Rohit Sharma IPL 2024 : हार्दिक, सूर्या, बुमराहला देण्यात आला महत्वाचा रोल; आयपीएल मधून रोहित शर्मा बाहेर..

0

Rohit Sharma IPL 2024 : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai super kings) हे दोन संघ आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून ओळखले जातात. दोन्ही संघानी एकूण पाच-पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील मुंबई इंडियन्स संघाला तब्बल पाच वेळा आपल्या नेतृत्वात आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली आहे. यावर्षी मात्र रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार नसणार आहे. मुंबई इंडियन्सने रोहित ऐवजी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली आहे.

आयपीएल मधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नाव घेतलं जात असलं तरी मुंबई इंडियन्सने मात्र रोहित शर्मा व्यतिरिक्त आपली पावले टाकायला सुरुवात केली आहे. याचे पहिले पाऊल त्यांनी रोहित शर्माची कर्णधार पदावरून हकालपट्टी करून केली. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार देण्यात आले. मुंबई इंडियन्सने घेतलेल्या या निर्णयामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा रोहित शर्माला मोठा झटका बसला आहे.

रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून पुढे आला असला तरी मुंबई इंडियन्सला मात्र आता रोहित शर्मा कर्णधार पदाच्या लायक आहे, असं वाटत नाही. 2008 पासून आयपीएलची सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत एकूण सोळा सीजन खेळले गेले आहेत. सोळा सिझनमध्ये दमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना एकत्रित करून आयपीएलचा सर्वोत्तम संघ निवडण्यात आला आहे. ज्यामध्ये रोहित शर्माला आपले स्थान टिकवता आले नाही.

2008 पासून 2023 पर्यंत खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या कामगिरीचा विचार करून आयपीएलचा सर्वोत्तम संघ निवडला गेला आहे. या संघाचे कर्णधारपद महेंद्र सिंग धोनीकडे (ms dhoni) देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आयपीएल मधील सर्वोत्तम संघामध्ये रोहित शर्माला स्थान मिळवता आले नाही. आयपीएल मधील सर्वोत्तम संघामध्ये रोहित शर्माला संधी देण्यात आली नसल्याने रोहित शर्माचे चाहते पुन्हा भडकले आहेत.

कर्णधार म्हणून रोहित शर्माने पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली असली तरी सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्माची चमकदार कामगिरी राहिली नाही. फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये रोहित शर्मा अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याला संधी देण्यात आली नाही. वेस्टइंडीजचा माजी डावखुरा फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (David Warner) या दोघांना सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर अर्थात विराट कोहलीची (Virat kohli) निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन-चार सीजन पासून आपली छाप सोडणाऱ्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) देखील आयपीएलच्या सर्वोत्तम संघामध्ये संधी देण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) देखील अष्टपैलू म्हणून संधी देण्यात आली आहे. याशिवाय जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) देखील निवड करण्यात आली आहे.

असा आहे आयपीएलचा सर्वोत्तम संघ

ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार) हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, रवींद्र जडेजा, रशीद खान, युझवेंद्र चहल, सुनील नरेन, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा

हे देखील वाचा  चौथ्या कासोटीतून दोन मॅचविनर खेळाडू आउट; संघाची घोषणा, रोहित पुढे मोठे आव्हान..

IPL 2024 announcement : यंदा आयपीएल दोन टप्प्यात; 22 मार्च पासून रणसंग्रामाला सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण स्वरूप..

Virat Kohli Anushka Sharma baby boy : विराटने इतक्या दिवस मुलाचा जन्म का लपवला? जाणून घ्या अकाय नावाचा अर्थ आणि विराटने लोकांना केलेलं आवाहन..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.