IND vs ENG Ranchi test: रांचीच्या खेळपट्टीमुळे भारताची उडाली भांबेरी; इंग्लंडचा तगडा प्लॅन समोर, जाऊन घ्या उद्या होणाऱ्या चौथ्या कसोटीची स्थिती..

0

IND vs ENG Ranchi test: भारत आणि इंग्लंड यांच्यामधील पाच कसोटी (IND vs ENG 5 test match series) सामन्याच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना उद्या रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. (IND vs ENG 4th test) जसप्रीत बुमरा (jasprit bumrah) चौथा कसोटी सामना खेळणार नसल्याने, भारतासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या समस्येत आणखीन भर टाकणारी बातमी देखील समोर आली आहे. रांचीची खेळपट्टी भारतीय संघावर उलटण्याचा अंदाज वर्तवण्यात जात आहे. सोबतच इंग्लंडने आपला प्लॅन देखील तयार केला असल्याने चौथ्या कसोटीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 अशी आघाडी घेऊन मैदानात उतरणार आहे. साहजिकच चौथा कसोटी सामना जिंकून मालिका विजय साकारण्याचं लक्ष भारतीय संघाचं असणार आहे. दुसरीकडे मात्र इंग्लंडने देखील तगडे आव्हान दिलं आहे. इंग्लंडचा संघ चौथा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. यासाठी इंग्लंड संघाने आपला खास प्लॅन देखील अखला आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या जसप्रीत बुमराहला (Jasprit bumrah) चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. साहजिकच त्यामुळे भारतीय गोलंदाजाची सगळी मदार स्पिन गोलंदाजीवर येऊन ठेपली आहे. बुमराह चौथा कसोटी सामना खेळू शकणार नसल्याने, रांचीची खेळपट्टी पूर्णतः स्पिन गोलंदाजीला अनुकूल असणारी बनवण्यात आली आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळपट्टी देखील स्पिन गोलंदाजीला मदत करणार होती. मात्र चेंडू तिसऱ्या आणि चौथ्या दिवसांपासून अधिक स्पिन होऊ लागला होता. रांचीच्या खेळपट्टीवर मात्र पहिल्या दिवसापासून स्पिन गोलंदाजांना मदत असणार आहे. पहिल्या दिवसापासून गोलंदाजांचा चेंडू टर्न करणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजाबरोबर भारतीय फलंदाजांपुढे देखील स्पिन गोलंदाजी खेळण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

पत्रकार परिषदेत ओली पोपने (Ollie Pope) इंग्लंडच्या रणानितिवर देखील भाष्य केले. तिसऱ्या कसोटी सामन्यात आमच्याकडून काही चुका झाल्या. या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत. सुरुवातीपासून आम्ही आक्रमक फलंदाजी करणार आहे. खेळपट्टी स्पिन गोलंदाजींना मदत करणारी असली तरी क्रिकेटींग शॉट ऐवजी इतरही शॉट्स आम्ही खेळून भारतीय गोलंदाजीवर दबाव टाकणार असल्याचे तो तुम्हाला.

रांचीची खेळपट्टी पहिल्या दिवसांपासून स्पिन गोलंदाजीला साथ देणारी असल्याने भारतीय फलंदाजांसाठी देखील हे मोठा आव्हान असेल. गेल्या काही वर्षापासून भारतीय फलंदाजी स्पिन गोलंदाजी समोर कोलमडताना पाहायला मिळाली आहे. त्यामुळे इंग्लंड बरोबर भारतीय फलंदाजी देखील टेस्ट होणार आहे. टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला चौथा कसोटी सामना जिंकण्याची अधिक संधी असणार आहे.

हे देखील वाचा IND vs ENG 4th test India’squad : चौथ्या कसोटीतून दोन मॅचविनर खेळाडू आउट; संघाची घोषणा, रोहित पुढे मोठे आव्हान..

Musheer Khan: सरफराज खान नंतर आता छोटा भाऊ मुशीर खानचीही संघात निवड.. 

Rohit Sharma IPL 2024 : हार्दिक, सूर्या, बुमराहला देण्यात आला महत्वाचा रोल; आयपीएल मधून रोहित शर्मा बाहेर..

IND vs ENG 4th test : दोन्हीं डावात अर्धशतके झळकावूनही सरफराज खानला संधी नाही? चौथ्या कसोटीचे हे आहे गणित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.