IND vs ENG test series: विराट कोहली दारू पिऊन माझ्या अंगावर थुंकला; या दिग्गज फलंदाजाच्या आरोपाने खळबळ..

0

IND vs ENG test series: 15 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यामधील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. (IND vs ENG 3rd test) राजकोट मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाला अनेक मोठे झटके बसले असून, आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंग्लंड विरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून विराट कोहली (Virat kohli) बाहेर पडल्यानंतर, आता वैयक्तिक कारणामुळे देखील विराट निशाण्यावर आला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली आहे.

विराट कोहली (Virat kohli) इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत एकही सामना खेळू शकणार नाही. अधिकृतरित्या विराट कोहली या सिरीज मधून बाहेर पडला असल्याचे बीसीसीआयने (BCCI) देखील जाहीर केलं आहे. वैयक्तिक कारणामुळे इंग्लंड कसोटी मालिकेतून विराट कोहलीने माघार घेतली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विराट कोहलीने घेतलेल्या निर्णयाचे BCCI कडून समर्थन करण्यात आले आहे. शिवाय विराटच्या निर्णयाचा आम्ही पूर्णपणे सन्मान करतो, असं देखील सांगण्यात आले.

विराट कोहली आपल्या फलंदाजी बरोबर मैदानावर दाखवल्या जाणाऱ्या आक्रमकतेमुळेही ओळखला जातो. विरोधी संघातील खेळाडूंना जाणीवपूर्वक डिवचताना विराट कोहली अनेकदा पाहिला मिळतो. फलंदाजांना डिस्टर्ब करण्यासाठी हा एक रणनीतीचा भाग असल्याचे, विराट नेहमी सांगतो. इतकच नाही, तर विराट फलंदाजीसाठी आल्यानंतर विरोधी संघातील खेळाडू देखील विराटला स्लेज करतात. विराट कोहली हे आव्हान आपला खेळ उंच होण्यासाठी याचा वापरही करतो.

विराट कोहलीच्या याच स्वभावाचा एक किस्सा दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजाने सांगितलं आहे. ज्यामध्ये त्याने विराट कोहलीवर गंभीर आरोप देखील केले आहेत. 2017/18 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय दौऱ्यावर आला होता. अश्विनी आणि जडेजा या गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर केवळ डिफेन्सिव फलंदाजी करत होता. ज्यावर विराट कोहली चांगलाच संतापला होता. तेव्हा हा गंभीर प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गर (Dean Elgar) म्हणाला, कोहलीच्या मते, रवींद्र जडेजा (ravindra jadeja) आणि रविचंद्रन अश्विन (ravichandran Ashwin) यांना मी डिफेन्सिव्ह फलंदाजी करत होतो, असं वाटलं. त्यामुळे विराट कोहली प्रचंड संतापला. आणि माझ्या अंगावर थुंकला देखील. विराट कोहलीच्या या कृत्यावर मी त्याला खूप शिव्या देखील घातल्याचं तो म्हणाला. मालिकेनंतर पुढे आम्ही दोघांनी सोबत ड्रिंकही केली. नंतर त्याने माफीही देखील मागितली. तेव्हापासून आम्ही चांगले मित्र देखील बनलो, असंही तो म्हणाला.

हे देखील वाचा Rohit Sharma leave MI : रोहित शर्माचं ठरलं, मुंबई सोडणार पण कशी? जाणून घ्या हा नियम..

IPL 2024 MI : पत्नी रितिका नंतर रोहित शर्माचाही मुंबई इंडियन्सवर पलटवार; कमेंट करून म्हणाला..

BCCI On Virat Kohli: विराटच्या फॅमिली फर्स्टच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयचेही दमदार उत्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.