Extramarital affair: लग्नानंतर पत्नी इतर पुरुषांकडे आकर्षित होण्याची ही आहेत चार कारणे; चौथं कारण खूपच धोकादायक..

0

Extramarital affair: कोणतंही नातं प्रेम आणि विश्वासाशिवाय (Love and trust) आनंदी, समाधानी (Happy, satisfied) राहू शकत नाही. खास करून पती-पत्नीच्या (husband wife) नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास याला खूप महत्त्व आहे. दोघांमध्ये भरपूर प्रेम आणि विश्वास असेल, तर पती-पत्नी खूप सुखदायी आणि आनंदी जीवन जगतात. (pleasant and happy life) तुमच्या आसपास किंवा नातेवाईकांमध्ये (relationship) तुम्ही विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) ऐकत, पाहत असाल. मात्र लग्नानंतर महिला इतर पुरुषांकडे आकर्षित का होतात? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आज आपण लग्नानंतर, महिला इतर पुरुषांकडे आकर्षित का होतात, याची चार महत्त्वाची कारणे जाणून घेणार आहोत.

प्रत्येकाला आपली पत्नी ही प्रेमळ आणि सुंदर असावी असं वाटत असतं. आपला वैवाहिक जोडीदार (Spouse) लॉयल असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र खूप प्रेम देऊन देखील तुमचा जोडीदार तुमची फसवणूक करतो. साहजिकच अशावेळी तुम्हाला प्रश्न पडतो, आपल्या जोडीदाराने आपल्याला का फसवलं? तर याला देखील तुम्हीच जबाबदार असता. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र महिला पती व्यतिरिक्त इतर पुरुषांकडे आकर्षित होण्याला बऱ्याच अंशी तुम्ही जबाबदार असता. कोणती आहेत ती चार कारणे? ज्यामुळे पतीव्यतिरिक्त महिला इतर पुरुषांकडे आकर्षित होतात, जाणून घेऊया सविस्तर.

वैवाहिक जीवन आनंदी आणि समाधानी जगण्यासाठी पती-पत्नीमध्ये खूप प्रेम आणि विश्वास असणं आवश्यक असतं. या दोन्हीं गोष्टी कमी होत जातात, तेव्हा नात्यांमध्ये कटुता निर्माण होऊ लागते. आणि मग अशावेळी या दोघांच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश व्हायला सुरुवात होते. नात्यामधील विश्वास आणि प्रेम कमी झाल्यानंतर, फक्त महिलाच इतर पुरुषांकडे आकर्षित होतात असं नाही, तर पुरुष देखील होतात.

लग्न हे असं नातं आहे, जे प्रेम, विश्वास आणि भावनिकतेवर टिकून असतं. लग्नापूर्वी महिलेचं पुरुषासोबत अफेअर असेल, तिच्या इच्छेविरुद्ध लग्न झालेलं असेल, तर अशावेळी मुली लग्नापूर्वीच्या जोडीदाराला विसरू शकत नाहीत. अशा प्रकाराच्या महिला आपला भूतकाळ विसरू शकत नसल्याने, त्या कधीही लग्नानंतर आपल्या पतीसोबत भावनिकरित्या जोडल्या जात नाहीत. सहाजिकच भावनिकरित्या जोडल्या गेल्या नसल्यामुळे प्रेम आणि विश्वास याचा देखील संबंध या नात्यांमध्ये येत नाही. आणि मग अशा प्रकारच्या महिला, लग्नानंतर इतर पुरुषांकडे आकर्षित होतात.

प्रत्येकाचं लग्नापूर्वीच आणि लग्नानंतरचं आयुष्य खूप वेगळं असतं. लग्नापूर्वी मुली त्यांना हव्या त्या गोष्टी करू शकतात. खूप कंटाळा आला, तर अनेकदा मित्र मैत्रिणीं सोबत बाहेर फिरायला जात असतात. ही सामान्य गोष्ट आहे. लग्नापूर्वी अनेकांचे अनेक मित्र-मैत्रिणी असतात. मात्र, लग्नानंतर त्यांच्यासोबत हाच संवाद बऱ्याचदा कायम राहत नाही. लग्नानंतर नवीन जबाबदाऱ्या येऊन अंगावर पडतात. वैवाहिक जीवनाचा गाडा हाकण्यासाठी पती देखील कामानिमित्त दिवसभर बाहेरच असतात. अशावेळी अनेकदा पत्नीला पतीकडून कॉलिटी टाईम मिळत नाही. अशावेळी महिला इतर पुरुषांकडे आकर्षित होण्याची शक्यता अधिक असते, असं संशोधनातून समोर आलं आहे.

इच्छेविरुद्ध लग्न झाले असेल, तर अनेक महिला भावनिक दृष्ट्या आपल्या पतीसोबत जोडल्या जात नाहीत. याशिवाय पतीकडून पत्नीला क्वालिटी टाईम मिळत नसेल, स्वतः तिला देखील आपल्या पतीसोबत प्रेम, नसेल तर अशावेळी महिलांना खूप एकटे-एकटे वाटण्याचे प्रकार होतात. या सगळ्यांवर मात करण्याकरिता महिला आपल्या पती व्यतिरिक्त इतर पुरुषांचा आधार घेतात. विवाहबाह्य संबंध ठेवण्याचे हे देखील एक महत्त्वाचे कारण समोर आलं आहे.

लग्नानंतर, पत्नी आपल्या पतीव्यतिरिक्त इतर पुरुषांकडे आकर्षित होण्याची काही करणे आपण जाणून घेतली. या कारणांपैकी हे कारण खूप धोकादायक आहे. पत्नीच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली, तर अशावेळी पत्नी आपल्या पती व्यतिरिक्त इतर पुरुषांकडे आकर्षित होते. आणि बदला घेण्याच्या भावनाने संबंध प्रस्थापित करते. हा प्रकार खूप धोकादायक आहे. आपल्या पतीकडून अनेक वेळा अपमान झाल्यानंतर, महिला हा अपमान पचवू शकत नाहीत. अशावेळी महिला इतर पुरुषांकडे आकर्षित होण्याचे प्रकार घडतात.

हे देखील वाचाChanakya Niti: कुटुंबातल्या एकाला जरी ही सवय लागली, तरी घर बरबाद झालंच म्हणून समजा..

Ishan Kishan girlfriend: कोण आहे ईशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया? फिल्मी स्टाईल ओळख अन् लव्ह स्टोरीला सुरुवात..

Indian Railway Jobs: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये 2 हजार 521 जागांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Indian Post Bharti 2022: भारतीय डाक विभागात दहावी पास उमेदवारांसाठी विविध पदांची भरती; लगेच करा अर्ज..

Anushka Sharma pregnant: विराट कोहली दुसऱ्यांदा होणार पिता; इतक्या महिन्याची गरोदर आहे अनुष्का..

Electric Bike: या चार इलेक्ट्रिक बाईकचे दिवाने आहेत भारतीय; जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि सर्वकाही..

Second Hand Bike: 2019 मधील hero spender Plus मिळतेय २० हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Mahindra Bolero Neo Plus: बोलेरो अवतरली नव्या अवतारात ९ सीटर, लाजवाब लूकसह बनली सगळ्यांचा बॉस..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.