक करणारा तो जगायला पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड ख्रिस गेल (Cris Gayle) नावावर होता. एकीकडे ईशान किशन आपलं द्विशतक पूर्ण करताच, दुसरीकडे विराट कोहलीने मैदानात भांगडा सुरू केला.

दुखापतीमुळे तिसरा सामना रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळू न शकल्याने त्याच्या जागी ईशान किशनला (Ishan Kishan) संधी देण्यात आली. या संधीचा पुरेपूर फायदा उठवत ईशान किशनने सोनं केलं. गेल्या काही वर्षापासून, भारतीय फलंदाजाच्या अप्रोच विषयी सातत्याने टीका होत आहे. भारतीय फलंदाज पॉझिटिव्ह अप्रोचने (positive approach) खेळ करत नसल्याने खेळाडूंवर सातत्याने टीका होत आहे. अशातच ईशान कशाने पहिल्या चेंडूपासून पॉझिटिव अप्रोच दाखवत मिळेल त्या चेंडूवर चौकार षटकार खेचला.

विश्वचषक जवळ आला असतानाच ईशान किशनने खेळलेल्या अविश्वासनीय खेळीमुळे आता त्याला भारतीय संघामध्ये संधी द्यावी लागणार आहे. ईशान किशनने आपल्या द्विशतकी खेळीमध्ये तब्बल २४ चौकार आणि दहा उत्तुंग षटकार लगावले. त्याने 131 चेंडूत 210 धावांची विक्रमी खेळी केली. एका साईटने ईशान किशन बांगलादेश गोलंदाजांची धुलाई करत होता, तर दुसरीकडे विराट कोहली ईशानच्या फटकेबाजीचा आनंद लुटत होता. ईशान किशन आपलं द्विशतक पूर्ण करण्यासाठी एक धाव घेताच, विराट कोहलीने मैदानावरच डान्स सुरू केला.

एक धाव घेत द्विशतक पूर्ण करतात, विराट कोहलीने मैदानावर केलेल्या भांगड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल (Viral video) झाला आहे. (Virat Kohli dance video) आपल्या सहकाऱ्यांच्या आनंदात नेहमी सहभागी होणारा विराट, पुन्हा एकदा ईशान किशनचे द्विशतक झाल्यानंतर, त्याला शुभेच्या देताना मैदानातच भांगडा करू लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराट कोहलीने देखील तब्बल तीन वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले. विराटने आपल्या करिअरचे 72 वे शतक पूर्ण करत रिकी पाँटिंगचा विक्रम मोडीत काढला. (Virat completed his 72nd career century breaking the record of Ricky Ponting)

विराट कोहलीने सुरुवातीला संयमी खेळ करत ईशान किशनच्या फलंदाजीचा आनंद लुटला. नंतर मात्र विराटने ट्रेडमार्क विराट कोहली शॉट खेळले. विराट कोहलीने अवघ्या 86 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने 91 चेंडूत 113 धावा केल्या. या बहारदार खेळीत दोन षटकार आणि अकरा चौकार लगावले. भारताने या सामन्यात पन्नास षटकात आठ बाद 409 धावा केल्या. 410 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेश संघाला केवळ 182 धावा करता आल्या. भारताने हा सामना 227 धावांनी जिंकला.

हे देखील वाचा most searched people in 2022: भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च झालेली दहा नावं जाणून तुम्हीही व्हाल चकित..

Second Hand Bike: 2019 मधील hero spender Plus मिळतेय २० हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Chanakya Niti: या चार गोष्टींमुळे आयुष्यातून निघून जाते लक्ष्मी; प्रचंड मेहनत करूनही मिळत नाही यश..

Malaika Arora: अर्जुन त्याच्यासारखा नाही मर्द आहे, म्हणून मी मलायका अरोराचं खळबळ जनक विधान..

shoaib malik ayesha omar marriage: सानिया सोबतच्या घटस्फोटानंतर शोएब मलिक या तारखेला आयशा उमरशी करणार लग्न; आयशाने केले स्पष्ट..

Rohit Sharma: निवड समिती नंतर रोहितची कर्णधार आणि T-20 मधूनही हकालपट्टी; T-20 कर्णधारपद हार्दिककडे, कसोटीचे पुन्हा विराटकडे..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.