shoaib malik ayesha omar marriage: सानिया सोबतच्या घटस्फोटानंतर शोएब मलिक या तारखेला आयशा उमरशी करणार लग्न; आयशाने केले स्पष्ट..

0

shoaib malik ayesha omar marriage: सानिया मिर्झा शोएब मलिक (Sania Mirza Shoaib Malik divorce) या दोघांनी आपला घटस्फोट अधिकृतरित्या जाहीर केला नसला तरी देखील दोघे वेगळे झाले आहेत. ‘द मिर्झा मलिक शो’ साठी (the Mirza Malik show) दोघांनी एकत्र कॉन्ट्रॅक्ट केला असल्याने, या दोघांना अद्याप अधिकृतरित्या घटस्फोट झाल्याचे जाहीर करता आले नाही. पाकिस्तानची अभिनेत्री आयशा उमर (Pakistan actress Ayesha Omar) हिच्याशी वाढलेल्या जवळीक मुळेच शोएब मलिकने तेरा वर्ष सुखाचा संसार केल्यानंतर, वेगळं होण्याचा निर्णय घेतला. माजी क्रिकेटर शोएब मलिक आणि अभिनेत्री आयशा उमर हे दोघेही लग्न करणार असून यासंदर्भात आयशा उमरनेच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सानिया मिर्झा हिच्या सोबत लग्न करण्यापूर्वी शोएब मालिकचं लग्न झालं होतं. सानिया सोबत शोएब मालिने दुसरं लग्न केलं होतं. मात्र आता हे लग्न देखील संपुष्टात आलं असून, शोएब मलिक पाकिस्तान एक्ट्रेस सोबत आता आपलं तिसरं लग्न करणार आहे. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब या दोघांचा प्रेम विवाह झाला होता. ऑस्ट्रेलियामध्ये (australia) मॅच खेळत असताना सानियाची ओळख शोएब मलिक सोबत झाली.

ऑस्ट्रेलियामध्ये सानिया सोबत काही मिनिटे बोलल्यानंतर, सानियाची मॅच पाहण्यासाठी शोएब मलिक स्टेडियममध्ये पोहोचला. हळूहळू या भेटीचे रूपांतर प्रेमात झालं आणि 2008 मध्ये या जोडप्यांनी लग्न केलं. तेरा वर्षे एकत्र संसार केल्यानंतर, आता हे दोघेही वेगळे झाले आहेत. अद्याप या दोघांनी घटस्फोटाचे अधिकृत घोषणा केली नसली तरी हे दोघेही वेगळे राहत आहेत. ‘द मिर्झा मलिक शो’ या रियालिटी शो साठी दोघांनी एकत्र कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. आणि म्हणून, शोच्या नियमानुसार या दोघांना आपण वेगळे झाल्याची घोषणा करता येणार नसल्याची माहिती आहे. मात्र या कॉन्ट्रॅक्टनंतर दोघेही घटस्फोट झाल्याची घोषणा करणार आहेत.

पाकिस्तान मीडिया रिपोर्ट नुसार ( Pakistan media report) शोएब मलिकची जवळीक पाकिस्तान अभिनेत्री आयशा उमर (Shoaib Malik Ayesha Omar relationship) हिच्याशी वाढली. आणि तेव्हापासूनच सानिया मिर्झा शोएब मलिक या दोघांमध्ये अंतर पडत गेलं. काही वर्षांपूर्वी हे दोघे वेगळे होणार होते मात्र कुटुंबातील सदस्यांनी या दोघांची समजूत काढली. आता मात्र हे दोघेही वेगळी झाले असून, शोएब मलिक लवकरच अभिनेत्री आयुष्यावर बरोबर लग्न करणार असल्याची माहिती आहे. पाकिस्तानमध्ये या संदर्भात बातम्या प्रसारित झाल्यानंतर, आयशाला शोएब मलिकच्या लग्ना संदर्भात विचारण्यात आलं.

पाकिस्तान एक्ट्रेस आयशा उमर हिला शोएब मलिक आणि तुझं लग्न होणार आहे. अशा बातम्या प्रसारित झाल्या आहेत, या संदर्भात विचारण्यात आलं. यावर बोलताना आयशा म्हणाली, आम्ही चांगले मित्र आहोत. शोएब सानिया वर खूप प्रेम करतो. दोघेही खूप आनंदी आहेत. आम्ही लग्न करणार आहोत,यात काहीही तथ्य नाही. पाकिस्तान एक्ट्रेस आयशा उमर हिने आमचं लग्न होणार आहे, या बातमीचे खंडन केले असले, तरी दोघेही लवकरच लग्न गाठ बांधणार असल्याची माहिती त्याच्या जवळच्या लोकांचीच दिली आहे.

‘द मिर्झा मलिक शो’ या ‘रियालिटी शो’चं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर, सानिया मिर्झा आणि आपण वेगळं झाल्याची अधिकृत घोषणा करणार असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर शोएब मालिक लग्न करणार असल्याची देखील माहिती आहे. दोघांनी दुबईमध्ये एकत्रित खरेदी केलेलं घर देखील सानिया मिर्झाने सोडलं आहे. सध्या आपल्या मुलाचा सांभाळ शोएब मलिक आणि सानिया दोघेही एकत्रित करत आहेत.

हे देखील वाचा Sania Mirza Shoaib Malik divorce: ..म्हणून शोएब मलिकने सानियाला दिला डच्चू; घटस्फोटानंतर मुलगा कोणाकडे राहणार? वाचा सविस्तर..

Chanakya Niti: जीवनात यश मिळवायचं असेल तर हा स्वभाव जाळून टाका..

YouTube First Video: यूट्यूब वरील सर्वात पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला का? त्या व्हिडिओने कमावलेत एवढे..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

Ration Card: रेशन दुकानदार पावती, नियमानुसार धान्य देत नाही? फक्त या नंबरवर कॉल करा लगेच उठेल दुकानदाराचा बाजार..

Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर..

Malaika Arora: ..म्हणून दिला घटस्फोट; घटस्फोटवर बोलताना मलायकाने ते सगळंच सांगून टाकलं..

Business Idea: पाच हजार गुंतवा, अन् सुरू करा हा व्यवसाय; दरमहा कमवाल लाखों रुपये, सरकारही करतंय मदत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.