IND vs ENG 4th test in Ranchi : रोहित शर्माला नाईलाजाने करावे लागणार संघात दोन बदल; असा असेल चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ..

0

IND vs ENG 4th test in Ranchi : उद्या भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. (IND vs ENG 4th test) राचीच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाला नाईलाज म्हणून आता संघात दोन बदल करून मैदानात उतरावं लागणार आहे. दुखापत आणि वैयक्तिक कारणामुळे काही महत्वाचे खेळाडू बाहेर आहेत. त्यामुळे भारतीय संघाला पूर्ण क्षमतेने आपला संघ अद्यापही मैदानात उतरवता आलेला नाही. चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी आता रोहीत शर्मा (rohit sharma) पुढे या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.

पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. इंग्लंडसाठी चौथा कसोटी सामना प्रचंड महत्वपूर्ण आहे. चौथ्या कसोटी सामन्यात जर पराभव झाला, तर इंग्लंड मालिका गमावणार आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ पूर्ण तयारीने मैदानात उतरणार आहे. त्यातच भारतीय संघातील दोन प्रमुख खेळाडूंना बाहेर जावे लागल्याने, भारतीय संघ काहीसा कमकुवत झाला आहे.

चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी केएल राहुल (kl Rahul) तंदुरुस्त होऊन, भारतीय संघात परतेल, असं बोललं जात होतं. मात्र 14 कसोटी सामन्यातून देखील केएल राहुल बाहेर झाला आहे. त्याच्या जागी देवदत्त पडिक्कलची संघात निवड करण्यात आली. केएल राहुल शिवाय जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) देखील चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागेवर आकाश दीपला (akash deep) संधी देण्यात आली आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याने, रांचीची खेळपट्टी पूर्णतः स्पिन गोलंदाजांना मदत करणारी बनवण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहची जागा भरून काढण्याची जबाबदारी आकाश दीपच्या खांद्यावर सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. जर आकाश दीपला भारताच्या प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली, तर या मालिकेत पदार्पण करणार तो चौथा खेळाडू ठरू शकतो.

आकाश दीप (akash deep) पूर्वी इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या या मालिकेत रजत पाटीदार, सरफराज खान, आणि ध्रुव जुरेल यांना पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. तिघांपैकी रजत पाटीदारला मिळालेल्या संधीचा फायदा उठवता आला नाही. त्यामुळे त्याच्या जागेवर देवदत्त पडिक्कलला संधी मिळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. जर देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) संधी मिळाली, तर या मालिकेत पदार्पण करणारा तो पाचवा खेळाडू ठरेल.

असे असेल चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ…

रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार/देवदत्त पडिक्कल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेट कीपर) आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

हे देखील वाचा IND vs ENG Ranchi test: रांचीच्या खेळपट्टीमुळे भारताची उडाली भांबेरी; इंग्लंडचा तगडा प्लॅन समोर, जाऊन घ्या उद्या होणाऱ्या चौथ्या कसोटीची स्थिती..

Musheer Khan: सरफराज खान नंतर आता छोटा भाऊ मुशीर खानचीही संघात निवड.. 

Rohit Sharma IPL 2024 : हार्दिक, सूर्या, बुमराहला देण्यात आला महत्वाचा रोल; आयपीएल मधून रोहित शर्मा बाहेर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.