Musheer Khan: सरफराज खान नंतर आता छोटा भाऊ मुशीर खानचीही संघात निवड.. 

0

Musheer Khan : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर सरफराज खानला (Sarfaraz Khan) भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सरफराज खानने आपल्या कसोटी कारकीर्दीला सुरुवात केली. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढून देखील त्याच्याकडं निवड समितीने सातत्याने दुर्लक्ष केले. सरफराज खानची (Sarfaraz Khan) निवड होत नसल्याने, अनेकदा भारतीय निवड समितीवर टीका देखील केली गेली. Ishan Kishan vs BCCI : जय शहाच्या वॉर्निंग नंतर ईशान किशनचाही पलटवार; म्हणाला..

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे अखेर सरफराज खानला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. या संधीचे त्याने पुरेपूर सोने देखील केले. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात सरफराज खानने दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. अशी कामगिरी करणारा तो केवळ चौथा भारतीय खेळाडू ठरला. सरफराज खान पदार्पणाचा सामना खेळत आहे, असं कधीही वाटलं नाही. तो प्रचंड परिपक्वतेने फलंदाजी करत होता. अशा स्वरूपात त्याचे अनेक दिग्गजांनी कौतुक देखील केले.

सरफराज खानचे आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण झाल्यानंतर, आता त्याच्या कुटुंबासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरफराज खानचा छोटा भाऊ मुशिर खानची (musheer Khan) देखील टीममध्ये निवड करण्यात आली आहे. सध्या रणजी हंगाम (ranji trophy) सुरू असून, मुंबई संघाकडून (mumbai ) उपांत्यपूर्व फेरी सामन्यात खेळण्याची संधी मुशीर खानला मिळाली आहे. शिवम दुबे (Shivam Dube) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे बाहेर झाल्याने, मुशीर खानची वर्णी लागली आहे.

मुंबई संघाचा उपांत्यपूर्व फेरी सामना 23 तारखेला बडोद्या संघाविरुद्ध खेळवला जाणार आहे. या सामन्यात मुशीर खानला मुंबई संघाकडून पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाली आहे. तब्बल एका वर्षांनंतर मुशिर खान मुंबई संघाकडून खेळताना चाहत्यांना पाहता येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षाखालील वर्ल्ड कपमध्ये मुशीर खानने (under 19 World Cup musheer Khan) दमदार कामगिरी केली होती. मुशिर खानने लगातार दोन शतके देखील झळकावली होती.

आपल्या पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावल्या नंतर सरफराज खानला मुशीर खानने कॉल देखील केला होता. यामध्ये दोघेही एकमेकांचे कौतुक करताना दिसून आले होते. आपला छोटा भाऊ मुशीर खानचे कौतुक करताना सरफराज खान म्हणाला, एक दिवस तू देखील भारतीय संघात खेळशील. मी फलंदाजीच्या टिप्स घेण्यासाठी माझा छोटा भाऊ मुशीर कडून सल्ला घेतो, माझ्यापेक्षाही तो चांगला फलंदाज असल्याचे सरफराज खान म्हणाला होता. साहजिक त्यामुळे आता मुशिर खानला देखील भारतीय संघात खेळण्याचे वेध लागले आहेत.

हे देखील वाचा IND vs ENG 4th test Indias quad : चौथ्या कासोटीतून दोन मॅचविनर खेळाडू आउट; संघाची घोषणा, रोहित पुढे मोठे आव्हान..

Rohit Sharma IPL 2024 : हार्दिक, सूर्या, बुमराहला देण्यात आला महत्वाचा रोल; आयपीएल मधून रोहित शर्मा बाहेर..

Virat Kohli Anushka Sharma baby boy : विराटने इतक्या दिवस मुलाचा जन्म का लपवला? जाणून घ्या अकाय नावाचा अर्थ आणि विराटने लोकांना केलेलं आवाहन..

Rohit Sharma IPL 2024 : हार्दिक, सूर्या, बुमराहला देण्यात आला महत्वाचा रोल; आयपीएल मधून रोहित शर्मा बाहेर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.