IND vs ENG 4th test India’s squad : चौथ्या कसोटीतून दोन मॅचविनर खेळाडू आउट; संघाची घोषणा, रोहित पुढे मोठे आव्हान..

0

IND vs ENG 4th test India’s squad : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामध्ये सुरू असलेली पाच कसोटी सामन्याची मालिका रंगतदार अवस्थेत आली आहे. भारतीय संघ या मालिकेत 2-1 असा आघाडीवर असला तरी इंग्लंडचा संघ कधीही कमबॅक करण्याची शक्यता आहे. चौथा कसोटी सामना इंग्लंडसाठी निर्णायक मोडवर असल्याने इंग्लंड पूर्ण तयारी आणि रणनीतीसह मैदानात उतरणार आहे. अशातच आता भारतीय संघाचे दोन मॅच विनर खेळाडू बाहेर, झाल्याने संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. (India’s updated squad for the 4th Test)

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीला रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणाही करण्यात आली आहे. चौथ्या कसोटी सामन्यात दोन मॅच विनर खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने, रोहीत शर्मा (rohit sharma) आणि भारतीय टीम मॅनेजमेंट पुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या गोलंदाजीच्या बळावर भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती देण्यात आली आहे. तर पहिल्या सामन्यात दमदार शतक झळकावणारा केएल राहुल मात्र kl Rahul) दुखापतीमुळे चौथा सामना खेळू शकणार नाही. चौथ्या सामन्यात केएल राहुलचे कमबॅक होणार असल्याचे बोललं जात होतं. साहजिकच त्यामुळे सरफराज खान (Sarfaraz Khan) किंवा रजत पाटीदार (rajat Patidar) या दोघांपैकी एकाच्या डोक्यावर टांगती तलवार होती.

आता मात्र केएल राहुल (kl Rahul) चौथ्या कसोटी सामन्यात देखील तंदुरुस्त होऊ शकला नसल्याने, रजत पाटसदार आणि सरफराज खान या दोघांनाही खेळण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही कसोटी सामन्यात रजत पाटीदार पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतर चौथा कसोटी सामना त्याच्यासाठी प्रचंड महत्त्वाचा असणार आहे. केएल राहुल शिवाय भारतीय फलंदाजी आश्वासक वाटली आहे. मात्र गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहची उणीव भासण्याची शक्यता आहे.

दुखापतीमुळे चौथा कसोटी सामना खेळू न शकणाऱ्या केएल राहुलच्या जागेवर देवदत्त पडिक्कलची (Devdutt Padikkal) संघात निवड करण्यात आली आहे. चौथ्या कसोटी सामन्यात देवदत्त पडिक्कलला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंट रजत पाटीदारला आणखी एक संधी देणार असल्याची माहिती आहे. जसप्रीत बुमराहच्या जागेवर आकाश दीपला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

असा आहे चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ

चौथ्या कसोटीसाठी भारताचा अद्ययावत संघ: रोहित शर्मा (सी), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (डब्ल्यूके), केएस भरत (डब्ल्यूके), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप. Rohit Sharma (C), Yashasvi Jaiswal, Shubman Gill, Rajat Patidar, Sarfaraz Khan, Dhruv Jurel (WK), KS Bharat (WK), Devdutt Padikkal, R Ashwin, Ravindra Jadeja, Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Mohd. Siraj, Mukesh Kumar, Akash Deep.

हे देखील वाचा  IND vs ENG 4th test : दोन्हीं डावात अर्धशतके झळकावूनही सरफराज खानला संधी नाही? चौथ्या कसोटीचे हे आहे गणित..

Virat Kohli Anushka Sharma baby boy : विराटने इतक्या दिवस मुलाचा जन्म का लपवला? जाणून घ्या अकाय नावाचा अर्थ आणि विराटने लोकांना केलेलं आवाहन..

IPL 2024 : कोच माईक हेसनचा RCB ला घरचा आहेर; थेट वर्मावर बोट ठेवत म्हणाले..

Sania Mirza Mohammed Shami: मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अडकणार विवाहबंधनात? त्या ट्विटमुळे झाला खुलासा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.