Ishan Kishan Shreyas Iyer : BCCI ने श्रेयस अय्यर ईशान, किशनला करारातून वगळले; एक वर्ष संधीही नाही, निर्णयाची अंमलबजावणी बाकी..

0

Ishan Kishan Shreyas Iyer : ईशान किशन (ishsn kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer and Ishan Kishan) या दोन प्रतिभावान खेळाडूंना भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे. मानसिक थकव्याचे कारण देत ईशान किशनने (ishan Kishan) दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa tour) दौऱ्यातून माघार घेतली. मात्र बीसीसीआय (BCCI) कडून मिळालेल्या सुट्टीचा आनंद तो दुबईत (dubai) घेताना दिसला. साहजिकच शिस्तभंगाची कारवाई म्हणून, त्याला दक्षिण इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून देखील वगळलं. आता ईशान किशन (ishan Kishan) नंतर श्रेयस अय्यरनेही (Shreyas Iyer) हीच चूक केल्याने बीसीसीआयने दोघांवरही कारवाई केली आहे. (BCCI Central contracts)

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाल्यानंतर ईशान किशनला रणजी (ranji trophy) खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा सल्ला ईशान किशनने धुडकावून लावला. देशांतर्गत क्रिकेटकडे खेळाडू लक्ष देत नसल्याने बीसीसीआयचे सचिव जय शहा (BCCI secretary jay shah) यांना एक पत्र देखील लिहावं लागलं. दिलेल्या पत्रात म्हटले, आयपीएलची (ipl) कामगिरी भारतीय संघात संधी मिळवण्याचा निकष नसणार आहे. भारताच्या संघात संधी हवी असेल, तर नवीन खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटकडे लक्ष द्यावे लागेल.

जय शहा (jay shah) यांच्या पत्राकडे मात्र ईशान किशनने (ishan Kishan) दुर्लक्ष केले. आपण आगामी टी-ट्वेंटी क्रिकेटची तयारी करत असल्याचे देखील ईशान किशनने BCCI च्या अधिकाऱ्याला कळवले. ईशान किशनची पद्धत श्रेयस अय्यरने देखील अवलंबली. BCCI ने श्रेयस अय्यरला मुंबई आणि बडोदा यांच्यातील क्वार्टर फायनल सामना खेळण्यास सांगितले होते. मात्र श्रेयस अय्यरने कंबरदुखीचे कारण देत माघार घेतली. दुसरीकडे नॅशनल क्रिकेट अकॅडमीने श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट असल्याचे प्रमाणपत्र बीसीसीआयला दिले. आणि श्रेयस अय्यरला उघडे पाडले.

श्रेयस अय्यर आणि ईशान किशनच्या या व्यवहारामुळे बीसीसीआयने आता त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे. 2023/24 या वर्षातील केंद्रीय करार संबंधी BCCI central contracts) खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादी मधून ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला वगळण्यात आल्याची माहिती आहे. इतकच नाही, तर बीसीसीआय दोन वर्ष दोघांनाही भारतीय संघात संधी देणार नसल्याची देखील माहिती आहे. विनंती करून देखील दोघेही देशांतर्गत क्रिकेट खेळले नाहीत. आणि म्हणून त्याच्यावर ही कारवाई केली असल्याचं BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. दोन दिवसात केंद्रीय करार यादी आणि श्रेयस अय्यर, ईशान किशन यांच्या कारवाई विषयी अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा IND vs ENG 4th test in Ranchi : रोहित शर्माला नाईलाजाने करावे लागणार संघात दोन बदल; असा असेल चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ..

IPL season17 : भारतीय क्रिकेट गाजवणाऱ्या पाच दिग्गज खेळाडूंचे 2024 ठरणार शेवटचं आयपीएल; दोन नावं धक्कादायक..

Shreyas Iyer vs BCCI : ईशान नंतर आता श्रेयस अय्यरच्या करिअरला खीळ! खोटं बोलल्यामुळे कारवाई; त्या पत्रामुळे पडला उघडा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.