Rohit Sharma: निवड समिती नंतर रोहितची कर्णधार आणि T-20 मधूनही हकालपट्टी; T-20 कर्णधारपद हार्दिककडे, कसोटीचे पुन्हा विराटकडे..

0

Rohit Sharma: दोन्ही T20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) झालेल्या खराब कामगिरीमुळे त्याचबरोबर अनेकांनी संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने, अखेर बीसीसीआयने (BCCI) निवड समितीची आधिकृतरित्या हकालपट्टी केली आहे. चेतन शर्मा ( Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीतीची हकलपट्टी करताना बीसीसीआयने नवीन निवड समिती गठीत करण्यासंदर्भात अर्ज देखील मागवले आहेत. 19 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. समिती बरखास्त केल्यानंतर, बीसीसीआयने आगामी विश्वचषक आणि टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या तयारीसाठी संघामध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.

2021 च्या टी-ट्वेंटी विश्वचषकापूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या टी-ट्वेंटी कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. बीसीसीसीआयने विराट कोहलीने घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं म्हटले होते. मात्र टी-ट्वेंटी विश्वचषकात भारत साखळीत गारद झाल्यानंतर, व्हाईट बॉलमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार असू नयेत, हे कारण पुढे करत विराट कोहलीची वनडे क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावरून देखील हकालपट्टी करण्यात आली.

विराट कोहलीची odi क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावरून हकलपट्टी करण्यात आल्यानंतर, विराट कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधार पदाचा देखील राजीनामा दिला. त्यानंतर अर्थात तिन्ही क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी रोहित शर्माची निवड करण्यात आली. मात्र रोहित शर्माने कर्णधार पद सांभाळल्यानंतर भारताला आशिया कप (asia cup) आणि टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये देखील पराभव पत्करावा लागल्याने, BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार असू नयेत म्हणणाऱ्या बीसीसीआयने अखेर तिन्ही फॉर्मेटचे कर्णधार वेगवेगळे असावेत, असा निर्णय घेतला आहे.

रोहित शर्माची अधिकृतरित्या T-20 संघाच्या कर्णधार पदावरून हकलपट्टी करण्यात आली नसली तरी, आगामी 2024 च्या t20 विश्वचषका पर्यंत t20 संघाच्या कर्णधार पदी हार्दिक पांड्याची (hardik Pandya) करण्यात येणार आहे. हार्दिक पांद्याच्या नेतृत्वाखाली आगामी टी-ट्वेन्टी विश्वचषकासाठीची संघ बांधणी केली जाणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी, बीसीसीआय लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. रोहित शर्मासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. टी-ट्वेंटी संघातून देखील रोहित शर्माची हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती आहे.

आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकापर्यंत हार्दिक पांड्याची भारतीय टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात येणार आहे. तर विराट कोहलीची भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधार पदी पुन्हा एकदा निवड केली जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक समितीची सूत्रे अजित आगरकर (Ajit agarkar) यांच्याकडे जाणार असल्याची दाट शक्यता आहे. BCCI ने आखून दिलेला नियम आणि अटीमध्ये अजित आगरकर बसत आहेत. यापूर्वी देखील त्यांनी निवड समितीच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज केला होता.

निवड समितीच्या अध्यक्ष पदासाठी ठेवण्यात आलेल्या नियम आणि अटी विषयी जाणून घ्यायचं झाल्यास, खेळाडूने किमान सात आंतरराष्ट्रीय कसोटी सामने त्याचबरोबर 10 एकदिवसीय सामने खेळलेले असणे आवश्यक आहे. सोबतच पाच वर्षापूर्वी निवृती घेणे देखील आवश्यक आहे. उमेदवारांच्या मुलाखतीद्वारे निवड समितीच्या अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे.

हे देखील वाचाReliance Jio New Recharge Plans: जिओचे नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च; जाणून घ्या सविस्तर..

Samsung galaxy S20FE: Samsung चा धूमधडाका! 75 हजार किंमतीचा स्मार्टफोन केवळ 30 हजारांत; जाणून घ्या कुठे सुरू आहे ऑफर..

IT Jobs: आयटी क्षेत्रात दोन लाख तरुणांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Good News: घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, आता ग्राहकांची..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

Relationship tips: महिला आणि पुरुष दोघांचीही सेक्स करण्याची वेळ आहे वेगवेगळी; जाणून घ्या महिलांची सेक्स करण्याची इच्छा कधी होते..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.