Sanju Samson: आयर्लंड क्रिकेट बोर्डाकडून ऑफर आल्यानंतर अखेर संजूनेही घेतलाच निर्णय; म्हणाला मला..

0

Sanju Samson: भारतीय क्रिकेट संघाचं (Indian cricket) प्रतिनिधित्व करणं आता खूप अवघड झालं आहे. अनेक नवीन खेळाडू प्रतिभावान असल्याने, प्रत्येकाला भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणे खूप अवघड आहे. साहजिकच यामुळे अनेक खेळाडूंना गुणवत्ता असून, देखील स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत नाही. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विकेट किपर फलंदाज संजू सॅमसन (wicketkeeper batsman Sanju Samson) याला देखील भारतीय क्रिकेट संघात (Indian cricket team) खेळण्याची संधी मिळत नाही. उत्तम परफॉर्मन्स करून देखील सातत्याने त्याला संधी मिळतं नसल्याने आता त्याला आयर्लंड क्रिकेट बोर्डकडून क्रिकेट खेळण्याची ऑफर आली आहे. (Ireland cricket board offer Sanju Samson)

अनेक क्रिकेट दिग्गज आणि क्रिकेटच्या चाहत्यांनी संजू सॅमसन सारख्या प्रतिभान खेळाडूला देखील भारतीय संघात संधी मिळत नसेल, तर हा त्याच्यावर होणारा अन्याय असल्याचं वेळोवेळी म्हटलं आहे. एकिकडे अनेक संधी देऊन देखील ऋषभ पंतला (Rishabh pant) स्वतःला सिद्ध करता आलं नसल्याने, ऋषभ पंतच्या जागेवर संजू सॅमसंगला का संधी देण्यात येत नाही? असा सवाल देखील वारंवार उपस्थित केला जातो. विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंतपेक्षा देखील समजू सॅमसंगचे आकडे चांगले असूनही, त्याला संधी मिळत नसल्याने, आता याची दखल आयर्लंड क्रिकेट बोर्डाने देखील घेतली आहे.

आयर्लंड क्रिकेट संघ (Ireland cricket team) दिवसेंदिवस चांगली कामगिरी करत आहे. गेल्या काही वर्षापासून या संघाच्या कामगिरीत सुधार झाल्याचे पाहायला मिळतं. आयर्लंड क्रिकेट बोर्डाला आता एक चांगला फलंदाज आणि नेतृत्वाची गरज असल्याने, त्यांनी थेट संजू सॅमसनला आयर्लंड क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करण्याची ऑफर दिली आहे. दोन दिवसांपासून या ऑफरची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर, आता याविषयी संजू सॅमसनने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आयर्लंडने संजू सॅमसनला आयर्लंड क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ऑफर दिल्यानंतर, या संदर्भातलं वृत्त इनसाइड स्पोर्ट्सने दिले आहे. आयर्लंड क्रिकेट बोर्डकडून आलेल्या ऑफर विषयी संजू सॅमसनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आयर्लंडच्या ऑफरवर संजू म्हणाला, भारत सोडून मी इतर कोणत्याही देशाकडून क्रिकेट खेळणार नाही. मला भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. भारत सोडून इतर कोणत्याही देशाकडून खेळण्याचा विचार माझ्या स्वप्नात सुद्धा नाही.

आयर्लंड क्रिकेट बोर्डाकडून आलेल्या ऑफरवर संजू सॅमसनने स्पष्ट केलेल्या आपल्या भूमिकेमुळे प्रत्येक भारतीय चाहत्यांना त्याचा अभिमान वाटत आहे. सॅमसनने घेतलेल्या भूमिकेमुळे सोशल मीडियावर संजू तुझा आम्हाला अभिमान असल्याचा कमेंट यायला सुरुवात झाली. संजू सॅमसंगने 2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मात्र 2015 ते 2022 या सात वर्षाच्या कालावधीमध्ये तो फक्त सत्तावीस आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांत भारतीय क्रिकेट बोर्डावर सातत्याने टीकेची झोड उडाली आहे.

नुकत्याच ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकात (T20 World Cup) देखील संजू सॅमसनला संधी देण्यात आली नव्हती. एवढेच नाही, तर न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या तीन T20 सामन्यांच्या मालिकेत देखील संजू सॅमसनची निवड करून संधी देण्यात आली नाही. न्युझीलॅड विरुद्ध खेळलेल्या तीन एकदिवसीय मालिकेतील संजूला पहिला सामन्यात संधी देण्यात आली, त्याने चांगला खेळ केला. मात्र उर्वरित दोन सामन्यांत त्याला वगळण्यात आले. बांगलादेश दौऱ्यावर दिलेल्या एकदिवसीय संघात देखील संजू सॅमसनला स्थान देण्यात आलं नाही.

ऑक्टोंबरमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत संजूने पहिल्या वनडे सामन्यात नाबाद 86 धावांची खेळी केली. उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत देखील त्याने 30 आणि दोन रन्स काढून दोन्हीं सामन्यात नाबाद राहिला. संजू सॅमसन आता 28 वर्षाचा असून, त्याने 2015 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली. मात्र सात वर्षात तो केवळ 27 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. यामध्ये 16 t20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये त्याने 21.14 च्या सरासरीने 226 रन्स काढले. तर अकरा वनडे सामन्यामधून त्याने 66 च्या सरासरीने 330 धावा केल्या आहेत.

हे देखील वाचा Ishan Kishan girlfriend: कोण आहे ईशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया? फिल्मी स्टाईल ओळख अन् लव्ह स्टोरीला सुरुवात..

Anushka Sharma pregnant: विराट कोहली दुसऱ्यांदा होणार पिता; इतक्या महिन्याची गरोदर आहे अनुष्का..

Extramarital affair: लग्नानंतर पत्नी इतर पुरुषांकडे आकर्षित होण्याची ही आहेत चार कारणे; चौथं कारण खूपच धोकादायक..

Chanakya Niti: कुटुंबातल्या एकाला जरी ही सवय लागली, तरी घर बरबाद झालंच म्हणून समजा..

Indian Railway Jobs: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये 2 हजार 521 जागांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Indian Post Bharti 2022: भारतीय डाक विभागात दहावी पास उमेदवारांसाठी विविध पदांची भरती; लगेच करा अर्ज..

Electric Bike: या चार इलेक्ट्रिक बाईकचे दिवाने आहेत भारतीय; जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि सर्वकाही..

Mahindra Bolero Neo Plus: बोलेरो अवतरली नव्या अवतारात ९ सीटर, लाजवाब लूकसह बनली सगळ्यांचा बॉस..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.